मधमाशी पालन योजनेसाठी अर्ज सुरु. ग्रामीण भागातील तरुणांसाठी आता मधुपालन क्षेत्रामध्ये संधी निर्माण झाली आहे. पारंपारिक शेतीला फाटा देवून तरुणांनी मधमाशी पालन व्यवसायाकडे वळले तर नक्कीच शेती फायद्याची होऊ शकते.
तुम्ही जर मधमाशी पालन व्यवसाय करू इच्छित असाल तर यासाठी शासन अनुदान देते. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधमाशी पालन योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यात येत आहेत.
सध्या जालना जिल्ह्यामध्ये मधमाशी पालन योजनेचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधमाशी पालन योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जात आहे.
तोट्यात जाणारी शेती जर नफ्यात आणायची असेल तर शेतकरी बांधवानी आपल्या शेतीमध्ये बदल केला पाहिजे. शेती बरोबरीने शेतीला जोडधंदा म्हणून जर मधमाशी पालन व्यवसाय केला तर नक्कीच शेती फायद्यात येवू शकते.
मधमाशी पालनातून निर्माण होणार रोजगाराच्या संधी
अनेक तरुणांना शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहय्यतेची गरज भासते परंतु अर्थीक मदत न मिळाल्याने अनेक तरुण असे व्यवसाय करू शकत नाही.
मधमाशी पालन योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जात असल्याने यामध्ये तरुणांना नक्कीच चांगल्या संधी निर्माण झाल्या आहेत.
मधमाशी योजना संदर्भातील अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मधमाशीच्या मधामध्ये औषधी गुणधर्म असल्याने मधास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तुम्ही जर मधमाशी पालन व्यवसाय केला तर नक्कीच त्यामध्ये खूप मोठी संधी तरुणांना मिळू शकते.
मधुमक्षी पालन संदर्भात ग्रामीण भागामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना पूर्ण माहिती नसल्याने दिसून आले आहे. मधमाशी पालन संदर्भात अधिक व्यास्थित माहिती घेतल्यास हा व्यवसाय ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या उत्तम संधी प्राप्त करून देवू शकतो.
पुढील योजना पण पहा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नवीन योजनेची घोषणा पहिल्या टप्प्यात १ लाख दुसऱ्या टप्प्यात २ लाख केवळ पाच टक्के व्याजाने मिळणार कर्ज
मधमाशी पालन योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार
मधपेटी हि शेती पिके व फळ बागायतीच्या ठिकाणी किंवा जंगलामध्ये ठेवल्यास मधमाशाद्वारे परागीकरण होऊन पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते.
मधमाशी परागीकरणामुळे पिकानुसार व पिकांच्या प्रकारानुसार 5 ते 45% वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हि वाढ उत्पादित केलेल्या मधाच्या व मेणाच्या किमतीच्या 10 ते 15 टक्के अधिक असते.
शासनाच्या वतीने मधकेंद्र योजना अर्थात मध उद्योग हा सदर उद्दिष्टांशी सुसंगत असा उद्योग असल्याने मधमाशी पालनास उद्योग म्हणून चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्व जिल्ह्यात मद केंद्र योजना अर्थात मधमाशी पालन योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशी पालन ही योजना राबविण्यात येते. महाबळेश्वर जिल्हा सातारा येथे मध संचालनालय निर्माण करण्यात आले आहे.
योजनेचा तपशील
जालना जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जालना जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
मधमाशी पालन योजनेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
- प्रमुख घटक हा वैयक्तिक मधपाळ.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा.
- अर्जदाराची स्वतःची शेती असल्यास प्राधान्य दिले जाते.
- अर्जदाराचे वय 18 पेक्षा जास्त असले पाहिजे.
वर सांगितल्याप्रमाणे पात्रता पूर्ण करणाऱ्या जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी सविस्तर माहितीसाठी जालना जिल्हा ग्रामोद्योग विभागास संपर्क साधावा.
मधमाशी पालन योजनेच्या अधिक माहितीसाठी खालील बातमी बघा.
या योजनेसाठी अर्जदार साक्षर असणे गरजेचे आहे. वय १८ वर्षापेक्षा जास्त असावे.
अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग विभागास अर्जदार संपर्क साधू शकतात.