अतिवृष्टी नुकसानभरपाई जमा होण्यास सुरुवात बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा

अतिवृष्टी नुकसानभरपाई जमा होण्यास सुरुवात बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा

अतिवृष्टी नुकसानभरपाई जमा होण्यास सुरुवात झाली असून लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. जाणून घेवूयात संपूर्ण माहिती या लेखामध्ये.

सप्टेंबर ऑक्टोबर २०२२ मध्ये शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संदर्भात शासनाने वेळोवेळी शासन निर्णय घेवून नुकसानभरपाई देखील देण्याचे ठरविले होते परंतु शेतकरी बांधवाना हि नुकसान भरपाई मिळण्यास उशीर होत होता.

शासन डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईचे पैसे जमा करील असा निर्णय घेण्यात आला होता. ऑनलाईन नोंदणी झालेल्या अर्जांचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे त्यामुळे काल पासून ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

पुढील योजना पण पहा अतिवृष्टी नुकसानभरपाईचा दुसरा हफ्ता बँकेत जमा होण्यास सुरु

अतिवृष्टी नुकसानभरपाई जमा होण्यास सुरुवात

मागील वर्षी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टीने १२६८००८ शेतकऱ्यांचे आठ लाख 57 हजार 32.12 हेक्टर क्षेत्रातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने शेतकरी बांधवांच्या झालेल्या या पिक नुकसानभरपाई पोटी १२१४ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.

मराठवाड्यातील शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान झाले होते. जून ते ऑगस्ट आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर अशी दोन टप्प्यात हि अतिवृष्टी झाली होती.

जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केली परंतु सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या पिक नुकसानीची मदत अद्याप शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली नव्हती.

त्यामुळे सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या पिक नुकसानीसाठी शासनाने जाहीर केलेल्या १२,६८,००८ शेतकऱ्यांना १२१४ कोटी ७२ लाख रुपयांची अतिवृष्टी नुकसानभरपाई जमा केली जाणार आहे.

खालील व्हिडीओ पहा.

नुकसानभरपाईचा तपशील

छत्रपती संभाजी नगर २६८ कोटी.

जालना ३९७ कोटी.

परभणी ७६ कोटी.

हिंगोली १६ कोटी

नांदेड २५ कोटी

बीड ४१० कोटी

लातूर १९ कोटी

या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना हि मदत मिळणार आहे. या जिल्ह्यांपैकी परभणी आणि धाराशिव जिल्ह्याने स्वतःचे सॉफ्टवेअर विकसित करून या मदतीचे वाटप केले आहे.

बातमी पहा

उर्वरित शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये होणार पैसे जमा

उर्वरित इतर जिल्ह्यांनी मात्र शासनाच्या सॉफ्टवेअरची वाट बघितली. तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी शासनाच्या नव्या सॉफ्टवेअरमध्ये बाधित शेतकऱ्याची माहिती गोळा करण्यासाठी लागला.

हि माहिती ऑनलाईन पद्धतीने गोळा करण्यात आली होती. त्यामुळे मदत लांबीवरच पडत गेली. याचे पडसाद विधानमंडळातही पडले. 31 मार्चपर्यंत मदत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले होते.

नवीन प्रणालीनुसार भरलेल्या माहितीची ८० टक्के तपासणी पूर्ण झाली आहे त्यामुळे आज कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर अतिवृष्टी नुकसानभरपाई जमा वर्ग करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

कधी मिळणार अतिवृष्टी नुकसानभरपाई

३१ मार्च २०२३ पर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी मदत जमा केली जाणार आहे.

कोणते शेतकरी असणार पात्र

ज्या शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला आहे त्यांना हि मदत मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *