रानभाज्या माहिती pdf मध्ये ranbhaji mahotsav jalna 2023

रानभाज्या माहिती pdf मध्ये ranbhaji mahotsav jalna 2023

तुम्हाला जर रानभाज्या माहिती pdf मध्ये हवी असेल तर या लेखामध्ये pdf दिलेली आहे नक्की डाउनलोड करून घ्या. जाणून घेवूयात रानभाज्या संदर्भात माहिती या लेखामध्ये त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

रानभाजीला रान भाजीच का म्हणतात, खरे तर सर्वच भाज्या ह्या शेतात घेतल्या जातात शेताला आपण रानच म्हणतो मग केवळ या भाज्यांनाच रानभाजी का म्हणव असा प्रश्न निर्माण होतो.

तर त्याचे उत्तर असे आहे कि ज्या भाज्या दुर्लक्षित आहेत पण त्या मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास ज्या भाज्या आपण न लावता उगतात त्या रान भाज्या.

पूर्वी आपले आजी आजोबा यांच्या जेवणामध्ये या रानभाज्यांचा समावेश खूप मोठ्या प्रमाणत असायचा त्यामुळेच त्यांना दीर्घ आयुष्य मिळत असे. पूर्वी या रान भाज्यांचा जेवणात मोठ्या प्रमाणत समावेश असल्याने आपसूकच त्या घसरतील सर्व सदस्यांना परिचित होत्या.

सौर कृषी पंप 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु

रानभाज्या माहिती असणे गरजेचे

आता काळ बदलला असून जेवणामध्ये आधुनिक आणि रासायनिक कीटकनाशके फवारलेल्या भाज्यांचा उपयोग केला जात आहे.  त्यामुळे आजच्या नवीन पिढीला कदाचित रानभाज्यांची ओळख नसण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र शासनाने रानभाजी महोत्सव ranbhaji mahotsav आयोजित करणे सुरु केले आहे.

जागतिक आदिवासी दिन world tribal day हा ९ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या निमित्ताने रानभाजी महोत्सव आयोजित केला जातो. रानभाजी महोत्सव जागतिक आदिवासी दिनीच का साजरा केला जातो.

तर आदिवासी बंधूंनी या रानभाज्यांचा शोध लावलेला असल्याने त्यांच्या सन्मानार्थ हा रानभाजी महोत्सव साजरा केला जातो.

इतर भाज्या शेतकरी बांधव त्यांच्या शेतामध्ये लावतात परंतु रानभाज्या लावण्याची गरज राहत नाही त्या स्वतःहून उगतात.

सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या पालेभाज्या आवश्यक

पालेभाज्या मग त्या कोणत्याही असोत त्यामध्ये जीवनसत्वे कमी जास्त प्रमाणात असतातच त्या सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या असाव्यात. सध्या शेतीमध्ये रासायनिक पद्धतीचा उपयोग करून भाजीपाला घेतला जातो जो कि शरीरासाठी खूपच घातक असतो. अशावेळी आपण शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा उपयोग करणे गरजेचे आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी कृषी अधिकारी व इतर मान्यवरांनी रानभाजीचे महत्त्व समजावून सांगितले. या रानभाजी महोत्सवामध्ये विविध रानभाज्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या.

WhatsApp Group link

रानभाज्याचे फोटो तुम्हाला व्हिडीओमध्ये दिसेल

रानभाज्यांची नावे

तांदूळ कुंद्रा

तरोटा.

वावडिंग.

अंबाळ

चिला

हरणदोडी.

अंबाडी.

अळूची पाने.

मोहरी.

चुचू.

घोळ.

पाथ्री.

मूरमुटे.

तांदूळजा.

गोखरू.

फांद.

तांदूळ कुंद्रा.

काठमांडू.

आंबटचुका.

रानभाज्या संदर्भातील माहिती pdf मध्ये

नवीन पिढीतील तरुणांना या रानभाज्यांची नावे माहित नसल्याची शक्यता असू शकते अशावेळी खालील खालील रानभाज्या संदर्भातील माहितीची pdf फाईल डाउनलोड करा व रानभाज्यांची नावे जाणून घ्या. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

रानभाज्या माहिती pdf

या संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.

रानभाज्या महोत्सव केंव्हा आयोजित केला जातो?

आदिवासी दिनाच्या दिवशी म्हणजेच ९ ऑगस्टला रानभाज्या महोत्सव आयोजित केला जातो.

रानभाज्या माहिती pdf कोठे मिळेल?

या लेखामध्ये रानभाज्या माहिती pdf उपलब्ध करून दिलेली आहे. अगदी एका क्लिकवर तुम्ही हि pdf तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *