जाणून घेवूयात रेशीम शेती अनुदान 2023 संदर्भातील सविस्तर माहिती. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे.
पंचायत समिती तसेच कृषी विभागाच्या वतीने देखील रेशीम शेती अनुदान योजना राबविली जाणार आहे. या योजना संदर्भातील जी आर दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
या नवीन योजनेसाठी अर्ज कोठे करावा अर्ज कोठे उपलब्ध आहे कोणती माहिती यामध्ये भरावी लागणार आहे कोणत्या यंत्रणेशी संपर्क साधावा लगणार आहे हि आणि इतर महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा. reshim sheti yojana 2023.
पुढील योजना पण पहा
रेशीम शेतीसाठी मिळणार कर्ज एकरी 1 लाखाची मर्यादा
पहा रेशीम शेती अनुदान 2024 संदर्भातील सविस्तर माहिती
रेशीम किंवा तुती लागवड संदर्भात बऱ्याच जणांना माहिती आहे. परंतु अद्याप पाहिजे तसा प्रतिसाद तुती लागवडीस मिळत नाही. शासनाने प्रायोगिक तत्वावर बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तुती लागवडीचा प्रयोग केला होता. या जिल्ह्यासाठी शासनाने जे उद्दिष्ट ठरविले होते त्या उद्दिष्टाच्या दीडपट जास्त शेतकरी बांधवानी तुतीची लागवड केली.
तुती लागवडीच मिळालेला हा प्रचंड प्रतिसाद बघून शासनाने तुती लागवडीची कक्षा अधिक रुंदावली आहे. आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तुती लागवडीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भात शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आलेला आहे.
रेशीम लागवड आपल्यासाठी जरी नवीन असली तरी तुतीलागवडीचा प्रयोग करून पाहण्यास काही हरकत नाही. यासाठी एक ठोस कारण शेतकरी बांधवांकडे आहे.
रेशीम शेती अनुदान अर्थात तुती लागवड योजना 2023 संदर्भातील माहिती अधिक चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी खालील व्हिडीओ पहा.
तुती लागवड अनुदान योजनेचा लाभ घ्या
शेतकरी म्हटले कि शेतकऱ्यांच्या घरामध्ये गाई, म्हशी, बकरी असे दुधाळ प्राणी असतातच. अशा दुधाळ प्राण्यांना तुतीचाचा पाला खाऊ घातला तर दुधाचा फॅट वाढतो. तुतीच्या पाल्यामध्ये २५ टक्के प्रथिने असतात.
आता तुम्ही असेही म्हणू शकता कि तुतीचा पाला जनावरे कुठे खातात. दुधाळ जनावरे तुटीचा पाला खात नाहीत असे नाही.
परंतु नेहमी दिल्या जाणाऱ्या चाऱ्यासोबत थोडा थोडा करून तुतीचा पाला दुधाळ जनावरांना खाऊ घातला तर शेतकरी बांधवांचा चाऱ्याचा तर खर्च वाचेलच परंतु दुधाच्या उत्पन्नात देखील वाढ होईल.
तुतीची लागवड करू इच्छित शेतकऱ्यांना ५० फुट लांब व २२ फुट रुंद या आकाराचे कीटक संगोपनगृहासाठी अनुदान दिले जाणार आहे.
रेशीम शेती योजनेसाठी लाभार्थ्याची निवड पद्धत खालीलप्रमाणे केली जाणार आहे
- तुती लागवड योजना अंतर्गत लाभ घेण्याकरता ग्रामपंचायतने गावात दवंडी देणे गरजेचे आहे.
- गावामध्ये जेवढे whatsapp ग्रुप आहेत तेवढ्या ग्रुपमध्ये या योजनेचा प्रसार संबधित अधिकाऱ्यांनी करावा.
- अर्ज करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या प्रत्येक महसुली गावात 24 तास अर्ज टाकता येईल अशा ठिकाणी अर्ज पेटी ठेवावी लागणार आहे.
- अर्ज पेटी सार्वजनिक इमारत जसे कि, अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत, समाज मंदिर येथे लावली जाणार आहे.
- इच्छुक लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज अर्ज पेटी टाकावे त्यामध्ये फळबाग, फुल पिकाचे कार्य ग्रामपंचायत किंवा फलोत्पादन कृषी विभाग यापैकी कोणाकडून हि योजना राबविण्यास इच्छुक आहात याचा स्पष्ट उल्लेख लाभार्थ्यास करावा लागणार आहे.
- ऑनलाईन अर्ज करण्याची व्यवस्था तयार झाल्यावर लाभार्थ्यांनी शक्यतो ऑनलाईन अर्ज करावा.
- पत्रपेटी दर सोमवारी उघडण्यात येऊन त्यातील ऑफलाईन अर्ज ऑनलाईन करण्याचे काम ग्रामपंचायतचे असेल.
अर्जाचा नमुना खाली उपलब्ध आहे
- प्राप्त अर्जांना त्या गावातील ग्रामसभेची मंजुरी प्राप्त करून देण्याची जबाबदारी ग्रामसेवकाची असेल.
- कोणाला किती लाभ घेता येईल याबाबत निर्णय ग्रामसभेत घेणे आवश्यक आहे.
- ग्रामपंचायतच्या मान्यतेने लाभार्थ्याची निवड करण्यात येईल.
- योग्य प्रचार व प्रसिद्धी केल्यानंतर प्राप्त झालेले सर्व अर्ज पात्र लाभार्थ्यांच्या यादीत त्या पुढील होणाऱ्या ग्रामसभेत अवलोकनार्थ ठेवण्यात येईल.
- 15 जुलै ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आलेले सर्व अर्ज मंजूर करून त्या वर्षाचे लेबर बजेटमध्ये समाविष्ट करावे
- लेबर बजेट त्याचप्रमाणे लाभार्थ्यांची नावे लेबर बजेटमध्ये समाविष्ट झाली नाही व सदर लाभार्थी योजनेचा लाभ घेण्याची इच्छुक आहेत अशा लाभार्थींना योजनेचा लाभ मिळण्याकरता पूरक लेबर बजेट तयार करावे त्याकरता दिनांक 1 डिसेंबर ते पुढील वर्षाचे १४ जुलै पर्यंत अर्ज पेती अर्ज पेटीत किंवा ऑनलाईन प्राप्त अर्जंना त्याच्या महिन्याचे पंचायत सभेत मान्यता देऊन पंचायत समितीस मान्यतेसाठी पाठवावी तसेच त्यापुढील होणाऱ्या ग्रामसभेत सदर यादी अवलोकनार्थ प्रस्तुत करण्यात यावे.
- कृषी विभाग, पंचायत विभाग व रेशीम संचालनालय यांनी समन्वयाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तुती लागवड केलेल्या शेतकऱ्यांना अंडपुंज पुरवठा केला जाणार आहे.
हि आणि इतर महत्वाची माहिती या जीआरमध्ये दिलेली आहे. हा जी आर बघून घ्या आणि तुम्ही जर तुती लागवड करण्यास इच्छुक असाल म्हणजेच रेशीम शेती करण्यासाठी इच्छुक असाल तर लगेच तुमच्या ग्रामपंचायतशी संपर्क साधा.
रेशीम शेती अनुदान संदर्भातील माहिती
मनरेगा अंतर्गत रेशीम उद्योग विकास अंतर्गत एक एकर तुती लागवड करण्यासाठी
- जमीन तयार करणे
- नर्सरी रोपे तयार करून तुती लागवड.
- कीटक संगोपन.
- कीटक संगोपन.
- साहित्य कोश.
- उत्पादन.
- कीटक संगोपन गृह.
या सर्वकष बाबींना मान्यता देऊन योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात आली आहे. रेशीम शेती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १ एकर तुती लागवडीसाठी 2.24 लक्ष एवढे अनुदान 3 वर्षात विभागून दिले जाणार आहे.
1000 चौरस फूट बांधकामासाठी 99 हजार रुपये म्हणजेच एकूण 3.23 लक्ष एवढी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.
तुती लागवड योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- जमिनीचा सातबारा
- 8 अ
- आधार कार्ड.
- मनरेगा जॉब कार्ड.
- राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायाप्रत.
- फोटो.
- जात वर्गवारी.
रेशीम शेती अनुदान योजनेच्या अधिकृत माहितीसाठी येथे क्लिक करा.
सध्या या योजनेसाठी ऑफलाईनच अर्ज करावा लागणार आहे. परंतु भविष्यामध्ये ऑनलाईन अर्ज देखील सुरु होऊ शकतो.
रेशीम शेती योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा, ८अ, एकूण जमिनीचा दाखला,आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, फोटो बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे लागतात.
रोजगार हमी योजनेतून या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यासाठी ३.२३ लाख रुपये अनुदान मिळते.