पहिल्या टप्प्यात मिळणार 10 हजार रुपये अनुदान मिळणार असून हे कसे मिळणार आहे कोणाला मिळणार आहे जाणून घेवूयास्त या संदर्भातील सविस्तर माहिती.
दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी शासनाने एक जी आर काढला होता ज्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना 350 रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्यात येणार असल्याचे म्हटले होते.
एका कांदा उत्पादक शेतकऱ्यास जास्तीत जास्त 200 क्विंटल पर्यंत 350 रुपये प्रती क्विंटल या प्रमाणे अनुदान देण्यात येणार असल्याचे यामध्ये जाहीर करण्यात आले होते.
त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या अनुदानाचे पैसे मुख्यमंत्री यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले आहेत. म्हणजेच आता कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच हे पैसे जमा होणार आहेत.
खालील माहिती पण वाचा
कांदा अनुदान यादी kanda anudan 2023 आली पहा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 100 टक्के अनुदान
3 लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 10 हजार रुपये अनुदान
तुम्हाला माहित असेलच कि 1 फेब्रुवारी ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 350 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता या संदभात शासन निर्णय देखील जारी करण्यात आला होता.
जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे हे अनुदान शेतकरी बांधवाना मिळणार आहे. कांदा अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ काल दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतरांच्या उपस्थित झाला.
कांदा उत्पादक शेतकरी बांधवाना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 3 लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी 300 कोटी रुपये एवढा निधी वितरीत केला जाणार आहे. अनुदानाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
या संदर्भातील व्हिडीओ पहा
कांदा अनुदान संदर्भात ज्या जिल्ह्यांची 10 कोटी पेक्षा कमी मागणी होती जसे कि
नागपूर.
रायगड.
सांगली.
सातारा.
ठाणे.
अमरावती.
बुलढाणा.
चंद्रपूर.
वर्धा.
लातूर.
यवतमाळ.
अकोला.
जालना.
वाशिम.
या जिल्ह्यातील पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात हे अनुदान थेट जमा केले जाणार आहे.
ज्या जिल्ह्यांची 10 कोटी पेक्षा जास्त मागणी होती जसे कि
नाशिक.
उस्मानाबाद.
पुणे.
सोलापूर.
अहमदनगर.
औरंगाबाद.
धुळे.
जळगाव.
कोल्हापूर.
बीड.
या जिल्ह्यातील पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 हजार पर्यत सर्वांना अनुदान जमा होईल.
ज्या शेतकरी बांधवांची 10 हजार रुपयापर्यंतची देयक आहेत त्यांना हे कांदा अनुदान पूर्ण मिळणार आहे.
ज्या लाभार्थींचे देयक 10 हजार रुपये पेक्षा जास्त आहे त्या लाभार्थींच्या बँक खात्यात मात्र पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.
तर अशा पद्धतीने कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये १० हजार रुपये अनुदान जमा होणार आहेत.
कांदा उत्पादक शेतकरी बांधवाना 350 रुपये प्रती क्विंटल नुसार हे अनुदान मिळणार असून जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रती शेतकरी अशी मर्यादा ठरवून देण्यात आलेली आहे.
पहिल्या टप्प्यात शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान थेट जमा करण्यात येणार आहे. निधीचे वितरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले असून लवकरच हि रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना टप्प्या टप्प्यानुसार हे अनुदान मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 हजार रुपये मिळेल व उर्वरित रक्कम लवकरच दिली जाईल. सविस्तर माहितीसाठी हा लेख वाचा.
जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांना हे अनुदान मिळणार आहे.
ज्या बँकेत शेतकरी बांधवाना या अगोदरचे शासकीय अनुदान मिळाले होते त्या बँकेत हे अनुदान जमा होणार आहे. किंवा कांदा अनुदानासाठी शेतकरी बांधवानी जे बँक खाते दिलेले आहे त्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे.
हे अनुदान केवळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे. इतर जे अनुदान असते त्यासाठी शासनाकडून वेगळे नियोजन केले जाते. त्या संदर्भात वेळोवेळी आपणास मार्गदर्शन करण्यात येईल.