जाणून घेवूया sbi क्रेडीट कार्ड पिन जनरेट करण्याची सोपी पद्धत.
सध्या बरेचजण आपल्या ऑनलाईन खरेदी करण्यास इच्छुक असतात. याचे मुख्य कारण म्हणजे ऑनलाईन खरेदी करतांना खूप आकर्षक ऑफर्स असतात त्यामुळे आपल्याला हवी ती वस्तू अगदी कमी किमतीमध्ये मिळते.
ऑनलाईन खरेदी करण्यासाठी तुम्ही जर क्रेडीट कार्डचा उपयोग केला तर आणखी सवलतीच्या दारात या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता.
- sbi क्रेडीट कार्ड पिन जनरेट करतांना गोपनीयता बाळगा
- असा करा sbi क्रेडीट कार्ड पिन जनरेट
- कसे असते sbi क्रेडीट कार्ड
- sbi क्रेडीट कार्ड पिन जनरेट करण्याची खालील पद्धत बघा
- ४ अंकी पिन तयार करा
- कार्डची एक्सपायरी डेट आणि CVV नंबर संबधित महत्वाची माहिती
- सुरक्षिततेच्या दृष्टीने OTP पडताळणी प्रक्रिया महत्वाची
- शाखेत किंवा एटीएमला भेट देण्याऐवजी ऑनलाइन पिन तयार करण्याचे फायदे
- कसा ठेवाल क्रेडीट कार्डचा पिन सुरक्षित
- लेखाचा सारांश
त्यामुळे अनेकजण क्रेडीट कार्डसाठी अर्ज करतांना दिसतात. sbi क्रेडीट कार्ड किंवा इतर कोणतेही क्रेडीट कार्डसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज केल्यावर ते क्रेडीट कार्ड तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पाठविले जाते. त्यानंतर वापरकर्त्यास सदरील क्रेडीट कार्ड सक्रीय करणे गरजेचे असते.
क्रेडीट कार्ड सक्रीय करण्यासाठी वापरकर्त्यास बँक शाखेत भेट द्यावी लागते किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील वापरकर्ता त्यांचे क्रेडीट कार्ड मोबाईल appद्वारे सक्रीय करू शकतात.
तुम्ही जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे कस्टमर असाल आणि तुम्हाला माहित नसेल कि sbi क्रेडीट कार्ड पिन जनरेट कसा करावा तर हा लेख पूर्ण वाचा कारण यामध्ये आपण जाणून घेणार आहोत कि अगदी काही मिनिटांमध्ये sbi क्रेडीट कार्ड पिन जनरेट कसा केला जातो.
sbi क्रेडीट कार्ड पिन जनरेट करतांना गोपनीयता बाळगा
क्रेडीट कार्ड पिन ऑनलाईन पद्धतीने जनरेट केला जात असल्याने बँकेत किंवा ATM मध्ये जाण्यासाठी लागणारा वेळ वाचवता येतो. sbi क्रेडीट कार्डचा पिन हा चार अंकी असतो. एकदा का तुम्ही तुमच्या क्रेडीट कार्डचा पिन जनरेट केला कि मग तो कोणालाही सांगू नका अर्थात हा पिन गोपनीय असू द्या.
चुकून इतरांना तुमच्या क्रेडीट कार्डचा पिन मिळाला तर तुमच्या कार्डचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये अनधिकृत प्रवेश टाळण्यासाठी तुमच्या क्रेडीट कार्डाचा पिन कोणत्याही व्यक्तीस सांगू नका.
या लेखामध्ये एक व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमचा sbi क्रेडीट कार्डचा पिन जनरेट करू शकता. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
या लेखामध्ये आपण sbi क्रेडीट कार्ड संदर्भात खालील माहिती जाणून घेणार आहोत.
- योग्य तपशील टाकून लॉगीन करण्याचे महत्त्व.
- OTP पडताळणी प्रक्रिया कशी असते या संदर्भातील सविस्तर माहिती.
- ऑनलाईन पिन जनरेट केल्याचे मिळणारे फायदे.
- पिन सुरक्षा टिप्स आणि ट्रिक्स.
असा करा sbi क्रेडीट कार्ड पिन जनरेट
तुम्ही दिलेल्या पत्त्यावर बँकेच्या वतीने बंद लिफाफ्यामध्ये क्रेडीट कार्ड पाठविले जाते. क्रेडीट कार्डचा लिफाफा ओपन केल्यावर क्रेडीट कार्डसोबत दिलेल्या मार्गदर्शक पुस्तिकेवर पिन जनरेट करण्यासंबाधी सूचना देखील दिलेल्या असतात.
sbi क्रेडीट कार्ड पिन जनरेशन संदर्भात तुमच्या रजिस्टर्ड इमेल आयडीवर सुद्धा मार्गदर्शक सूचना पाठविल्या असतात. यामध्ये देखील पिन जनरेट कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहिती दिलेली असते.
मोबाईलचा उपयोग करून पिन जनरेट कसा करावा हि माहिती जाणून घेण्याअगोदर जाणून घेवूयात कि क्रेडीट कार्ड कसे असते. त्यावर कोणती माहिती असते.
कसे असते sbi क्रेडीट कार्ड
अर्थशास्त्राच्या भाषेत क्रेडीट या शब्दाचा अर्थ होतो उसनवारी किंवा कोणाकडून तरी उधार घेणे जे कि परत कधीतरी फेडवेच लागणार आहे.
क्रेडीट कार्डद्वारे बँक तुम्हाला ठराविक रक्कम खर्च करण्यास परवानगी देते. क्रेडीट कार्डचा उपयोग करून खर्च केलेली रक्कम परत विहित वेळेत तुम्हाला परतफेड करावी लागते.
ज्या प्रकारे डेबिट कार्ड असते अगदी त्याच आकाराचे क्रेडीट कार्ड असते परंतु डेबिट कार्डचा उपयोग बँकेतील बचत खात्यातील पैसे काढण्यास होतो तर क्रेडीट कार्डद्वारे खरेदी केलेली रक्कम परत बँकेत भरावी लागते.
- sbi क्रेडीट कार्डच्या समोरील बाजूवर १६ अंकी क्रमांक असतो.
- कार्ड वैधतेचा कालावधी.
- वापरकर्त्याचे नाव.
- sbi क्रेडीट कार्डच्या मागील बाजूस सिव्हीव्ही नंबर असतो.
sbi क्रेडीट कार्ड तीन पद्धतीने सक्रीय करता येते.
- बँकेत भेट देवून.
- मोबाईल ॲपद्वारे
- IVR द्वारे Interactive voice response.
या लेखामध्ये आपण मोबाईल ॲपद्वारे sbi क्रेडीट कार्ड पिन जनरेट कसा केला जातो या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
पुढील माहिती पण वाचा अण्णासाहेब पाटील लोन योजना बँक ऑफ इंडिया देणार कर्ज
sbi क्रेडीट कार्ड पिन जनरेट करण्याची खालील पद्धत बघा
या लेखामध्ये एक व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही तुमच्या क्रेडीट कार्डचा पिन निर्माण करू शकता.
- गुगल प्ले स्टोअर मधील सर्च बारमध्ये sbi card असा कीवर्ड टाकून सर्च करा.
- आता तुमच्या स्क्रीनवर sbi card ॲप दिसेल ते मोबाईलमध्ये इंस्टाल करून घ्या.
- sbi card ॲप ओपन केल्यावर विविध पर्याय दिसतील त्यापैकी first time user sign up या पर्यायावर टच करा.
- तुमच्या मोबाईल डिव्हाईस संदर्भात माहिती दिसेल. I trust this device हा पर्याय चालू करा. Link device या पर्यायावर टच करा.
- तुमच्या sbi क्रेडीट कार्डचा १६ अंकी क्रमांक टाका.
- sbi क्रेडीट कार्डचा सिव्हीव्ही नंबर टाका.
- जन्मतारीख टाका.
- सर्वात शेवटी Generate OTP या पर्यायावर टच करा.
- जसे हि तुम्ही Generate OTP या पर्यायावर टच कराल त्यावेळी तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर ६ अंकी otp पाठविला जाईल तो व्यवस्थित टाईप करा आणि continue या पर्यायावर टच करा.
- sbi card ॲप लॉगीन करण्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड तयार करा.
- युजरनेम आणि पासवर्ड तयार केल्यानंतर sign up या पर्यायावर क्लिक करा.
- आता ४ अंकी M पिन तयार करण्याचा पर्याय तुम्हाला मिळेल. एम पिन तयार करून घ्या.
- एम पिन तयार केल्यानंतर continue या पर्यायावर क्लिक करा.
- नियम व अटी स्वीकारण्यासाठी दिलेल्या चौकोनी बॉक्समध्ये टिक करून accept या बटनावर क्लिक करा किंवा टच करा.
- Get Started या बटनावर टच करा.
- आता या ठिकाणी परत एकदा तुम्हाला ४ अंकी एम पिन तयार करायचा आहे तो तयार करून घ्या.
४ अंकी पिन तयार करा
- एम पिन तयार केल्यानंतर continue या पर्यायावर क्लिक करा.
- नियम व अटी स्वीकारण्यासाठी दिलेल्या चौकोनी बॉक्समध्ये टिक करून accept या बटनावर क्लिक करा किंवा टच करा.
- Get Started या बटनावर टच करा.
- आता या ठिकाणी परत एकदा तुम्हाला ४ अंकी पिन तयार करायचा आहे तो तयार करून घ्या.
- Generate OTP या पर्यायावर टच करा. तुमच्या मोबाईलवर आलेला ६ अंकी OTP दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि Next या बटनावर क्लिक करा.
तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या sbi क्रेडीट कार्डचा पिन जनरेट करू शकता. sbi card ॲपमध्ये तुम्ही तुमचे कार्ड नियंत्रित करू शकता जसे कि कोणते व्यवहार चालू ठेवायचे आणि कोणते बंद करायचे जसे कि
online transactions
point of sell transactions.
contactless transactions.
ATM transactions.
International transactions.
वरील व्यवहार चालू किंवा बंद करतांना otp आवश्यक असतो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणून घेतले आहे कि कशा पद्धतीने sbi card ॲपचा उपयोग करून क्रेडीट कार्डचा पिन जनरेट केला जातो.
खालील व्हिडीओ पहा.
कार्डची एक्सपायरी डेट आणि CVV नंबर संबधित महत्वाची माहिती
तुमच्या SBI क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन नवीन पिन तयार करताना कार्डची एक्सपायरी डेट आणि CVV नंबर या संबधित अचूक तपशील टाकणे महत्त्वाचे खूपच महत्वाचे असते.
हे तपशील टाकून क्रेडिट कार्डचे प्रमाणीकरण आणि नवीन पिन जनरेट करण्यास सुविधा प्राप्त होते.
कालबाह्यता तारीख ही तारीख असते ज्यानंतर तुमचे क्रेडिट कार्ड अवैध होते. क्रेडीट कार्डचा CVV क्रमांक हा कार्डच्या मागील बाजूस छापलेला तीन-अंकी सुरक्षा कोड असतो. हे तपशील तुमच्या क्रेडिट कार्डसाठी इतरांपेक्षा वेगळे असतात.
सुरक्षिततेच्या दृष्टीने OTP पडताळणी प्रक्रिया महत्वाची
SBI क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन नवीन पिन तयार करताना OTP पडताळणी क्रिया ही एक महत्त्वाची सुरक्षा उपाय आहे. OTP म्हणजे वन-टाइम पासवर्ड होय जो कि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर पडताळणीसाठी पाठवला जाणारा एक अद्वितीय कोड असतो.
जेव्हा तुम्ही पिन तयार करण्याची प्रक्रिया ऑनलाइन सुरू करता, तेव्हा तुम्हाला तुमच्या कार्डची एक्सपायरी तारीख आणि CVV नंबर एंटर करावे लागते.
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की OTP हा एक-वेळचा कोड आहे जो थोड्या कालावधीनंतर कालबाह्य होतो. त्यामुळे, पिन तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ओटीपी त्वरित सबमिट करणे आवश्यक आहे.
तुम्हाला OTP न मिळाल्यास किंवा पडताळणी प्रक्रियेदरम्यान काही समस्या आल्यास, तुम्ही मदतीसाठी SBI कार्ड कस्टमर केअरशी संपर्क साधू शकता.
शाखेत किंवा एटीएमला भेट देण्याऐवजी ऑनलाइन पिन तयार करण्याचे फायदे
सध्या प्रत्येकाकडे वेळेची कमी आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या sbi क्रेडीट कार्डचा पिन जनरेट करण्यासाठी बँकेत जाण्यास खूप वेळ लागतो. अशावेळी मोबाईल app चा उपयोग केल्यास वेळ वाचतो.
ऑनलाइन पिन जनरेशन प्रक्रिया तुम्हाला घरून किंवा ऑफिसमधून एखाद्या शाखेत किंवा एटीएमला भेट न देता नवीन पिन तयार करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
गतिमान प्रक्रिया – ऑनलाइन पिन तयार करण्याची प्रक्रिया सामान्यतः पारंपारिक पद्धतींपेक्षा जलद आणि अधिक कार्यक्षम असते. तुम्ही काही मिनिटांत नवीन पिन ऑनलाइन जनरेट करू शकता.
सुरक्षित प्रक्रिया :- ऑनलाइन पिन निर्मिती प्रक्रिया सुरक्षित आणि अधिकृत आहे. ओटीपी पडताळणी प्रक्रियेद्वारे हे सुनिश्चित केले जाते की केवळ क्रेडिट कार्डचा योग्य मालकच नवीन पिन तयार करू शकतो. हे फसव्या activity प्रतिबंधित करते आणि आपल्या खात्याची सुरक्षितता अधिक वाढविते.
सुलभ प्रवेशयोग्यता :- ऑनलाइन पिन तयार करणे 24/7 उपलब्ध आहे, जे तुम्हाला तुमच्यासाठी सोयीस्कर असलेल्या कोणत्याही वेळी नवीन पिन निर्माण करण्याची सुविधा उपलब्ध करून देते.
एकूणच, तुमच्या SBI क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन पिन तयार करणे ही एक सोयीस्कर, कार्यक्षम आणि सुरक्षित प्रक्रिया आहे जी पारंपारिक पद्धतींपेक्षा अनेक फायदे देते. तुमच्या खात्याची सुरक्षितता सुनिश्चित करताना ते वेळ आणि श्रम वाचवते.
कसा ठेवाल क्रेडीट कार्डचा पिन सुरक्षित
खालील काही सूचनांचे पालन करून तुम्ही तुमचा पिन सुरक्षित ठेवू शकता.
तुमचा पिन लक्षात ठेवा :- तुमचा पिन लिहून ठेवणे किंवा तो तुमच्या वॉलेटमध्ये ठेवणे टाळा. ते लक्षात ठेवा आणि गोपनीय ठेवा.
पिन शेअर करू नका :- तुमच्या क्रेडीट कार्डचा पिन कधीही कोणाला सांगू नका, जरी तो तुमचा विश्वास असलेला कोणी असला तरीही. तुमचा पिन वैयक्तिक आहे आणि तो नेहमी गोपनीय ठेवला पाहिजे.
तुमच्या क्रेडीट कार्डचा पिन नियमितपणे बदला : तुमच्या अकाऊंटमध्ये अनधिकृत लॉगीन टाळण्यासाठी तुमच्या क्रेडीट कार्डचा पिन नियमितपणे बदलणे योग्य राहील.
मजबूत पिन वापरा :- कोणत्याही व्यक्तीस अथवा मशीनला अंदाज लावणे कठीण जाईल असा पिन वापरा.
पिनचा उपयोग करतांना इतरांपासून त्याचे संरक्षण करा : एटीएम किंवा POS मशीनवर तुमचा पिन एंटर करताना तुमच्याकडे कोणीही लक्ष देत नाही याची खात्री करा. पिन टाकताना कीपॅड तुमच्या हाताने झाकून ठेवा.
फिशिंग स्कॅम्सपासून सावध रहा :- स्कॅमर तुम्हाला तुमचा पिन किंवा वैयक्तिक माहिती देण्यास सांगणारे खोटे ईमेल किंवा मजकूर संदेश पाठवू शकतात. कोणतीही माहिती देण्यापूर्वी नेहमी आलेल्या संदेशाची खातरजमा करा.
संशयास्पद activity संदर्भात तक्रार करा :- तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये कोणतीही अनधिकृत गतिविधी आढळल्यास पुढील नुकसान टाळण्यासाठी ताबडतोब बँकेला कळवा.
वरील सूचनांचे पालन करून तुम्ही तुमच्या SBI क्रेडिट कार्डचा पिन सुरक्षित ठेवू शकता.
एसबीआय क्रेडीट कार्डची अधिकृत वेबसाईट
लेखाचा सारांश
तुमच्याकडे जर sbi क्रेडीट कार्ड असेल आणि तुम्हाला ते घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने सक्रीय म्हजेच activate करायचे असेल तर ऑनलाईन पद्धतीने sbi card app च्या सहाय्याने तुम्ही ते घरच्या घरी करू शकता.
या लेखामध्ये sbi क्रेडीट कार्ड पिन जनरेट कसा करावा तसेच पिन सुरक्षित कसा ठेवावा या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.
SBI card app चा उपयोग करून क्रेडीट कार्डचा पिन निर्माण करता येतो.
एसबीआय क्रेडीट कार्ड संदर्भात या लेखामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.