शेतकऱ्यांना मिळणार नुकसानीसाठी आर्थिक मदत पहा संपूर्ण पहा.
2014 या वर्षातील फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये अवेळी पाउस व गारपीट झाल्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते.
यासाठी त्यावेळी शासनाकडून अशा शेतकरी बांधवाना मदतीचे विशेष पॅकेज शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. या संदर्भात 20 मार्च 2014 रोजी शासन निर्णय देखील जारी करण्यात आला होता.
नोव्हेंबर व डिसेंबर 2014 मध्ये अवेळी पाऊस व गारपिटीमुळे जीवीत वित्त आणि फुटी आपतग्रस्तांना मदत व सवलत म्हणून शेतकरी बांधवांच्या कर्जाची व्याजमाफी करण्यात आली होती.
पुढील महत्वाची माहितीपण पहा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना संदर्भात मोठे अपडेट. आता सर्व शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप फडणवीस यांची घोषणा
शासनाचा जी आर आला
अशाच प्रकारे 2015 या वर्षातील फेब्रुवारी व मार्च महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अवेळी पाउस व गारपिट झाली होती आणि यामुळे देखील शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान यामुळे झाले होते.
त्यामुळे यासाठी देखील शासनाकडून शेतकरी बांधवाना मदत जाहीर करण्यात आली होती. मदतीच्या स्वरुपात शासनाने सहकारी कर्जाचे पुनर्गठण शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती व कर्जावरील व्याज बाकी या सवलती दिलेल्या होता. मात्र यामधील काही निधी प्रलंबित होता म्हणून सन 2023-2024 अखेर 10,92,249 इतके प्रस्ताव निधी अभावी बाकी होते.
सन 2023 24 चे मंजूर अर्थसंकल्पीय तरतूद वगळता अकरा लाखाची पुरवणी मागणी जुलै 2023 या वर्षाच्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती.
11 लाख रुपयांची पुरवणी
अनुषंगाने 11 लाख रुपयांची पुरवणी मागणी जुलै २०२३ च्या पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आली होती. त्यामुळे या निधीस शासनाने मान्यता दिली असून लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हा निधी वर्ग केला जाणार आहे.
शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांची ई पिक पाहणी करून घ्यावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळू शकेल.
तुम्हाला जर माहित नसेल कि ई पिक पाहणी कशी करावी तर त्या संदर्भातील एक व्हिडीओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बघून घ्या.
E pik pahani मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्यास मुदतवाढ
तर अशा पद्धतीने आपण या लेखामध्ये शेतकऱ्यांना मिळणार नुकसानीसाठी आर्थिक मदत संदर्भात माहिती जाणून घेतली आहे.