ड्रोन औषध फवारणी aushadh favarni drone संदर्भातील सविस्तर माहिती.
लग्नसमारंभामध्ये आपण ड्रोन उडतांना बघितला असेल. परंतु आता शेतातील औषध फवारणीसाठी देखील ड्रोनचा उपयोग केला जाणार आहे.
बऱ्याच शेतकरी बांधवाना शेतामध्ये ड्रोन औषध फवारणी विषयी माहित आहे परंतु तुम्ही असे शेतकरी असाल कि ज्यांना या ड्रोनद्वारे औषध फवारणी कशी केली जाते या विषयी माहित नाही तर मग हि माहिती खास तुमच्यासाठी आहे.
डिजिटल डीजी टीमने अशा शेतकऱ्यांची भेट घेतली कि त्यांच्याकडे स्वतः औषध फवारणीचा हा ड्रोन उपलब्ध आहे आणि याद्वारे ते त्यांच्या शेतात औषध फवारणी करतात.
एवढेच नव्हे तर हा ड्रोन काम कसे करतो, यामध्ये औषध कसे टाकले जाते, याचे सेन्सर काय कार्य करते, शेतकरी बांधवाना हा ड्रोन खरेदी करायचा असेल तर त्यासाठी अनुदान किती मिळते या संदर्भात सविस्तर माहिती या शेतकरी बांधवांकडून घेतलेली आहे.
बांधकाम कामगार नोंदणी 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने पहा प्रत्यक्ष उदाहरण bandhkam kamgar yojana.
ड्रोन औषध फवारणी aushadh favarni drone
शेतामध्ये औषध फवारणी करायची असेल तर त्यासाठी पाठीवरील पंपाचा उपयोग करावा लागतो. यामध्ये शेतकरी बांधवांना बराच वेळ लागतो.
जसजसे आधुनिकीकरण झाले तसतसा शेतीमध्ये बदल होत गेला. शेतातील पिकांवर आता ड्रोनचा उपयोग करून औषध फवारणी करण्याचे तंत्रज्ञान अवगत झाले आहे.
पिकांचे क्षेत्र मोठे असेल तर अगदी कमी वेळेत या ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी करणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतकरी बांधवाना या ड्रोन औषध फवारणी संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणे खूपच गरजेचे आहे.
ड्रोन औषध फवारणी करण्यासाठी मिळेल अनुदान
शेतकरी बांधवाना ड्रोन खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, लहान किंवा सिमान्तिक शेतकरी किंवा महिला शेतकरी यांना शासनाकडून ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते.
ड्रोन खरेदी करण्यासाठी ५० टक्के म्हणजेज ५ लाख रुपये अशा शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात दिले जाते.
इतर शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करण्यासाठी ४० टक्के म्हणजेच ४ लाख रुपये अनुदान दिले जाते.
शेतकऱ्यांना मिळणार प्रशिक्षण
आता महत्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना हा ड्रोन कसा उडवावा आणि औषध फवारणी कशी करावी या संदर्भात माहिती मिळेल कशी. यासाठी खास प्रशिक्षण देखील आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर हा औषध फवारणीचा ड्रोन घेवू इच्छित असाल तर हे प्रशिक्षण जरूर घ्या. त्यासाठी तुमच्या जिल्ह्यातील कौशल्य विकास योजना विभागाशी संपर्क साधा.
ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यासाठी शासनाकडून काही नियम आखून देण्यात आलेलेल आहेत. कोणते नियम आणि कोणत्या परवानग्या ड्रोनसाठी हव्या असतात हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
ड्रोनद्वारे फवारणीचे फायदे
- पारंपारिक फवारणी केल्यानंतर लगेच पाऊस आला तर औषधी हवा तसा परिणाम देवू शकत नाही. ड्रोनचे फवारे धुक्यासारखे असल्याने हे औषध पिकांच्या पानावर पडते व व्यवस्थित परिणाम दाखविते.
- पिकांवर पारंपारिक फवारणी केल्यानंतर पानावरून औषध वागले जात असल्याने औषध वाया जाण्याची शक्यता असते. ड्रोनमध्ये फॉग असल्याने औषध कमी प्रमाणात वाया जाते.
- पारंपारिक फवारणी करतांना शेतातून चालतांना साप, विंचू किंवा इतर प्राणी चावून हानी होण्याची शक्यता असते. ड्रोनद्वारे फवारणी केल्याने असा कोणताही धोका नसतो.
- विषबाधा हे पारंपारिक फवारणीमध्ये सगळ्यात मोठे कारण असते. ड्रोनद्वारे फवारणीमुळे हे टाळता येते.
ड्रोन फवारणीचा व्हिडीओ पहा
aushadh favarni drone या संदर्भातील सविस्तर माहितीचा एक व्हिडीओ खास तुमच्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. ड्रोन औषध फवारणी संदर्भातील खालील व्हिडीओ पहा.
तुम्ही जर वरील व्हिडीओ बगीतला असेल तर नक्कीच तुम्हाला ड्रोन औषध फवारणी संदर्भातील सविस्तर माहिती मिळाली असेल.
या संदर्भातील शासनाचे परिपत्रक बघण्यासाठीयेथे क्लिक करा.
वरील शासनाचे परिपत्रक वाचून घ्या याध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
सर्वसाधारण शेतकरी बांधवाना ड्रोन खरेदी करण्यासाठी एकून अनुदानाच्या ४० टक्के म्हणजेच ४ लाख रुपये मिळतात तर अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकरी बांधवांसाठी ५० टक्के म्हणजेच ५ लाख रुपये अनुदान दिले जाते.
ड्रोन खरेदी करण्यासाठी अर्ज कोठे आणि कसा करावा या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.