झेंडू शेती लाख मोलाची १५ गुंठ्यात दिड लाख उत्पन्न zendu sheti mahiti in marathi

झेंडू शेती लाख मोलाची १५ गुंठ्यात दिड लाख उत्पन्न zendu sheti mahiti in marathi

पारंपारिक शेतीला फाटा देत झेंडू शेती लाख मोलाची अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. जे शेतकरी आधुनिकतेचा कास धरतात त्यांची जास्त प्रगती होतांना दिसते.

पारंपारिक पद्धतीमध्ये शेतकरी बांधव कपाशी, मका सोयाबीन, तूर, मुग या पिकांचा समावेश करतांना दिसतात. परंतु शासनाच्या धोरणानुसार जे विकेल ते पिकवा या नुसार जे शेतकरी बांधव याचा अवलंब करतात ते नक्कीच यशस्वी होतात.

शेती करत असतांना आधुनिकतेची कास धरणे खूपच महत्वाचे झाले आहे. पारंपारिक पिकांना फाटा देत नवीन पिक पद्धती आपण अवलंबली पाहिजे. नसता शेतकरी बांधवांची हवी तशी प्रगती होऊ शकणार नाही.

आता नवीन पिक पद्धती अवलंबिली पाहिजे म्हणजे नेमके काय केले पहिजे तर मार्केटमध्ये काय विकले जाते याचा शेतकरी बांधवानी अभ्यास केला पहिजे आणि त्यानुसार आपल्या शेतामध्ये पिकांची लागवड केली पाहिजे.

पेरू फळबाग शेती मधून लाखो रुपयांचे उत्पन्न काढणारा शेतकरी

झेंडू शेती ठरतेय फायद्याची

तुम्हाला नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी डिजिटलडीजी युट्युब चॅनलच्या वतीने अशाच एका शेतकरी बांधवांची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत ज्यांनी पारंपारिक पिक पद्धतीला फाटा देवून नवीन काहीतरी करण्याची जिद्द बाळगून शेतीमध्ये बदल करून दाखविला आहे.

चला तर जाणून घेवूयात जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथील शेतकरी रमेश तेलंग्रे या शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतामध्ये कशा पद्धतीने बदल करून नवीन शेतीची कस धरली आहे.

अधिक माहितीसाठी झेंडू शेती संदर्भातील खालील व्हिडीओ पहा

झेंडू शेती संदर्भातील रमेश तेलंग्रे या शेतकरी बांधवांचा व्हिडीओ खाली दिलेला आहे. व्हिडीओ बघितल्यावर आपणास जाणवले असेल कि कशा पद्धतीने रमेश तेलंग्रे या शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतामध्ये पारंपारिक पिक पद्धतीला फाटा देवून नवीन पिक पद्धती अवलंबली आहे.

खालील व्हिडीओ पहा.

पारंपारिक पिक पद्धतीला फाटा देत केले धाडस.

सध्या कृषी बाजार मार्केटचा ट्रेंड बदलला आहे. आपण काय पिकवितो यापेक्षा बाजारात काय विकले जाते यावर जास्त भर दिला जात आहे ज्याला इंग्रजीमध्ये market demands असे संबोधले जाते.

रमेश तेलंग्रे Ramesh Telangre या शेतकरी बांधवाने पारंपारिक पिक पद्धतीला फाटा देवून आपल्या शेतामध्ये झेंडूची शेती करण्यास सुरुवात केली आहे.

झेंडूची शेती करत असतांना सुरुवातीला या शेतकरी बांधवाला खूप अडचणीचा सामना करावा लागला. अनेक शेतकऱ्यांनी त्यांना नावे ठेवली. तुमच्याकडून हे जमणार नाही किंवा हे काय नवीन करताय तुम्ही तुम्हाला हे जमणार नाही अशा पद्धतीने त्यांचे मनोधैर्य कमी करण्याचे पर्यंत करण्यास सुरुवात केली.

परंतु रमेश तेलंग्रे Ramesh Telangre यांनी हार न मानता आपले कार्य सदैव पुढे चालू ठेवले आहेत.

बाजाराचा कल ओळखून करा शेती

रमेश तेलंग्रे यांनी त्यांच्या शेतामध्ये ३ जून २०२३ रोजी १५ गुंठ्यात तीन हजार  झेंडूची कलमे लावलेली आहेत. ३.५ रुपये कलम या दराने त्यांनी सिरसोली या ठिकाणहून कलमे खरेदी केली आहेत.

शेतापर्यंत मालगाडी येत असल्याने फुले मार्केटमध्ये वेळेवर पोचतात. फुलांची निवडणी करणे व इतर कामे ते जातीने करतात. झेंडू शेतीमधून त्यांना दीड लाख रुपये नफा अपेक्षित आहे. पुढील काही वर्षानंतर नक्कीच त्यांना या झेंडूच्या फुलशेतीचा अनुभव येवून याहीपेक्षा चांगला नफा मिळेल यात शंका नाही.

ज्यांना शेती व्यवसाय फायद्यामध्ये आणायचा आहे अशा शेतकरी बांधवानी शेतीमध्ये प्रयोग करण्यास घाबरू नयेत. बाजाराचा कल ओळखून पिक पद्धती निवडल्यास नक्कीच शेती फायद्याची होईल.

तुम्ही देखील अशाच पद्धतीने पारंपारिक पिक पद्धतीला फाटा देवून काही नवीन पिकांची लागवड केली असेल तर आम्हाला काळवा नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोचून तुमची याशोगाधा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करू.

WhatsApp Group link

झेंडूची शेती कशा पद्धतीने यशस्वी केली जाते?

या लेखामध्ये झेंडू शेती यशस्वी करण्यासाठी काय करावे लागते या संदर्भात सविस्तरपणे माहिती दिलेली आहे.

झेंडूच्या शेतीला कोणते खते वापरावी लागतात?

शेतीसाठी खते कोणती वापरावी लागतात मेहनत कशी केली जाते या संदर्भातील शेतकऱ्याचा व्हिडीओ दिलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *