25 टक्के पिक विमा बँक खात्यात या दिवशी होणार जमा विमा संरक्षित रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा

25 टक्के पिक विमा बँक खात्यात या दिवशी होणार जमा विमा संरक्षित रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा

लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 25 टक्के पिक विमा रक्कम जमा होणार असून या संदर्भातील तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे.

या हंगामामध्ये म्हणजेच खरीप हंगाम २०२३ मध्ये पाऊस कमी झाल्याने शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत राज्यातील एक कोटी 70 लाख 67 हजार शेतकऱ्यांनी यंदा पिक विमा भरला आहे. एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या हिश्याचे चारशे सहा कोटी रुपये राज्य सरकारने विमा कंपन्यांना वितरित केले आहेत.

1 रुपयात पिक विमा नोंदणी शेतीसाठी 12 तास दिवसा लाईट शेतकऱ्यांना प्रती वर्ष मिळणार 12 हजार रुपये

या दिवशी जमा होणार 25 टक्के पिक विमा

त्यामुळे पावसाभावी खरीप पिकांचे नुकसान झालेल्या जवळपास सव्वा कोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेतील 25% रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

एन सणासुदीच्या तोंडावर 25 टक्के पिक विमा मिळणार असल्याने त्यांची येणारी दिवाळी गोड होणार आहे.

साधारणतः 20 ऑक्टोबर पासून नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

खरीप हंगाम २०२३ मध्ये एक कोटी 40 लाख 97 हजार हेक्टरवर शेतकरी बांधवानी खरीप पिकांची पेरणी केली होती. पेरणी झाल्यावर मात्र पावसाचा खूप मोठा खंड पडला. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पावसाभावी खूप मोठे नुकसान झाले.

एक रुपयात पिक विमा मधील शेतकरी हिश्याची रक्कम पिक विमा कंपनीला सरकारकडून मिळालेली नव्हती त्यामुळे पिक विमा कंपन्यांकडून काहीही हालचाल होत नव्हती.

पिक विम्याचा मार्ग मोकळा विमा कंपन्याना निधी वितरीत शेतकऱ्यांना मिळणार मदत शासनाचा नवीन जी आर

पिक विमा उतरविणे महत्वाचे

आता मात्र सरकारने पैसे वितरित केले असून तत्पूर्वी विम्यापोटी केंद्र व राज्य सरकारचा 3 हजार कोटी रुपयांचा हिस्सा देखील पिक विमा कंपन्यांना मिळालेला आहे.

त्यामुळे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा उतरविणे खूपच गरजेचे आहे. नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले तर अशावेळी पिक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई देण्यात येते.

यावर्षी केवळ १ रुपयामध्ये पिक विमा भरण्याची सुविधा करण्यात आली असल्याने अनेक शेतकरी बांधवानी त्यांच्या शेतातील पिकांचा पिक विमा उतरविला होता.

अशा पद्धतीने 25 टक्के पिक विमा संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतलेली आहे. तुम्ही देखील तुमच्या शेतातील पिकांचा पिक विमा काढलेला असेल तर तुमच्यासाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *