गाय म्हैस अनुदान वाढले गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान

गाय म्हैस अनुदान वाढले गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान

गाय म्हैस अनुदान वाढले  असून गायीसाठी 70 तर म्हशीसाठी 80 हजार अनुदान मिळणार आहे जाणून घेवूया या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये.

ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव शेती करत असतांना शेतीसाठी जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय देखील करत असतात. दुग्धव्यवसाय करण्यासाठी काहीजन गायी घेतात तर काही जण म्हशी.

सुरुवातीला गाई म्हशी घेवून दुग्धव्यवसाय सुरु करणे जिकरीचे काम होते कारण गाई आणि म्हशी खरेदी करण्यासाठी खूप मोठे भांडवल लागते. या कारणांमुळे बरेच शेतकरी बांधव इच्छा असूनदेखील दुग्धव्यवसाय करू शकत नाहीत.

पुढील माहितीपण वाचा नाविन्यपूर्ण योजना ची माहिती असा मिळतो शेळीपालन योजनेचा लाभ

गाय म्हैस अनुदान वाढले असून 1 एप्रिल पासून हि योजना लागू होणार आहे

दुधाळ गायी किंवा म्हशी घेण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळते. मात्र हे मिळत असलेले अनुदान खूपच कमी असल्याने आता या अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे.

आता दुधाळ गाईसाठी 70 हजार रुपये तर म्हशीसाठी 80 हजार रुपये शासकीय अनुदान मिळणार आहे. गाई म्हशीसाठीचा हे वाढीव अनुदान 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार.

मात्र ज्या लाभार्थ्यांची यावर्षी दुधाळ गाई किंवा म्हशीसाठी निवड झालेली आहे त्यांना मात्र चालू वर्षातील जुनेच दर मिळणार आहेत.

या योजना संदर्भातील खालील व्हिडीओ नक्की पहा.

गाईसाठी 70 तर म्हशीसाठी 80 हजार अनुदान

महराष्ट्र राज्यात दूध उत्पादन वाढीस चालना मिळावी यासाठी दुधाळ जनावरांचे गट वाटपाच्या राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील प्रति दुधाळ गाईसाठी 70 हजार रुपये तर म्हशीसाठी 80 हजार रुपये खरेदी किंमतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या योजनांची अंमलबजावणी आर्थिक वर्ष एप्रिल 2023 24 पासून होणार आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना तसेच जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थींना दुधाळ जनावरांचे गट वाटप केले जाते.

दुधाल जनावरांचे गट वाटप अंतर्गत वाटप करावयाच्या प्रती दुधाळ देशी संकरित गायीची किंमत पूर्वी 40 हजार रुपये निर्धारित करण्यात आली होती ती वाढवून आता 70 हजार रुपये करण्यात आलेली आहे. म्हशीची किंमत 40 हजार रुपये एवजी 80 हजार रुपये राहणार आहे या किमतीनुसार लाभार्थींना दुधाळ जनावरचे गट वाटप करण्यात येणार आहे.

बातमी पहा

कोणाला किती मिळते अनुदान

पशुसंवर्धन विभागाच्या या जिल्हास्तरीय योजनेमध्ये दुधाळ गटाच्या अनुसूचित जातीच्या लाभार्थ्याला 75 टक्के अनुदान मिळते तर नाविन्यपूर्ण नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत खुला प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान मिळते. यातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदान मिळते.

योजनेसाठी अर्ज कोठे आणि कसा कराल.

http://ah.mahabms.com/ या शासनाच्या अधिकृत असलेल्या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येतो. सध्या 2022-23 या वर्षातील योजनेचे अर्ज प्रक्रियेत आहेत तर जनावरांचे सुधारित दराबाबतची योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

गाय म्हैस योजनेसाठी किती अनुदान मिळेल?

१ एप्रिल पासून गाईसाठी 70 तर म्हशीसाठी 80 हजार अनुदान मिळणार आहे.

अनुदान मिळविण्यासाठी अर्ज कसा करावा लागेल?

https://ah.mahabms.com/ या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज कारवाफ लागणार आहे.

कोणत्या प्रवर्गासाठी किती अनुदान मिळते?

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थींना ७५ टक्के तर खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना ५० टक्के अनुदान मिळणार आहे.

कोणत्या योजनेतून मिळेल लाभ?

राज्यस्तरीय तसेच जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण योजनेतून हा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *