मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार पहा कृषी हवामान विभागाचा आताचा अंदाज

मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार पहा कृषी हवामान विभागाचा आताचा अंदाज

शेतकरी बांधवांसाठी खुशखबर. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा हवामान अंदाज कृषी हवामान प्रभाग पुणे यांच्या वतीने दिलेला आहे.

दिनांक २९.०८.२०२३ रोजी पुणे कृषी हवामान विभागाच्या वतीने हवामान पत्रक काढण्यात आले असून यामध्ये कोकण मध्यमहराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघ गर्जनासह पाउस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुढील लेखपण वाचा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नवीन योजनेची घोषणा पहिल्या टप्प्यात १ लाख दुसऱ्या टप्प्यात २ लाख केवळ पाच टक्के व्याजाने मिळणार कर्ज

मेघ गर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याने शेतकरी बांधवानी आपापली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत असा सल्ला देखील कृषी हवामान विभाग पुणे यांनी दिला आहे.

सध्या पावसाचा खंड पडला असून शेतकरी बांधव पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशामध्ये कृषी हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेला हा पावसाचा अंदाज शेतकरी बांधवांसाठी आशादायक ठरणार आहे.

अधिक माहितीसाठी खालील हवामान अंदाज पत्रक पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *