जाणून घेवूयात श्रावण बाळ योजना निधी संदर्भातील ताजे अपडेट.
श्रावण बाळ योजनेतील खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी निधी आला असून कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी देण्यात आलेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.
जे ओपन लाभार्थी आहेत अशा ओपन लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यासाठी शासनाने चारशे कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिलेली आहे. या संदर्भातील शासन निर्णय आज म्हणजेच दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्द करण्यात आलेला आहे.
जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
तुम्ही जर श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे. खुल्या प्रवर्गातील श्रावण बाळ योजनेच्या बऱ्याच लाभार्थ्यांना निधी अभावी योजनेचा लाभ मिळू शकलेला नव्हता. यामुळे आता खुल्या प्रवर्गातील श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थींना लवकरच अनुदान मिळणार आहे.
पुढील माहिती पण कामाची आहे संजय गांधी निराधार योजना sanjay gandhi niradhar yojana अर्ज
श्रावण बाळ योजना निधी संदर्भातील शासन निर्णय पहा.
दिनांक २१ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्द झालेल्या शासन निर्णयामध्ये खुल्या प्रवर्गातील श्रावण बाळ योजनेसाठी किती निधी दिला जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती दिलेली आहे. श्रावण बाळ योजना निधी संदर्भातील हा जी आर पहा.
हि यादी बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
वित्त विभागाने पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर पुरवणी मागणी पैकी उर्वरित रुपये 400 कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.
त्या अनुषंगाने सर्वसाधारण लाभार्थ्याकरिता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी एप्रिल 2022 ते मार्च 2023 या कालावधीच्या खर्चासाठी मंजूर केलेले रक्कम रुपये 400 कोटी फक्त या शासन निर्णय सोबतच्या विवरण पत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे.
तसेच मासिक वितरण पत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व सह नियंत्रण प्रणालीवर देण्यात आली आहे.
जीआरला खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर यादी दिलेली आहे.
योजनेची फाईल डाउनलोड करा
तुम्हाला माहितच असेल की श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत ज्या लाभार्थींचे नावे दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात आहेत व त्यांचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांपेक्षा पेक्षा कमी आहे अशा ६५ किंवा ६५ वर्षावरील पात्र लाभार्थीस महिन्याला १ हजार रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते.
तुम्ही श्रावण बाळ योजनेसाठी पात्र असाल आणि तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला श्रावण बाळ योजनेची फाईल तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयात जमा करावी लागते.
श्रावण बाळ योजनेची फाईल कशी असते यामध्ये कोणकोणती माहिती सादर करावी लागते या संदर्भात तुम्हाला सविस्तरपणे कल्पना यावी यासाठी श्रावण बाळ योजनेची PDF फाईल खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या.
श्रावण बाळ योजना निधी संदर्भातील हि माहिती तुमच्या मित्रांना पाठवा.
Shravan Bal Yojna Original Documents File Download.pdf (13878 downloads )नुकताच शासनाच्या वतीने श्रावण बाळ योजनेसाठी निधी देण्यात आलेला आहे त्यामुळे लवकरच लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम वर्ग केली जाणार आहे.
श्रावण बाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये योजनेची फाईल विहित कागदपत्रे व माहितीसह जमा करावी लागते. श्रावण बाळ योजनेची नमुना फाईल तुम्ही मोफत डाउनलोड करू शकता त्यासाठी या लेखामध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.