शासनाकडून ई पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती. सध्या मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाने खंड दिलेला आहे.
होऊ शकते शासनाकडून या वर्षी दुष्काळ जाहीर देखील होऊ शकतो. अशावेळी तुम्ही तुमच्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी मोबाईल अपद्वारे नोंदणी करून घ्यावी जेणे करून शासनाकडून येणारे अनुदान मिळण्यास तुम्हाला काहीही अडचण येणार नाही.
पुढील माहिती वाचा e peek pahani 2023 खरीप हंगाम ई पिक पाहणी नवीन व्हर्जनद्वारे अशी करा नोंदणी.
तुम्ही जर ई पीक पाहणी केली नाही तर पिक विमा असेल, शासकीय योजना असेल किंवा इतर योजना असतील तर या योजनांचा लाभ तुम्हाला मिळण्यास अडचण येवू शकते.
तुम्ही जर अजूनही तुमच्या शेतातील पिकांची खरीप सीजन २०२३ या वर्षाची ई पीक पाहणी केली नसेल तर लगेच करून घ्या.
कारण आता ई पीक पाहणी नोंदणीची तारीख वाढविण्यात आलेली आहे. अजूनही बरेच शेतकरी बांधव असे आहेत कि त्यांनी त्यांच्या शेतातील पिकांची ई पीक पाहणी केलेली नाही. वेळेच्या कमतरतेमुळे किंवा इतर कारणांमुळे त्यांना हि ई पीक पाहणी करणे शक्य झाले नव्हते.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.
ई पीक पाहणी नोंदणीसाठी 2.0.11 हे अपडेट वर्जन
शेतकरी बंधुसाठी खरीप हंगाम 2023 साठी ई पीक पाहणी नोंदणीसाठी 2.0.11 हे अपडेट वर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
सदरची ई पीक पाहणी शेतकऱ्याद्वारे स्वयं प्रमाणित मानण्यात येनार आहे. किमान दहा टक्के तपासणी तलाठी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे.
खालील व्हिडीओ पहा आणि त्यानुसार कृती करा.
ई पिक पाहणी करतांना काही चूक झाली आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर 48 तासात खातेदारास स्वतः पीक पाहणी दुरुस्तीची सुविधा या ई पीक पाहणी ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
ई पीक पाहणी ॲपमध्ये मिश्र पिकांमध्ये मुख्य पिकासह तीन घटक पिके नोंदणी सुविधा देण्यात आलेली आहेत. तुमच्या संपूर्ण गावाची पिक पाहणी यादी पाहण्याची सुविधा देखील यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
15 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ
ई पीक पाहणी ॲपमध्ये शेतकऱ्यांकरिता मदत बटन देण्यात आलेले असून मदत कक्ष क्रमांक 022 25 712 712 या दूरध्वनी क्रमांक देखील आपल्याला ई पीक पाहणी संदर्भात काही अडचणी व शंका आल्यास मदत करण्यात येणार आहे.
सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन वर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगाम 2023 साठी ई पीक पाहणी ॲपमध्ये नोंदणी करण्यासाठी दिनांक 15 ऑक्टोबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
खरीप हंगाम 2023 साठी आपल्या पिकाची पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे. लक्षात असू द्या कि शेतकरी बांधवाना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर ई पीक पाहणी नोंदणी करणे गरजेचे आहे.
तर अशा प्रकारे ई पीक पाहणी नोंदणीस मुदतवाढ देण्यात आली असून लवकरात लवकर शेतकरी बांधवानी आपापली ई पिक पाहणी नोंदणी करून घ्यावी.
खरीप हंगाम २०२३ साठी १५ ऑक्टोबर २०२३ हि शेवटची तारीख आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे.
2.0.11 हे अपडेट वर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.