शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कांदाचाळ अनुदान वाढले असून शेतकरी आता या योजनेचा लाभ घेवू शकतात. जाणून घेवूयात या संदर्भात सविस्तर माहिती.
शेतकरी बांधवांसाठी पिक साठवणूक करणे खूपच महत्वाचे असते. विशेषतः तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर कांदा साठवणूक करण्यासाठी कांदा चाळ असणे खूपच गरजेचे असते.
अनेक शेतकरी कांदा पिकांचे पिक घेण्यास इच्छुक असतात परंतु कांदा साठवणुकीसाठी त्यांच्याकडे कांदाचाळ नसल्याने ते कांदा पिक लावू शकत नाहीत परिणामी अशा शेतकरी बांधवाना आर्थिक फटका बसतो.
त्यामुळे तुम्हाला जर या कांदाचाळ योजनेचा लाभ मिळाला तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो. या संदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे.
कांदाचाळ अनुदान वाढले शेतकरी बांधवानी लाभ घ्यावा.
शेतकरी बांधवाना कांदाचाळ उपलब्ध नसल्याने ते पिक लगेच विक्रीसाठी काढावे लागते परिणामी त्यांना हवा तो भाव त्यासाठी मिळत नाही. कांदा साठवणुकीसाठी कांदाचाळ असेल तर मात्र हवा तेंव्हा कांदा विक्रीस काढता येतो.
कांदाचाळ उभारणीसाठी मोठा खर्च येत असल्याने अनेक शेतकरी बांधव कांदाचाळ उभारू शकत नाही त्यामुळे कांदाचाळीसाठी शासनाकडून अनुदान दिले जाते.
शासनाकडून मिळत असलेले अनुदान कांदाचाळ उभारण्यासाठी खूपच कमी असून या अनुदानामध्ये कांदाचाळ बांधकाम करण्यास अडचणी येत होत्या.
त्यामुळे आता कांदाचाळ बांधकाम अनुदान वाढविण्यात आले असून यापुढे कांदाचाळीसाठी १ लाख ६० हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा रोजगार हमी मंत्र्यांनी केली आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
पुढील माहिती पण वाचा कांदा चाळ योजना निधी आला ऑनलाईन अर्ज सुरु बघा जीआर
कांदाचाळ बांधकामासाठी मिळणार १ लक्ष ६० हजार रुपये एवढे अनुदान
कांदाचाळ उभारणीसाठी १ लक्ष ६० हजार रुपये एवढे अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा रोजगार हमी योजना मंत्री यांनी केली आहे. या संदर्भात कांदाचाळ शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे.
कांदा हे पिक ठराविक सीजनमध्ये घेतले जाते असे असले तरी कांद्याला वर्षभर मागणी असते. त्यामुळे कांदा पिकास चांगला भाव राहण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकरी बांधव कांदा लागवड करण्यास इच्छुक असतात.
रोजगार हमी योजनेतून कांदाचाळ योजनेचे जे काम केले जाणार आहे ते अकुशल व कुशल यांच्या प्रमाणात केले जाणार आहे. हे प्रमाण ६०:४० असणार आहे.
महाडीबीटी पोर्टलवर देखील करता येते ऑनलाईन अर्ज
कांदाचाळ बांधकाम करण्यासाठी शासनाकडून १ लाख ६० हजार एवढे अनुदान दिले जाणार आहे. मनरेगा योजना अंतर्गत अकुशलसाठी ६० टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे म्हणजेच ९६,२२० रुपये.
कुशल मनुष्यबळासाठी ४० टक्के निधी जो कि ६४१४७ रुपये एवढा असणार आहे. अधिक साहित्य खर्च हिशोबात धरून कांदाचाळ योजनेसाठी १,६०,३६७ एवढे अनुदान दिले जाणार आहे.
कांदाचाळ बांधकामासाठी एकूण खर्च ४,५८,७३० एवढा येणार असून अनुदान वगळता उर्वरित रक्कम हि लोकसहभागातून जमा केली जाणार आहे जी कि २,९८,३६३ एवढी असणार आहे.
तुम्हाला देखील कांदाचाळ योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या गावातील ग्रामपंचायत,ग्रामसेवक किंवा रोजगार सेवक यांच्याशी संपर्क साधा.
कांदाचाळ योजनेसाठी महाडीबीटी वेबसाईटवर देखील ऑनलाईन अर्ज करता येतो. हा अर्ज कसा करावा लागतो हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
कांदाचाळ योजनेसाठी आता १,६०,३६७ एवढे अनुदान मिळणार आहे.
कांदाचाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा.
होय महाडीबीटी पोर्टलवर कांदाचाळ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील व्हिडीओ देखील या लेखामध्ये दिलेला आहे.