४० पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये दुष्काळ हेक्टरी ८५०० ते २२५०० मिळणार आर्थिक मदत drough anudan 2023

४० पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये दुष्काळ हेक्टरी ८५०० ते २२५०० मिळणार आर्थिक मदत drough anudan 2023

महाराष्ट्रामध्ये खरीप हंगाम २०२३ मध्ये सरासरीएवढा देखील पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील ४३ तालुक्यामध्ये दुष्काळाचा ट्रिगर टू लागू करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ५ जालना जिल्ह्यातील ५ तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक सात तालुक्याचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

पावसाळ्यात सरासरीपेक्षा अत्यल्प पडलेला पाऊस, पावसाचा खूप दिवसाचा पडलेला खंड, जमिनीतील घातलेली पाणी पातळी, पिक पेरा व अपेक्षित उत्पादनात 50 टक्के पेक्षा अधिक घट, शेतकरी बांधवांची संपूर्ण पिके पाण्या अभावी वाया जाणे, जनावरांचा गंभीर चारा प्रश्न, पिण्याच्या पाण्याची टंचाई व पाणीपुरवठा होणाऱ्या स्त्रोताची स्थिती अशा सर्व बाबींचा विचार करून काही तालुक्यांमध्ये दुष्काळ संदर्भातील ट्रिगर टू लागू करण्यात आला आहे.

43 तालुक्यांमध्ये ट्रिगर एक व दोन लागू

दरम्यान खरीप 2023 हंगामा दुष्काळाचे मूल्यांकन महा मदत प्रणाली द्वारे करण्यात आले आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यासह राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ट्रिगर एक व दोन लागू करण्यात आला आहे. ट्रिगर टू लागू झालेल्या तालुक्यातील क्षेत्रीय सर्वेक्षणासाठी महाराष्ट्र राज्य सुदूर संवेदन उपायोजना केंद्र नागपूर, यांच्यावतीने तयार केलेल्या महा मदत ॲपचा वापर करावा लागणार आहे.

त्यानुसार दुष्काळ कशा स्वरूपाचा आहे याचा अहवाल तयार होईल व त्यानंतर दुष्काळाची अंतिम कार्यवाही तयार होऊन बाधित शेतकऱ्यांच्या बँकखात्यामध्ये नुकसान भरपाईची आर्थिक मदत जमा होईल.

ही प्रक्रिया आता सुरू होणार असून त्याचा अहवाल ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस शासनाला सादर होईल आणि त्यानंतर राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली जाणार आहे. drough anudan 2023

शासनाकडून देण्यात येणाऱ्या मदतीचे स्वरूप असे आहे

जिरायतीसाठी 8,500 प्रती हेक्टर.

बागायतीसाठी 17000 प्रती हेक्टर.

बहुवार्षिकसाठी 22500 प्रती हेक्टर.

या तालुक्यातील स्थिती चिंताजनक

उल्हासनगर

शिंदखेडा.

नंदुरबार.

मालेगाव.

सिन्नर.

येवला.

बारामती.

दौड.

इंदापूर.

मुळशी.

पुरंदर.

शिरूर.

बेल्हे.

बार्शी.

करमाळा.

माढा.

माळशिरस.

सांगोला.

अंबड.

बदनापूर.

भोकरदन.

जालना.

मंठा.

कडेगाव.

खानापूर.

मिरज.

शिराळा.

खंडाळा.

वाई.

हातकणंगले.

गडहिंग्लज.

औरंगाबाद.

सोयगाव.

अंबाजोगाई.

धारूर.

वडवणी.

रेणापूर.

लोहारा.

धाराशिव.

वाशी.

बुलढाणा.

लोणार.

या तालुक्यांमध्ये पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *