लखनौच्या ट्वीटला पंजाब पोलिसांचे उत्तर MI चाहते म्हणताहेत बदला पूर्ण झाला

लखनौच्या ट्वीटला पंजाब पोलिसांचे उत्तर MI चाहते म्हणताहेत बदला पूर्ण झाला

लखनौच्या ट्वीटला पंजाब पोलिसांचे उत्तर

टाटा आयपीएल Tata IPL स्पर्धेदरम्यान काल दिनांक २८ एप्रिल २०२३ रोजी सामना खेळण्यात आला. या सामन्यामध्ये चौकार षटकारांचा पाउस पाडत लखनौ सुपर जायन्ट्सने Lucknow Super Giants LSG पंजाब किंग्जचा Punjab Kings ५६ धावांनी पराभव केला.

पंजाब किंग्जने नाणेफेक toss जिंकून लखनौ सुपर जायन्ट्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. लखनौ सुपर जायन्ट्स संघाच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळ करत २० षटकांमध्ये २५७ एवढी मोठी धावसंख्या उभारली. आपीएल इतिहासातील हि आजपर्यंत सर्वोत्तम दुसरी धावसंख्या ठरली.

पंजाब किंग्जने हा सामना ५६ धावांनी गमविल्यानंतर लखनौ सुपर जायन्ट्सच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून पंजाब पोलिसांना टॅग करून एक मजेशीर ट्वीट करण्यात आले आहे यामुळे चाहत्यांच्या मनोरंजनामध्ये अधिकच भर पडलेली आहे.

लखनौकडून पंजाब पोलिसांना ट्वीट

लखनौ सुपर जायन्ट्सच्या संघातील नवीन उल हक Naveen-ul-haq या गोलंदाजाने त्याच्या १८ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर पंजाब किंग्ज संघाचा फलंदाज कागीसो रबाडा Kagiso Rabada या फलंदाजास त्रिफळाचीत केले clean bold. यष्टी Stumps जमिनीपासून दूर फेकल्या गेली.

याच बाबीला धरून लखनौ सुपर जायन्ट्सच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून पंजाब पोलिसांना टॅग करून एक मजेशीर ट्वीट करण्यात आले ते असे होते. Hey, @PunjabPoliceInd. This is awkward… awkward या शब्दाचा मराठी अर्थ म्हणजे अस्तव्यस्त करणे होय.

खालील ट्वीट बघा.

लखनौ सुपर जायन्ट्सकडून हे असे ट्वीट करण्याचा उद्देश म्हणजे २२ एप्रिल २०२३ रोजी मुंबई इंडियन्स Mumbai Indians आणि पंजाब किंग्ज संघामध्ये सामना खेळविण्यात आला होता.

WhatsApp Group Link

हे आहे ट्वीट करण्याचे कारण

पंजाब किंग्जच्या अर्शदीप सिंगच्या Arshdeep Singh शेवटच्या म्हणजेच १९ व्या षटकामध्ये मुंबई इंडियन्स संघाला सामना जिंकण्यासाठी ४ चेंडूमध्ये १५ धावांची आवश्यकता असतांना अर्शदीप सिंगने दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवर अनुक्रमे तिलक वर्मा ३ धावा व प्रभावी खेळाडू नेहाल वढेरा याला शून्यावर बाद केले.

अर्शदीप सिंगचा मारा एवढा भेदक होता कि तीन यष्टीमधील मधल्या यष्टीचे दोन्ही वेळा दोन तुकडे झाले. याच घटनेचा धागा पकडून आनंदाच्या भरात पंजाब किंग्जने तुटलेल्या यष्टीचे broken stumps छायाचित्र पोस्ट करून आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून मुंबई पोलिसांना टॅग करून असे ट्वीट केले होते. Hey @MumbaiPolice, we’d like to report a crime. आम्हाला गुन्हा नोंदवायचा आहे असा त्याचा अर्थ होता.

खालील ट्वीट बघा.

मुंबई पोलिसांनी देखील पंजाब किंग्जच्या या पोस्टला मजेशीर प्रतिउत्तर दिली. नियम तोडणे गुन्हा आहे यष्टी तोडणे नव्हे अशी प्रतिक्रिया दिल्यानंतर दिवसभर चाहत्यांनी या पोस्टवर टीका टिप्पणी सुरु केली होती.

मजेशीर गोष्ट म्हणजे काल झालेल्या जेंव्हा पंजाब किंग्ज संघाचा फलंदाज कागीसो रबाडा या फलंदाजास त्रिफळाचीत केले त्या घटनेचे छायाचित्र पोस्ट करून Hey, @PunjabPoliceInd. This is awkward.. अशी ओळ देत ट्वीट केले आहे.

MI चाहते म्हणताहेत बदला पूर्ण झाला

मुंबई इंडियन्स चाहत्यांच्या मते लखनौ सुपर जायन्ट्सने मुंबई इंडियन्स संघाचा पंजाब किंग्जने केलेल्या पराभवाचा एक प्रकारचा बदलाच घेतला आहे मजेशीर ट्वीट दिवसभर फिरत आहे.

पंजाब पोलिसांनी देखील लखनौ सुपर जायन्ट्सने केलेल्या या ट्वीटला मजेशीर उत्तर दिले आहे. No it’s not, everything is fair in Love, War and Cricket And also as @MumbaiPolice says breaking stumps is not a crime, breaking rules is. नक्कीच नाही. प्रेम युद्ध आणि क्रिकेटमधेय सगळे काही माफ असते जसे कि मुंबई पोलिसांनी म्हटल्याप्रमाणे यष्टी तोडणे गुन्हा नाही मात्र नियम तोडला तर तो नक्कीच गुन्हा होऊ शकतो.

लखनौच्या ट्वीटला पंजाब पोलिसांचे उत्तर

टाटा आयपीएल उद्घाटनामुळे सर्व जगाचे डोळे दिपले आहेत. आयपीएल मधील सामने देखील अतिशय रोमांचक होत असल्याने दिवसेंदिवस आयपीएलची लोकप्रीयता वाढत चाललेली आहे. अशातच अधून मधून अशा मजेशीर कोपरखळ्यांनी प्रेक्षकांचे अधिकच मनोरंजन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *