Kusum solar pump yojana अर्ज सुरु प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

Kusum solar pump yojana अर्ज सुरु प्रथम येणाऱ्यास प्राधान्य

कुसुम सोलर पंप योजना kusum solar pump yojana सुरु झालेली आहे अशा आशयाची बातमी शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर पब्लिश करण्यात आलेली आहे. https://www.mahaurja.com/ या वेबसाईटवर या कुसुम सोलर पंप योजनेचा ( kusum solar pump yojana ) ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप घेण्याची इच्छा आहे त्यांनी वरील लिंकवर क्लिक करून अर्ज सादर करायचे आहेत. ( ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक खाली दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज करू शकता.)

kusum solar pump yojana ९० टक्के अनुदानावर मिळणार सौर कृषी पंप

व्हिडीओ पहा

प्रधानमंत्री कुसुम – ब योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना  ७.५ HP, ५ HP व ३ HP क्षमतेच्या सौर कृषी पंपांसाठी अर्ज करता येणार आहेत. kusum solar pump yojana अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वीज नाही त्यांनाच हि योजना मिळणार आहे. ९० टक्के अनुदान ओपन म्हणजेच खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. ९५ टक्के अनुदान अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी मिळणार आहे. kusum solar pump योजनेचा अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना https://www.mahaurja.com/ या महाऊर्जाच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.  प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर सौर कृषीपंपाचा लाभ देण्यात येईल.

सूचना – कुसुम सोलर योजना अंतर्गत सौर कृषी पंपसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी फक्त महाउर्जा वेबसाईटवरील अधिकृत लिंकचाच वापर करावा इतर कोणत्याही लिंकवर अर्ज भरल्यास तुमची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

सौर कृषी पंप योजनेसाठी अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना हे अर्ज करतांना कोटा संपलेला आहे असे मेसेज येऊन त्यांचा अर्ज रिजेक्ट होत होता. त्यामुळे आता अशा शेतकरी बांधवांसाठी हि आनंदाची बातमी आहे ज्यांना सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. कुसुम सोलर योजनेची अधिकृत बातमी बघण्यासाठी खालील बटनाला टच करा.

kusum solar pump yojana

महाउर्जा वेबसाईटवर भरले जाणार kusum solar pump योजनेचे अर्ज.

शेतामध्ये लोडशेडींग मुळे रात्रपाळी करून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकला पाणी देण्याची वेळ येते. जर शेतकऱ्यांकडे सौर कृषी पंप असेल तर शेतकऱ्यांना आपल्या पिकांना दिवसा पाणी देता येईल. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप अनुदानावर घ्यावयाचा आहे ते शेतकरी kusum solar pump yojana अंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. महाउर्जा वेबसाईटवर सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. महाउर्जा वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

योजनांची माहिती मिळवा आता तुमच्या मोबाईलवर.

विविध शासकीय योजनांचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या whatsapp group मध्ये सहभागी व्हा. आमच्या टेलीग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हा त्याच प्रमाणे शेती संबधित विविध योजनांचे ऑनलाईन अर्ज कसे सादर करावे लागतात हि माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या डिजिटल डीजी युट्युब चॅनलला भेट द्या, त्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *