E pik pahani मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्यास मुदतवाढ

E pik pahani मोबाईल ॲपद्वारे पीक नोंदणी करण्यास मुदतवाढ

शेतकरी बंधुंनो e peek pahani मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती सातबाऱ्यावर नोंदविण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ई पीक पाहणी मुदतवाढ पत्र तुम्हाला बघायचे असेल तर या लेखाच्या शेवटी एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ई पीक पाहणी मुदतवाढ पत्र बघू शकता.

अशी करा ई पीक पाहणी मोबाईल ॲपचा वापर करून तुमच्या पिकांची नोंद

e pik pahani ॲपचा उपयोग करून पिकांची नोंदणी करण्याचे आवाहन

सध्या e peek pahani संदर्भात शासकीय स्तरावरून सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला आता तुमच्या पिकांची नोंदणी स्वतः करता येणार आहे. तुम्हाला जर माहित नसेल e pik pahani mobile application डाउनलोड कसे करावे आणि या ई पीक पाहणी मोबाईल ॲपचा उपयोग करून आपल्या शेतातील पिकांची माहिती कशी नोंदवावी तर या संदर्भातील अगदी तपशीलवार माहितीचा खालील व्हिडीओ पहा किंवा येथे क्लिक करा.

शेतीच्या योजनांची माहिती मोफत मिळवा तुमच्या मोबाईलवर WhatsApp Group मध्ये सामील व्हा.

E pik pahani

ई पीक पाहणी ॲपद्वारे नोंदणी न केल्यास होणार शेतकऱ्यांचे नुकसान.

शेतकऱ्यांनी स्वतः त्यांच्या शेतात पेरलेल्या पिकांची e pik pahani मोबाईल ॲपचा वापर करून नोंद करायची आहे. हि नोंद न केल्यास शेतकऱ्यांचा सातबारा या रकान्यामध्ये असलेला पिकांचा रकाना कोरा राहणार आहे. ई पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंद न केल्यास खालील नुकसान शेतकऱ्यांस होणार आहे.

  • शेतकऱ्यांचे शेत पडीक दाखविले जाईल किंवा पेरणी झालीच नाही असे दाखविले जाईल.
  • पिक कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होईल.
  • प्रधान मंत्री पिक विमा योजनेपासून शेतकरी वंचित राहील.
  • एखाद्या ठराविक पिकास शासनातर्फे मदत जाहीर झाली तर त्याचा लाभ मिळणार नाही.
  • जंगली जनावरांनी शेतातील पिकांचे नुकसान केले तर त्याचा लाभ मिळणार नाही.
https://youtu.be/H6Y411kjrXk

शेवटच्या तारखेच्या आत शेतकरी बांधवानी e pik pahani ॲपद्वारे पिक नोंदणी करावी.

e pik pahani ॲपद्वारे नोंदणी करण्यास शेतकरी बांधवांना मुदतवाढ मिळाली आहे. लवकरात लवकर शेतकरी बांधवानी त्यांच्या पिकांची नोंद स्वतः सातबाऱ्यावर करून घ्यावी. ई पीक पाहणी ॲप संदर्भात काही अडचण आल्यास आपल्या गावातील तलाठी किंवा संबधित अधिकारी साहेबांशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी डिजिटल डीजी युट्युब चॅनल भेट द्या त्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *