मुसळधार पावसाचा इशारा पहा कोणकोणत्या दिवशी पडणार पाऊस

मुसळधार पावसाचा इशारा पहा कोणकोणत्या दिवशी पडणार पाऊस

कृषी हवामान प्रभाग पुणे यांच्या वतीने मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. 26 ते 26 सप्टेंबर 2023 चे हवामान सूचना पत्रक काढण्यात आलेले आहे. आपण जाणून घेणार आहोत कि कोणत्या भागात कधी पाऊस पडणार आहे.

महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यात अजून शेतीसाठी आवश्यक असलेला पाउस पडला नाही. पुरेसा पाऊस न पडल्यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील विहीर बोअरला पाणी आलेले नाही परिणामी रब्बी हंगामाची चिंता शेतकरी बांधवांना लागलेली आहे.

बांधकाम कामगार नोंदणी 1 रुपयात ऑनलाईन पद्धतीने पहा प्रत्यक्ष उदाहरण bandhkam kamgar yojana.

शिवाय खरीपातील कपाशी सोयाबीन व इतर पिकांना देखील पावसाची आवश्यकता असल्याने शेतकरी बांधव मोठ्या  पावसाची वाट बघत आहे.

हवामान खाते कृषी हवामान प्रभाग पुणे यांनी या आठवड्यात कोणत्या भागात पाऊस पडणार आहे या संदर्भातील हवामान सूचना पत्रक काढलेले आहे जाणून घेवूयात या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये.

मुसळधार पावसाचा इशारा पिकांना मिळणार नवसंजीवनी

28 सप्टेंबर 2023 रोजी कोकणामध्ये तुरळ ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सर्व भागात तुरळ ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 29 सप्टेंबर रोजी कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या दिवशी महाराष्ट्रातील सर्वच भागात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

30 सप्टेंबर रोजी देखील कोकणात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघ गर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना कृषी सल्ला

या हवामान सूचना पत्रकामध्ये मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सल्ला देण्यात आलेला आहे तो असा आहे.

भाजीपाला पिकांतून व फळबागातून पुरेशा पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी. शेतकरी बांधवानी आपल्या शेतातील काढणी केलेल्या मूग उडीद पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची व विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने  या कालावधीत शेतकऱ्यांनी जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधण्याचा सल्ला देखील कृषी हवामान प्रभाग पुणे यांनी दिला आहे.

शेतकरी बंधुनो हा होता 26 सप्टेंबर 2023 ते 30 सप्टेंबर 2023 चे कृषी हवामान प्रभाग पुणे यांचे हवामान सूचना पत्रक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *