राज्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा या १४ जिल्ह्यांमध्ये अशा राशन कार्ड धारकांना जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट झालेले नाहीत जे APL लिस्टमध्ये आहेत अशा नागरिकांना यापुढे धान्याऐवजी पैसे मिळणार असल्याचा जी आर २८ फेब्रुवारी २०२३ रोजी काढण्यात आला होता.
नागरिकांना धान्याऐवजी पैसे मिळणार असल्याचा जी आर आल्याने बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या निर्णयाची अमलबजावणी होण्यास सुरुवात झालेली आहे. जालना जिल्ह्यामध्ये या योजनेची अमलबजावणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ५०० शिधापत्रिकाधारकांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले आहे.
तुमच्या राशनकार्डवरील महिला कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी महिला कुटुंबाचे बँक खाते आधारशी संलग्न असणे गरजेचे आहे.
राशन कार्ड ऑनलाइन चेक करा माहिती करून घ्या तुमचा १२ अंकी नंबर.
योजनेचा लाभ घेण्यासाठी कोठे कराल अर्ज
जालना जिल्ह्यामध्ये हे पैसे बँक खात्यावर जमा होण्यास सुरुवात देखील झालेले आहेत. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तहसील कार्यालयामध्ये किंवा तुमच्या गावातील स्वस्तधान्य दुकानदार यांच्याकडे हा अर्ज करावा लागणार आहे.
तहसील कार्यालयात अर्ज दाखल केल्यावर डाटा एन्ट्री ऑपरेटरकडून हि प्रक्रिया ऑनलाईन केली जाते. तुम्ही तुमच्या गावातील राशनदुकानदार यांच्याकडे देखील हा अर्ज सादर करू शकता.
कोणती माहिती भरावी लागेल अर्जामध्ये
या अर्जामध्ये खालील माहिती भरावी लागणार आहे.
अर्जदाराचे नाव.
राशनकार्ड क्रमांक.
आधार लिंक असलेल्या बँक खात्याचा तपशील जसे कि, बँकेचे नाव, शाखा, खाते क्रमांक, खात्याचा प्रकार, ifs कोड, इत्यादी.
अर्ज संपूर्ण भरून झाल्यावर राशनकार्डच्या दोन्ही बाजूच्या पानाची छायांकित प्रत ब बँक पासबुकची छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.
कोठे मिळेल अर्जाचा नमुना
या संदर्भात २८ फेब्रुवारी २०२३ रोजी एक शासन निर्णय काढण्यात आला होता या शासन निर्णयाच्या पान नंबर ५ वर अर्जाचा नमुना देखील देण्यात आलेला आहे.
जी आर शोधण्यास अवघड जात असेल आणि तुम्हाला या अर्जाचा नमुना pdf मध्ये हवा असेल तर खालील लिंकवर क्लिक करा.
हा अर्ज pdf मध्ये डाउनलोड करून घ्या, प्रिंट काढून तहसील कार्यालय किंवा राशनदुकानदार यापैकी एका ठिकाणी सादर करून द्या.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा
तहसील किंवा राशनदुकानदार यांच्याकडे अर्ज करावा लागेल.
या लेखामध्ये pdf अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. हा अर्ज डाउनलोड करून घ्या. प्रिंट काढून संबधित कार्यालयास सादर करा.