मोबाईलद्वारे सोलर पंप पेमेंट करण्याची सोपी पद्धत kusum solar pump payment

मोबाईलद्वारे सोलर पंप पेमेंट करण्याची सोपी पद्धत kusum solar pump payment

जाणून घेवूयात मोबाईलद्वारे सोलर पंप पेमेंट करण्याची सोपी पद्धत त्यामुळे लेख शेवटपर्यंत वाचा. या लेखामध्ये एक व्हिडीओ देखील दिलेला आहे तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही सोलर पंपासाठी ऑनलाईन पेमेंट करू शकता.

ज्या शेतकरी बांधवानी सौर कृषी पंप योजना अंतर्गत कुसुम बी सोलर पंप योजनेसाठी अर्ज केला आहे त्यांनाच ऑनलाईन पेमेंट करण्याचे संदेश सुरु झालेले आहे. बऱ्याच शेतकरी बांधवानी पेमेंट केले देखील आहे.

परंतु अजूनही काही शेतकरी बांधवांच्या शंका आहे कि पेमेंट करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईलवर जो sms येतो त्या रकमेचा आणि त्यातील दिलेल्या लिंकवर क्लिक करून पेमेंट ऑनलाईन पद्धतीने कसे पे करावे लागते.

मित्रांनो सौर कृषी पंप योजनेचे पेमेंट करण्याची पद्धत अगदी सोपी आहे.

पुढील माहिती पण बघा रूफटॉप सोलर योजना solar rooftop online application

मोबाईलद्वारे सोलर पंप पेमेंट अगदी सहजपणे

तुम्ही जर सौर कृषी पंप योजना अंतर्गत ऑनलाईन अर्ज केलेला असेल आणि पेमेंट करण्याची सूचना तुम्हाला येत असेल तर हे पेमेंट कसे करावे लागते हि पद्धत समजून घ्या. जेणे करून तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून हे पेमेंट करू शकाल.

ज्या शेतकरी बांधवानी सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज सादर केला आहे त्यांच्या मोबाईलवर आता पेमेंट करण्यासंदर्भात संदेश येण्यास सुरुवात झालेली आहे. मोबाईलद्वारे सोलर पंप पेमेंट करणे अगदी सोपे आहे.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

तुम्ही देखील सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल आणि तुम्हाला पेमेंट करण्याची पद्धत माहित नसेल तर हा व्हिडीओ पूर्ण बघा जेणे करून तुम्ही तुमच्या मोबाईलचा उपयोग करून पेमेंट करू शकता.

सोलर पंप पेमेंट करण्याची पद्दत खालीलप्रमाणे आहे

मोबाईलद्वारे सोलर पंप पेमेंट करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.

  1. मोबाईलवर जो sms तुम्हाला आलेला आहे त्या sms मधील लिंकवर टच करा.
  2. लिंकवर टच करताच हि लिंक तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअरवर घेवून जाईल. तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअरमध्ये Meda beneficiary हे मोबाईल ॲप्लिकेशन दिसेल ते इंस्टॉल करून घ्या.
  3. Meda beneficiary mobile app इंस्टॉल झाल्यावर ओपन करा.
  4. सौर कृषी पंपाचा ऑनलाईन अर्ज करतेवेळी तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला होता किंवा ज्या मोबाईलवर हा संदेश आलेला आहे तो मोबाईल नंबर दिलेल्या चौकटीत टाका आणि पुढे जाणारा जो बाण दर्शविलेल्या आहे त्या बटनावर टच करा.
  5. असे करताच तुमच्या मोबाईलवर एक otp म्हणजेच One Time Password येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये व्यवस्थित टाका आणि Verify OTP या बटनावर टच करा.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा जेणे करून तुम्हाला ऑनलाईन पेमेंट कसे केले जाते या संदर्भात मदत मिळेल.

आता या ठिकाणी काही सूचना तुम्हाला दिसेल त्या सविस्तर वाचून घ्या आणि नेक्स्ट या बटनावर टच करत चला.

तुम्ही इंग्रजी एवजी मराठी भाषा देखील निवडू शकता जेणे करून तुम्हाला प्रोसेस कळण्यास मदत होईल. आपण या ठिकाणी भाषा इंग्रजी ठेवत आहोत.

OTP टाकून लॉगीन करा

आता या ठिकाणी विविध पर्याय तुम्हाला दिसतील यापैकी Application Details आणि Help and support हे पर्याय सोडले तर इतर कोणताही पर्याय या ठिकाणी तुमच्यासाठी उपलब्ध नसणार आहे म्हणजेच हे पर्याय संध्या बंद आहेत. ज्यावेळी तुम्हाला सौर कृषी पंप बसवून मिळेल त्या नंतर तुम्ही या इतर पर्यायांचा उपयोग करू शकता.

सौर कृषी पंपाचे पेमेंट करण्यासाठी Application Details या पर्यायावर क्लिक करा.

जसे हि तुम्ही Application Details या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी Application Details अर्थात अर्जदाराचे तपशील तुम्हाला दिसेल. जसे कि अर्जदाराचे नाव, अर्ज क्रमांक, मोबाईल नंबर पत्ता, आधार क्रमांक इत्यादी माहिती दिसेल.

याच माहितीच्या खाली Make Payment म्हणजेच पेमेंट करा असे बटन दिसेल त्यावर टच करा.

जसेही तुम्ही Make Payment किंवा पेमेंट करा या बटनावर टच कराल त्यावेळी आणखी एक OTP तुमच्या मोबाईलवर पाठविला जाईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि आणि Verify OTP या बटनावर पुन्हा एकदा टच करा.

पेमेंट करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध

Make Payment या बटनावर टच केल्यावर पेमेंट करण्यासाठी असलेले विविध पर्याय तुम्हाला दिसेल या पर्यायांपैकी एक पर्याय वापरून तुम्ही कुसुम बी सोलर पंप योजनेसाठी लाभार्थी हिस्याचे पेमेंट करू शकता.

सध्या अनेकांच्या मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगलपे बहुधा असतेच त्यामुळे पेमेंट करण्यासाठी हा पर्याय वापरल्यास अर्जदारास उपयुक्त ठरू शकते.

तुमचे पेमेंट यशस्वी झाले असेल तर अभिनंदन तुम्हाला लवकरच सौर कृषी पंप मिळणार आहे. मात्र अनेक अर्जदारांचे पेमेंट अयशस्वी होत आहे. पेमेंट फेल होत असेल तर हि एक तांत्रिक अडचण असू शकते. पेमेंट जर फेल झाले तर परत पुन्हा पेमेंट करण्याचा प्रयत्न करू नका. कारण हि प्रोसेस २४ तासात पुन्हा अपडेट होते त्यामुळे तुमचे पेमेंट झाले किंवा नाही हे तुम्हाला कळू शकते.

तर अशा पद्धतीने आपण मोबाईलद्वारे सोलर पंप पेमेंट कसे केले जाते या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे.

कोणाला येणार सोलर पंप लाभार्थी पेमेंट भरण्याचा मॅसेज.

ज्या शेतकरी बांधवानी कुसुम सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला आहे आणि त्यांच्या अर्जाची निवड करण्यात आलेली आहे अशा शेतकऱ्यांना सोलर पंप लाभार्थी पेमेंट भरण्याच्या मॅसेज येतो.

सोलर पंपाचे पेमेंट मोबाईलवरून कसे करावे.

तुम्हाला जर सोलर पंप लाभार्थी हिस्सा भरण्याचा संदेश आला असेल तर त्या संदर्भात तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील पेमेंट करू शकता. पेमेंट कसे करावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *