शेतकऱ्यांचे जमा होणारे अनुदान परस्पर कर्ज खात्यामध्ये वर्ग करू नका असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
२०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील कपाशी, सोयाबीन व मकासहित इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.
या नुकसानभरपाई पोटी शासनाकडून शेतकरी बांधवाना आर्थिक मदत देखील जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
अनेक शेतकरी बांधवांची हि अनुदानाची रक्कम बँकेद्वारे कर्ज खात्यामध्ये जमा केली जात असल्याचे आढळून आल्याने अनेक शेतकऱ्यांनी या संदर्भात तक्रार केली आहे.
ऐनवेळी पैशांची गरज असताना जमा होणारे अनुदान कर्ज खात्यात वर्ग केल्याने शेतकरी बांधवांची मोठी पंचाईत होत आहे. शेतकऱ्यांचे अनुदान परस्पर कर्ज खात्यात वर्ग केल्याने शेतकरी वर्गामध्ये खूप नाराजीचा सूर उमटत आहे.
पुढील माहिती पण वाचा गाय म्हैस अनुदान वाढले गाय 70 म्हशीसाठी 80 हजार अनुदान
शेतकऱ्यांचे जमा होणारे अनुदान कर्ज खात्यात होत आहे जमा
राज्य सरकारच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारे जे काही नुकसान भरपाई अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्यासाठी बँकांनी सक्ती करू नये अशा प्रकारचे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहेत.
काही बँक शेतकऱ्यांना कोणतीही सूचना न देता सदरील अनुदान शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात वळती करून कर्ज वसुली कसरत आहेत. या संदर्भात शेतकऱ्यांकडून तक्रारी दाखल केल्या जात आहेत. त्यामुळे आता हे अनुदान शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये वर्ग करू नये अशा सूचना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी बँकांना दिल्या आहेत.
सूचना देऊनही बँकांनी नुकसानभरपाई अनुदान कर्ज खात्यात जमा करण्याची सक्ती केली तर संबधित बँकावर कारवाई करा असे कृषी मंत्री यांनी निर्देश दिले आहेत.
अधिकृत माहिती पहा
पिक विमा उतरविणे गरजेचा
अतिवृष्टी त्यानंतर गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12000 कोटी रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली होती. त्या अनुषंगाने आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसानीचे अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
शेतकरी बांधवानी आपापल्या शेतातील पिकांचा पिक विमा आवश्य उतरवून घेतला पाहिजे जेणे करून नैसर्गिक अप्पातीमुळे पिकांचे नुकसान झाले तर पिक विमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळू शकते.
पिक विमा अगदी मोबाईलवरून देखील काढता येते. तुम्हाला जर माहित नसेल कि पिक विमा ऑनलाईन अर्ज कसा करावा तर खालील व्हिडीओ पहा.