50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेचे प्रस्ताव सुरु झाले कर्ज मिळविण्यासाठी तुमचा प्रस्ताव लगेच सादर करून द्या.

50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेचे प्रस्ताव सुरु झाले कर्ज मिळविण्यासाठी तुमचा प्रस्ताव लगेच सादर करून द्या.

50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी या योजनेचा लाभ मिळू शकतो. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.

तुम्हाला जर उद्योग व्यवसाय करायचा असेल आणि तुमच्याकडे भागभांडवल नसेल तर तुम्ही 50 टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेचा लाभ घेवून तुमचा व्यवसाय सुरु करू शकता.

या योजना अंतर्गत शासनाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. जाणून घेवूयात 50 टक्के अनुदान योजना संदर्भात सविस्तर माहिती.

अनेक तरुणांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी आर्थिक भांडवलाची गरज असते. अशावेळी त्यांना आर्थिक सहाय्य मिळत नसल्याने असे तरुण त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करू शकत नाहीत. तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी शासनाच्या विविध योजना सुरु असतात. परंतु अशा योजनांची माहिती न मिळाल्याने अनेक तरुण अशा योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असते.

पुढील योजनेचा पण लाभ घ्या बांधकाम कामगार नोंदणी 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने पहा प्रत्यक्ष उदाहरण bandhkam kamgar yojana.

50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेचा लाभ घेवून सुरु करा व्यवसाय

व्यवसाय सुरु करण्यासाठी बीज भांडवल उपलब्ध करून देणारी अशीच एक योजना म्हणजे महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या पन्नास टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजना होय.

या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी प्रस्ताव स्वीकारणे सुरु झालेले आहे. जाणून घेवूयात या कर्ज योजनेविषयी सविस्तर माहिती या लेखामध्ये.

2023-24 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा कार्यालय मुंबई व उपनगर अंतर्गत 50 टक्के अनुदान व बीज भांडवल या दोन योजना राबविल्या जात आहेत.

दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध अर्जदार घेवू शकतात. जे अर्जदार या कर्ज योजनेसाठी अर्ज सदर करणार आहेत त्यांनी या महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

जर यापूर्वी लाभ घेतलेला असेलत तर असे लाभार्थी या कर्ज योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.

कर्ज योजनेच्या काही ठळक बाबी खालीलप्रमाणे आहे

 1. अर्जदार हा 18 वर्षांवरील असावा.
 2. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत असावे.
 3. 50 टक्के अनुदान योजनेअंतर्गत, प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत असणे गरजेचे आहे.
 4. जो प्रकल्प असेल त्या प्रकल्प मर्यादेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 10 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरीत रक्कम बँकेमार्फत देण्यात येते.
 5. बीज भांडवल योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा 50 हजार ते 5 लाखापर्यंत असणे गरजेचे आहे.
 6. अर्जदाराने सादर केलेल्या प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत देण्यात येते. यासाठी व्याज आकारले जाते. हे व्याज ४ टक्के दर साल दर शेकडा या प्रमाणे आकारण्यात येते.
 7. महामंडळाच्या 20 टक्के बीज भांडवल कर्जानंतर बँकेचे कर्ज 75 टक्के देण्यात येते व बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येते.
 8. महामंडळाचे 20 टक्के व बँकेच्या 75 टक्के कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हफ्त्यानुसार करावी लागते. अर्जदारास कर्जाची परतफेड 3 ते 5 वर्षाच्या आत करावी लागते.
 9. सर्वात महत्वाचे म्हणजे या कर्ज योजनेसाठी अर्जदारास 5 टक्के स्वत:चा सहभाग भरणे गरजेचे असते.

तुम्ही जर पात्र अर्जदार असाल तर या योजनेसाठी कर्ज प्रास्तव सादर करून द्या. कर्ज प्रस्ताव सादर करण्यासाठी इच्छुकांनी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित गृहनिर्माण भवन, कलानगर, मुंबई उपनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई -51 त्यांचे कर्ज प्रस्ताव सादर करायचे आहेत.

50 टक्के अनुदान योजना स्वरूप

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळावतीने अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यापैकी एक योजना म्हणजे अनुदान योजना होय.

या योजनेमधून कमीतकमी  किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपयांचे कर्ज राष्ट्रीयकृत बँकेच्या वतीने अर्जदारास उपलब्ध करून देण्यात येते.  बँकेच्या वतीने ५० टक्के तर महामंडळाच्या वतीने ५० अशा प्रकारे या योजनेचे स्वरूप आहे.

योजना अशी राबविली जाते.

आता कदाचित तुम्हाला हा प्रश्न पडू शकतो कि योजना नेमकी राबविली कशी जाते, तर त्याविषयी देखील आपण सविस्तर माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

 1. योजनेचा लाभ घेण्यासाठी जी आवश्यक कागदपत्रे असतात ती अर्जदाराकडून घेतली जातात.
 2. अर्जदारांच्या कागदपत्रांची शहानिशा केल्यावर महामंडळाकडून योग्य प्रस्ताव बँकेला पाठविला जातो.
 3. बँकेच्या वतीने जर अर्जदाराचे कर्ज मंजूर करण्यात आले तर महामंडळाच्यावतीने सदरील बँकेस १० हजार रुपये किंवा यापेक्षा जी रक्कम कमी असेल त्या रकमेचा धनादेश पाठविला जातो.
 4. महामंडळाकडून धनादेश प्राप्त झाल्यावर अर्जदारास बँकेच्या वतीने कर्जाची रक्कम धनादेशाद्वारे दिली जाते.

कर्ज मंजूर कारणासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

 1. अर्जदाराचा जातीचा दाखला.
 2. उत्पनाचा दाखला.
 3. अर्जदाराचा रहिवासी पुरावा.
 4. व्यवसायाच्या संदर्भातील कागदपत्रे जसे कि मालाचे किमतीपत्रक

वरील प्रकारची कागदपत्रे 50 टक्के अनुदान योजनेसाठी आवश्यक असणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

योजनेची कार्यवाही खालीलप्रमाणे होते

 1. संबधित यंत्रणेकडून अर्जदाराचे घर व अर्जदार ज्या जागी व्यवसाय करतो त्या जागेची पडताळणी केली जाते.
 2. सर्व पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जे प्राप्त कर्ज प्रकरणे आहेत ते मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत त्या प्रकरणांची छाननी करुन मान्यता दिली केली जाते.
 3. जिल्हा लाभार्थी निवड समितीद्वारे जी मंजूर झालेली कर्ज प्रकरणे आहेत ती संबंधित जिल्हा कार्यालयामार्फत राष्ट्रीयीकृत बँकांना मंजुरीसाठी शिफारस करण्यात येतात.
 4. राष्ट्रीयीकृत बँकांकडून अशा प्रकरणांना मंजूरी प्राप्त झाल्यानंतर अनुदानाची रक्कम महामंडळाकडून संबंधित बँकांकडे वितरीत केली जाते.

अधिकृत माहिती लिंक

वेबसाईट लिंक

अर्ज ऑनलाईन आहे कि ऑफलाईन?

अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे.

ऑफलाईन अर्ज कोठे करावा?

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित गृहनिर्माण भवन, कलानगर, मुंबई उपनगर, वांद्रे (पूर्व), मुंबई -51 या ठिकाणी अर्ज सादर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *