बियाणे अनुदान योजना 2024 योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात या लेखामध्ये. लवकरच पावसाळा सुरु होणार असल्याने शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामाला लागलेले आहेत. अनेक शेतकरी बांधवाना शेतीसाठी लागणाऱ्या बियाण्यांची चिंता असून त्यासाठी तयारीला देखील वेग आलेला आहे.
पेरणीसाठी तुम्ही बियाण्याची चिंता करीत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे कि शासनाकडून तुम्हाला अनुदानावर बियाणे मिळणार आहे.
हे बियाणे ५० टक्के अनुदानावर असल्याने अर्धी रक्कम भरून तुम्ही सोयाबीन कापूस, तूर उडीद मुग किंवा दिलेल्या यादीतील कोणत्याही पिकांच्या बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि बियाणे अनुदान योजना 2023 या योजनेचा लाभ मिळवू शकता.
पुढील माहिती पण वाचा Tractor scheme list ट्रॅक्टर योजना लाभार्थी याद्या आल्या पहा तुमचे नाव
बियाणे अनुदान योजना 2024 अंतर्गत अनुदानावर मिळणारे बियाणे खालीलप्रमाणे आहे.
कापूस
उडीद
तूर.
नाचणी.
बाजरी.
भुईमुग.
भात.
मका.
मुग.
वरई/भगर.
सोयाबीन
वरील बियाणे शासकीय अनुदानावर मिळविण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेच्या आत बियाण्यांसाठी अर्ज सादर करून द्या.
बियाण्यासाठी ऑनलाईन अर्ज शेतकरी स्वतः देखील करू शकतात. हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात या लेखामध्ये
बियाणे अनुदान योजना 2024 संदर्भातील व्हिडीओ पहा आणि त्याप्रमाणे अर्ज सादर करा
शेतकरी बांधवांसाठी शासन विविध योजना राबवीत असते परंतु या योजनांची माहितीच शेतकरी बांधवाना योग्य वेळी मिळत नसल्याने अनेक शेतकरी बांधव अशा योजनांपासून वंचित राहू शकतात.
बियाणे अनुदान 2024 योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच तुमचा ऑनलाईन अर्ज महाडीबीटी वेबसाईटवर सादर करून द्या.
या लेखामध्ये बियाणे अनुदान योजनेसाठी लागणारी सविस्तर माहिती दिल्याने लेख थोडा मोठा झालेला आहे. त्यामुळे तुमच्यासाठी खास व्हिडीओ देखील उपलब्ध करून दिलेला आहे. व्हिडीओ या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे. तो व्हिडीओ बघून देखील तुम्ही बियाणे अनुदान योजना 2024 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
Mahadbt krushi yojana रोपवाटिका अनुदान योजना
बियाणे अनुदान योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज
महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी जो ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे तो अगदी सोपा आहे. तुम्हाला जर पूर्ण माहिती असेल तर केवळ पाच मिनिटामध्ये हा अर्ज सादर करता येतो.
अर्ज करण्यापूर्वी तुमच्या तालुक्यातील कृषी विभागाशी संपर्क साधल्यास अधिक सोयीचे होते. कारण त्यांच्याकडे वाण कोणते उपलब्ध आहे हे आपल्याला कळू शकते आणि त्यानुसार बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज केला तर अधिक सोयीचे ठरू शकते.
अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे
तुमच्या कॉम्प्युटरमधील गुगलच्या सर्चबारमध्ये महाडीबीटी शेतकरी योजना शोधा त्यासाठी mahadbt farmer login असा कीवर्ड सर्च करा.
महाडीबीटी शेतकरी पोर्टल ओपन झाल्यावर युजरआयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा किंवा आधार OTP च्या सहाय्याने देखील तुम्ही लॉगीन करू शकता.
एकदा का तुम्ही लॉगीन केले कि मग अर्ज करा हि लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
आता तुम्हाला विविध पर्याय दिसतील यापैकी बियाणे औषधे व खते या पर्यायासमोरील बाबी निवडा या बटनावर क्लिक करा.
अर्ज करतेवेळी एक बाब लक्षात असू द्या कि बियाणे अनुदान दोन पद्धतीने मिळते एक म्हणजे प्रात्यक्षिक आणि दुसरी म्हणजे प्रमाणित. प्रात्यक्षिक बियाण्यासाठी १०० टक्के अनुदान असते तर प्रमाणित बियाण्यासाठी ५० टक्के अनुदान मिळते.
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक
अर्ज सादर करतांना खालील माहिती भरा
तुमचा तालुका, गाव, शहर, सर्वे क्रमांक इत्यादी माहिती अगोदरच उपलब्ध असेल हि माहिती तुम्ही ज्यावेळी महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी केली होती त्या आधारावर हि माहिती या ठिकाणी आपोआप आलेली असेल.
बाब निवडा मध्ये बियाणे असेल. पिक निवडा. पिक निवडल्यावर ज्यासाठी अनुदान हवे आहे ती बाब निवडायची आहे जसे कि प्रमाणित बियाण्यांचे वितरण किंवा पिक प्रात्यक्षिक.
बियाण्याचा प्रकार निवडा. त्यांतर तुम्हाला जुने वाण हवे आहे कि नवे ते निवडावे लागेल. जे वाण हवे असेल ते दिलेल्या यादीतून निवडा.
किती क्षेत्रावर पिकाची लागवड करायची आहे ते क्षेत्र दिलेल्या चौकटीत टाका. आणि सर्वात शेवटी जतन करा या पर्यायावर क्लिक करा.
अर्ज सादर करतांना हा एरर येवू शकतो.
जसे हि मी जतन करा या पर्यायावर क्लिक केले तर अशी एक सूचना आली आहे. घटक आधीपासूनच जोडलेला आहे. म्हणजे माझा अर्ज सादर झालेला नाही.
घटक आधीपासूनच जोडलेला आहे म्हणजे काय. तर लक्षात असू द्या कि मागील वर्षी देखील आपण कदाचित बियाणे अनुदान योजनेसाठी अर्ज केलेला असेल आणि तो अर्ज रद्द करण्याचे आपल्या लक्षात राहिलेले नाही.
त्यामुळे आपला अर्ज सादर होऊ शकला नाही. तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला हि अडचण येणार नाही परंतु तुम्ही मागील वर्षी देखील बियाणे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला असेल तर अगोदर तो अर्ज रद्द करावा लगतो. कारण महाडीबीटी पोर्टलवर एका घटकासाठी एकदाच ऑनलाईन अर्ज करता येतो.
तर यावर पर्याय म्हणजे अगोदरचा अर्ज रद्द करणे होय.
बियाणे अनुदान योजना 2024 असा करा जुना अर्ज रद्द
जुना अर्ज रद्द करण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.
आता या ठिकाणी तुम्हाला तुम्ही विविध योजनेसाठी केलेल्या अर्जाची माहिती दिसेल. या ठिकाणी बियाणे योजनेसाठी केलेला मागील अर्ज शोधा आणि त्या समोरील cancel या लाल रंगाच्या बटनावर क्लिक करा.
जसे हि तुम्ही रद्द म्हणजेज कॅन्सल या बटनावर क्लिक कराल त्यावेळी एक otp तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर जाईल. त्यावर आलेला otp दिलेल्या चौकटीत टाका आणि सबमिट या बटनावर क्लिक करा.
आता तुमचा पहिला अर्ज बाद म्हणजेच रद्द झालेला असेल परत एकदा नवीन अर्ज सादर करा. आता मात्र तुम्हाला पहिल्यासारखी घटक आधीपासूनच जोडलेला आहे अशी सूचना येणार नाही. तुमचा अर्ज यशस्वीपणे जतन होईल.
बियाणे अनुदान योजना 2024 लाभ घेण्यासाठी ऑनलाईन भरावे लागतील २३.६० पैसे
बियाणे अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी २३.६० पैसे एवढे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. त्यानंतर तुमचा अर्ज सादर होणार आहे.
असे करा ऑनलाईन २३.६० पैसे पेमेंट.
अर्ज जतन केल्यावर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे अशी सूचना येईल. या ठिकाणी तुम्हाला अजून एखादा अर्ज करायचा असल्यास yes या बटनावर क्लिक करा. किंवा आता तुम्हाला कोणताही अर्ज करायचा नसेल तर NO या बटनावर क्लिक करा.
असे समजूयात कि तुम्हाला आता नवीन अर्ज करायचा नाही त्यमुळे आपण No या बटनावर क्लिक करूयात. आता अर्ज सादर करा असे बटन तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा.
एक सूचना येईल ती वाचून घ्या.
पहा या बटनावर क्लिक करा. योजनेसाठी क्रम म्हणजेच प्राधान्य क्रमांक द्या.
अटी व शर्थी समोरील चौकट बॉक्समध्ये टिक करा आणि अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.
जसे हि तुम्ही अर्ज सादर करा या बटनावर क्लिक कराल त्यावेळी पेमेंट करण्याचे तपशील तुम्हाला दिसेल Make payment या बटनावर क्लिक करा.
पेमेंट करण्याची पद्धत निवडा. या ठिकाणी विविध पेमेंट पद्धती तुम्हाला दिसेल त्यापैकी कोणतीही एक पद्धत वापरून तुम्ही पेमेंट करू शकता.
upi पेमेंट पद्धत हल्ली सगळीकडे वापरली जाते त्यामुळे क्यूआर कोड द्वारे तुम्ही पेमेंट करू शकता.
पेमेंट केल्यावर कसलीही कृती करू नका पेमेंट पेज आपोआप रीडायरेक्ट होईल आणि तुमची २३.६० रुपयांची पावती जनरेट होईल.
बियाणे अनुदान योजनेसाठी यशस्वीपणे अर्ज सादर झाल्याची खात्री करा.
सोयाबीन किंवा इतर कोणत्याही बियाण्यासाठी आपण अर्ज तर केला पण तो यशस्वीपणे सादर झाला का याची खात्री करून घ्या. त्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करा.
महाडीबीटी पोर्टलच्या मुख्यपेजवर या
तुमच्या Mahadbt dashboard च्या डाव्या बाजूला मी अर्ज केलेल्या बाबी हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
त्यानंतर छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा.
या ठिकाणी तुम्हाला तुम्ही ज्या योजनांसाठी अर्ज केलेला आहे त्या सर्व योजना दिसणार आहेत. यामध्ये बियाणे अनुदान योजना असेल त्याची पावती प्रिंट करून घ्या. प्रिंटचा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल.
तर अशा पद्धतीने तुम्ही बियाणे अनुदान योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
ज्या व्यक्तीच्या नावे शेती आहे अशी कोणतीही व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकते.
महाडीबीटी वेबपोर्टलवर बियाणे अनुदान योजना 2024 साठी ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्ज कसा करावा लागतो या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये अगदी व्हिडीओ सहित दिलेली आहे त्यामुळे याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे.