नवीन हवामान अंदाज आला पहा कोणत्या जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस

नवीन हवामान अंदाज आला पहा कोणत्या जिल्ह्यात पडणार जोरदार पाऊस

पाहुण्यात नवीन हवामान अंदाज कसा आहे. मध्यंतरी आलेला पाऊस काही दिवसातच गायब झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी बांधवांच्या नजरा आकाशाकडे वळत आहेत. अशावेळी कृषी हवामान प्रभाग पुणे यांचा 13 ते 16 सप्टेंबर 2023 चा हवामान अंदाज आलेला आहे. जाणून घेवूयात कसा आहे हा नवीन हवामान अंदाज.

शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांनी परत एकदा माना टाकण्यास सुरुवात केली असून आता जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी बांधवाना लागलेली आहे.

आता जर पाऊस वेळेवर आला नाही तर शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

14 सप्टेंबर 2023 नवीन हवामान अंदाज

विदर्भातील गडचिरोली जिल्हा चंद्रपूर जिल्हा व यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली असल्याचे कृषी हवामान प्रभाग पुणे यांनी एका हवामान सूचना पत्रकाद्वारे प्रसिद्द केले आहे.

हा तर झाला विदर्भातील पावसाचा अंदाज. आता पाहुयात कि मराठवाड्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज कृषी हवामान प्रभाग पुणे यांनी वर्तविला आहे.

विदर्भ मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पुढील माहिती पण पहा विना गॅरंटी कर्ज योजना 30 लाख नागरिकांना मिळेल लाभ 17 सप्टेंबर पासून होणार सुरु Loan scheme 2023

15 सप्टेंबर 2023 अंदाज

15 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे कोल्हापुरातील घाट भागात पाऊस पडणार असल्याचा अंदाज कृषी हवामान प्रभाग पुणे यांनी वर्तविला आहे. छ. संभाजीनगर व जालना जिल्ह्यात तसेच विदर्भ विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बाब म्हणजे मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

16 सप्टेंबर रोजीचा अंदाज

सर्वात शेवटी म्हणजेच 16 सप्टेंबर रोजीचा हवामान अंदाज असा आहे कि कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात पाऊस पडेल.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, हिंगोली, नांदेड व जालना जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भातील बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कृषी हवामान प्रभाग पुणे यांच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

तर अशा प्रकारे दिनांक १४ ते १६ सप्टेंबर पर्यंत पाऊस पडणार असल्याचा हवामान अंदाज कृषी हवामान प्रभाग पुणे यांनी वर्तविला आहे.

नवीन हवामान अंदाज शिवाय शेतकरी बांधवाना कृषी सल्ला देखील देण्यात आलेला आहे. सविस्तर माहितीसाठी हे हवामान सूचना पत्रक पहा, त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

हवामान सूचना पत्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *