विना गॅरंटी कर्ज योजना लवकरच सुरु होणार असल्यामुळे आता बेरोजगारांना कर्ज मिळण्यास मदत होणार आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती.
मित्रांनो तुम्हाला माहित असेलच कि १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी विश्वकर्मा योजना सुरु करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार आता 17 सप्टेंबर पासून हि योजना सर्वत्र सुरु झाली आहे.
अनेक तरुणांच्या हाताला काम नसल्याने तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. ग्रामीण भागामध्ये अनेक तरुण व्यवसाय करू इच्छित आहे किंवा आहे तो व्यवसाय वाढविण्यास धडपड करत आहेत.
परंतु आर्थिक अडचणीमुळे अशा तरुणांना हा व्यवसाय करणे शक्य होत नाही.
पुढील योजना पण कामाची आहे अण्णासाहेब पाटील लोन योजना बँक ऑफ इंडिया देणार कर्ज
विना गॅरंटी कर्ज योजना loan scheme 2023
त्यामुळे अशा तरुणांना आता विना गॅरंटी कर्ज मिळणार आहे. कर्ज काढायचे म्हटल्यास त्यासाठी बँकेमध्ये खूप खटाटोप करावा लागतो. अनेक कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते.
सर्वात महत्वाचे म्हणजे कर्ज मिळविण्यासाठी काहीतरी तारण ठेवावे लागते. अनेक तरुण हे बेरोजगार असल्याने असे तारण बँकेत ठेवू शकत नसल्याने त्यांना बँकेकडून कर्ज उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे आता अशा बेरोजगार युवकांना या योजनेमुळे फायदा होणार आहे.
१७ सप्टेबर रोजी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असतो या दिवसाची औचित्य साधून विश्वकर्मा योजनेला सुरुवात झाली आहे.
विश्वकर्मा कर्ज योजना
विश्वकर्मा योजनेद्वारे बेरोजगार तरुणांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मदत मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरला देशातील 30 लाखावर अधिक नागरिकांसाठी हि विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेसाठी 13000 कोटी रुपयांच्या निधीची तरदूत करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये छोट्या नागरिकांना एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाणारे ज्या लाभार्थींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहेत ते खालीलप्रमाणे आहेत.
सोनार
नाविक
कारपेंटर.
लोहार
कुलुपांचे कारागीर
हातोडा आणि त्या संदर्भातील कीट बनविणारे कारागीर
कुंभार.
लोहार.
मूर्तिकार.
मोची.
चटई झाडू बनविणारे कारागीर.
लहान मुलांची खेळणी बनविणारे कारागीर.
सलूनमध्ये काम करणारे कारागीर.
धोबी.
टेलर.
मच्छीमार
खालील व्हिडीओ पहा.
एम. एस. एम. इ. कौशल्य विकास आणि वित्त मंत्रालय हे मिळून योजना राबविणार आहे जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बेरोजगार तरुण असाल आणि तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून आर्थिक सहाय्य हवे असेल तर तुम्हाला आता शासनाकडून मदत मिळू शकणार आहे.
तर अशी हि विना गॅरंटी कर्ज योजना आहे तरुणांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा जेणे करून त्यांना त्यांचा उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मदत मिळू शकेल.
१७ सप्टेंबर २०२३ पासून विश्कर्मा योजना सुरु होणार आहे.
योजनेच्या कर्ज संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे सविस्तर वाचून घ्या.