विश्वकप स्पर्धेतील इंग्लड विरुद्ध अफगाणिस्तान सामना प्रेरणेचा स्त्रोत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्वतःच्या सामर्थ्याचा पूर्ण ताकदीने उपयोग केला कि मग यश मिळतेच मग समोर इंग्लड असोत कि ऑस्ट्रेलिया. अफगाणिस्तान संघामध्ये खूप गुणवान खेळाडू आहेत.
फक्त त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देण्याचे काम खूपच महत्वाचे होते आणि ते केले प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट आणि अजय जडेजा यांनी.
मुद्दा हा नाही कि अफगाणीस्तान जिंकले मुद्दा हा आहे कि जेंव्हा तुम्ही तुमच्या सर्वात बेस्ट लेव्हलवर खेळता मग तो खेळ क्रिकेटचा असो कि जीवनाचा त्यावेळी जो परिणाम मिळतो तो आश्चर्यजनक असतोच. अफगाणिस्तान संघ हा इतर संघाच्या तुलनेत थोडासा दुबळा मानला जातो. त्यामुळे इंग्लड सारख्या विश्वविजेता संघाला हरविणे नक्कीच अफगाणीस्तान संघासाठी आव्हान होते.
विश्वकप स्पर्धेत आव्हान तर मिळणारच आहे, परंतु हे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य तुमच्यामध्ये असले पाहिजे किंबहुना त्या सामर्थ्याची जाणीव करून देणारा कोणीतरी लागतोच तेच काम केले विश्वकप स्पर्धेसाठी अफगाणीस्तानचा प्रशिक्षक असलेला भारतीय क्रिकेटर अजेय जडेजा यांनी.
दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियममध्ये जमलेली सर्व गर्दी फक्त अफगाणिस्तान संघाला जिंकताना बघण्यासाठी आली होती. विश्वकप १९९६ मधील सेमीफायनलचा तो सामना आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे.
जेंव्हा पाकिस्तानचा गोलंदाज वकार युनुस आग ओकत होता तेंव्हा शेवटच्या षटकात अजय जडेजाने धुव्वाधार फलंदाजी केली होती हि गोष्ट देखील अफगाण खेळाडूंमध्ये बिंबलेली असणार त्यामुळेच कि काय रहमानुल्लाह गुरबाजला इंग्लडच्या प्रत्येक गोलंदाजामध्ये वकार युनुसच जणू दिसत होता.
कितीही मोठे संकट असू द्या मनाला सांगा कि तू तुझ्या पूर्ण क्षमतेने खेळ, एकदा का तुम्हाला तुमच्या सामर्थ्याची ओळख पटली कि मग समोर साहेब (इंग्रज) असोत किंवा जीवनातले मोठे संकट, त्याला धोबीपछाड मिळालाच म्हणून समजा.