बांधकाम कामगार नोंदणी 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने पहा प्रत्यक्ष उदाहरण bandhkam kamgar yojana

बांधकाम कामगार नोंदणी 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने पहा प्रत्यक्ष उदाहरण bandhkam kamgar yojana

बांधकाम कामगार नोंदणी 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने कशी केली जाते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये प्रत्यक्ष उदाहरणासाहित जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

या लेखामध्ये एक व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे ज्यामुळे तुम्हाला 1 रुपयात बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती मिळेल.

बांधकाम कामगार नोंदणी आणि नुतनीकरण यामध्ये थोडासाच फरक आहे. बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी या संदर्भात सविस्तर माहिती अगोदरच्या लेखामध्ये व्हिडीओसहित दिलेली आहे.

बांधकाम कामगार नोंदणी संदर्भातील माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत कि बांधकाम कामगार नूतनीकारणासाठी पेमेंट कसे करावे लागते. हे पेमेंट तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलचा उपयोग करून देखील करू शकता.

बांधकाम कामगार नोंदणी 1 रुपयात पहा प्रत्यक्ष उदाहरण सहित

ऑनलाईन बांधकाम नूतनीकरण केल्यावर तुमचा अर्ज संबधित विभागाकडे सबमिट झाल्यावर Application Status मध्ये accept असा पर्याय दिसल्यास तुमचा अर्ज बांधकाम कामगार विभागाकडून स्वीकारण्यात आलेला आहे असा त्याचा अर्थ होतो.

बांधकाम कामगार लॉगीन केल्यावर Application Status मध्ये accept जरी दिसत असले तरी registration status inactive दिसत आहे. याचा अर्थ असा आहे कि तुम्ही जो ऑनलाईन अर्ज केला होता तो बांधकाम कामगार विभागाकडून मान्य झालेला आहे तुमची बांधकाम कामगार नोंदणी मात्र अद्याप पूर्ण झालेली नाही.

का झालेली नाही तर तुम्ही अजून पेमेंट केलेले नाही त्यामुळे registration status inactive असे दिसत आहे. त्यामुळे आपण आपल्या मोबाईल मधील फोनपे चा उपयोग करून हि 1 रुपयाची फीस भरून बांधकाम कामगार खाते सक्रीय करणार आहोत. या संदर्भातील व्हिडीओ देखील या लेखामध्ये देण्यात आलेला आहे.

तुम्हाला जर माहित नसेल कि बांधकाम कामगार नूतनीकरण ऑनलाईन कसे करावे तर त्यासाठी येथे क्लिक करा.

1 रुपयामध्ये नोंदणी करण्याची पद्धत

 • तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट व्यवस्थित सुरु असल्याची खात्री करा.
 • गुगलच्या ब्राउजरमध्ये टाईप करा बांधकाम कामगार आणि सर्च करा.
 • सर्च केल्यानंतर बांधकाम कामगार विभागाची वेबसाईट तुमच्या मोबाईलवर ओपन होईल.
 • वेबसाईटला थोडे खाली स्क्रोल केल्यावर profile login हा पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा.
 • लाभार्थीचा आधार नंबर मोबाईल नंबर टाकून proceed to form या बटनावर क्लिक करा.
 • मोबाईलवर आलेला otp टाकून Validate OTP या बटनावर टच करा.
 • आता या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचे सर्व तपशील दिसतील. यामध्ये तुम्ही बघू शकता कि registration status inactive दिसत आहे ते active करण्यासाठी पेजला थोडे खाली स्क्रोल करा.
 • या ठिकाणी तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यापैकी payment details या बटनावर टच करा.
 • पेमेंट लिंक दिलेली असेल या लिंकवर क्लिक करा. लिंकवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून OTP मिळवा.
 • OTP दिलेल्या चौकटीत टाका आणि पुन्हा एकदा validate OTP या बटनावर टच करा.
 • तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पेमेंट तपशील आलेले असतील ते वाचून घ्या. Subscription fee 1 Total amount 1 म्हणजेच या ठिकाणी फक्त १ रुपया फीस अर्जदारास भरावी लागणार आहे.
 • फीस भरण्यासाठी Make renewal payment या बटनावर टच करा.
 • पेमेंट करण्यासाठी असलेले विविध पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. UPI या बटनावर टच करून फोन पे किंवा गुगल पे द्वारे तुम्ही हे पेमेंट करू शकता.
 • जसे हि पेमेंट यशस्वी होईल त्यानंतर एक सूचना येईल Your form is active.
 • अर्जाचे नूतनीकरण झाले आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी पुन्हा एकदा लॉगीन करा. लॉगीन करण्यासाठी याआगोदर सांगितलेल्या पद्धतीचा अवलंब करा.
 • जसे तुम्ही लॉगीन कराल त्यावेळी registration status active झालेले तुम्हाला दिसेल.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पा जेणे करून बांधकाम कामगार नूतनीकरण करण्यासाठी १ रुपया पेमेंट कसे करावे लागते या संदर्भात सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला मदत होईल.

वेबसाईट लिंक

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

1 रुपयात नोंदणी कशी करावी?

तुम्ही रज जर बांधकाम कामगार असाल तर आता केवळ १ रुपयात नोंदणी करता येते. हि नोंदणी कशी करावी लागते या संदर्भात या लेखामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.

बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी लागते?

बांधकाम कामगार नोंदणी कशी करावी लागते या संदर्भात या लेखामध्ये माहिती दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *