पिक विमा 2023. शेतकऱ्यास एका अर्जासाठी भरावा लागेल 1 रुपया. पिक विमा कंपन्याची यादी पहा. शासनाचा नवीन जी आर आला.

पिक विमा 2023. शेतकऱ्यास एका अर्जासाठी भरावा लागेल 1 रुपया. पिक विमा कंपन्याची यादी पहा. शासनाचा नवीन जी आर आला.

पिक विमा 2023 crop insurance : पाणी फाउंडेशन तर्फे पुणे येथे दिनांक १२ मार्च २०२३ रोजी सत्यमेव जयते फार्मर कप 2022 पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी शेतकऱ्यांना पिक विम्याचा हफ्ता भरण्याची गरज राहणार नाही, केवळ १ रुपयांमध्ये पिकांचा पिक विमा काढला जाणार आहे अशी माहिती त्यांनी त्यावेळी दिली होती.

यानुसार आता खरीप हंगाम २०२३ ते रब्बी हंगाम २५-२६ अशा तीन वर्षासाठी शेतकऱ्यांना केवळ १ रुपयांमध्ये सर्वसमावेशक पिक विमा योजनेचा लाभ मिळणार असल्याचा जी आर दिनांक २६ जून २०२३ रोजी काढण्यात आलेला आहे.

1 रुपयात पिक विमा नोंदणी शेतीसाठी 12 तास दिवसा लाईट शेतकऱ्यांना प्रती वर्ष मिळणार 12 हजार रुपये

सर्वसमावेशक पिक विमा योजना ३ वर्षासाठी

नैसर्गिक अप्पतीमुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याने अनेक शेतकरी बांधव त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढत असतात.

पिक विमा काढतांना शेतकऱ्यांना पिक विम्याची काही रक्कम भरावी लागत होती. त्यामुळे आता केवळ १ रुपयात सर्वसमावेशक पिक विमा करता येणार असल्याने शेतकरी बांधवाना याची नक्कीच मदत होणार आहे.

१ रुपयात जरी पिक विमा नोंदणी होत असली तरी पिक विम्याची जी रक्कम असेल ती सर्वसाधारण विमा हफ्ता अनुदान म्हणून राज्य शासन भरणार आहे. म्हणजेच पिक विमा संदर्भात शासन अधिकचा भार उचलून शेतकऱ्यांना केवळ १ रुपयात पिक विमा योजनेचा लाभ देणार आहे. हि योजना तीन वर्षासाठी लागू असणार आहे.

ज्या पिक विमा कंपन्या केवळ १ रुपयांमध्ये पिक विमा काढणार आहे त्या कंपन्याची निवड देखील झालेली आहे ती खालीलप्रमाणे आहे.

पिक विमा कंपन्याची यादी पहा

जिल्हाकंपनी
अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा.ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
परभणी, वर्धा, नागपूर.आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
जालना, गोंदिया, कोल्हापूर.युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड.चोलामंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार.भारतीय कृषी विमा कंपनी.
हिंगोली, अकोला, धुळे, पुणे.एचडीएफसी ईर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड
यवतमाळ, अमरावती, गडचिरोली.रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
उस्मानाबादएचडीएफसी ईर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
लातूरएसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
बीडभारतीय कृषी विमा कंपनी.

पिक विमा सादर करण्याचा अंतिम दिनांक देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो खालीलप्रमाणे आहे.

२०२३ या वर्षासाठी खरीप पिक विमा अर्ज सादर करण्याचा दिनांक ३१ जुलै २०२३ असा आहे २०२४ साठी १५ जुलै तर २०२५ या वर्षासाठी १५ जुलै या अंतिम तारखा निर्धारित करण्यात आलेल्या आहेत.

जी आर लिंक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *