नमो शेतकरी योजना हफ्ता मिळाला नाही. का मिळत नाही हफ्ता असे शोधा कारण namo shetkari sanman yojana 2023

नमो शेतकरी योजना हफ्ता मिळाला नाही. का मिळत नाही हफ्ता असे शोधा कारण namo shetkari sanman yojana 2023

तुम्हाला जर नमो शेतकरी योजना अंतर्गत २००० रुपयांचा हफ्ता आला नसेल namo shetkari sanman yojana 1st installment तर जाणून घ्या तुमच्याकडून काय चूक झाली आहे आणि ती कशी दुरुस्त करता येईल.

सगळ्यात आधी लक्षात घ्या ज्या प्रमाणे पीएम किसान सन्मान निधीचे वार्षिक 6 हजार रुपये मिळतात अगदी त्याच प्रमाणे नमो शेतकरी योजनेचे देखील वार्षिक 6 हजार रुपये मिळणार आहेत.

म्हणजेच आता शेतकरी बांधवाना दोन्ही योजना मिळून वार्षिक १२ हजार रुपये आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

अनेकांना नमो शेतकरी सन्मान निधीचा २ हजार रुपयांचा हफ्ता बँकेत जमा झालेला आहे. तुम्हाला जर हा 2000 रुपयांचा हफ्ता मिळाला नसेल तर तो का मिळाला नाही त्याचे कारण काय आहे हे कसे बघावे या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

namo shetkari sanman yojana 1st installment

नमो शेतकरी योजना अंतर्गत मिळणार यापुढे वार्षिक 2 हजार रुपये

ज्या प्रमाणे प्रधान मंत्री किसान सन्मान निधीचा 2 हजार रुपयांचा हफ्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो अगदी त्याच धर्तीवर नमो शेतकरी योजनेचा देखील २ हजार रुपयांचा हफ्त बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.

आताचा जो हफ्ता आहे तो तर महाराष्ट्र शासनाने नव्याने सुरु केलेल्या नमो शेतकरी योजनेचा आहे. आता हि जी नमो शेतकरी योजना आहे ती पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर बनविलेली आहे.

त्यामुळे तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता नियमित मिळत असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हफ्ता देखील नियमित मिळणार आहे.

तुमच्या मोबाईलवर तपसा नमो शेतकरी योजनेचा हफ्ता न मिळाल्याचे कारण

तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळत नसेल तर तो का मिळत नाही त्यांचे कारण काय आहे या संदर्भात तुम्हाला माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

एकदा का तुम्हाला कळले कि पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता तुम्हाला का मिळत नाही तर नमो शेतकरी सन्मान निधीचा हफ्ता देखील का मिळत नाही याचे उत्तर तुम्हाला नक्की मिळेल.

चला तर जाणून घेवूयात तुमच्या नमो शेतकरी योजना अंतर्गत मोबाईलवर कसे बघावे कि पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता का मिळत नाही.

हि सर्व प्रोसेस आपण मोबाईलवर करून दाखविणार आहोत कारण बऱ्याच शेतकरी बांधवांकडे मोबाईल असतो त्या तुलनेत संगणक असेलच याची शास्वती नाही त्यामुळे मोबाईलवर जर या संदर्भात शेतकरी बांधवाना समजून सांगितले तर नक्कीच त्यांना याचा फायदा होणार आहे.

चला तर जाणून घेवूयात कि पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळत नसेल तर कसे तपासावे कि हा हफ्ता का मिळत नाही.

असे तपासा ऑनलाईन

 • सगळ्यात आधी तुमच्या मोबाईमधील ब्राउजर ओपन करा.
 • ब्राउजरच्या सर्च बारमध्ये टाईप करा pm kisan sanman nidhi  आणि सर्च करा. जसे हि तुम्ही हे सर्च कराल तर असा इंटरफेस तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसेल. पेजला थोडे खाली स्क्रोल करा.
 • या ठिकाणी Know Your Status हा पर्याय शोधा आणि त्यावर टच करा.
 • जसे हि तुम्ही या पर्यायावर टच कराल त्यावेळी असा इंटरफेस तुम्हाला दिसेल. या ठिकाणी तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे.
 • रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला माहित नसेल तर या ठिकाणी know your registration number अशी एक लिंक दिसेल त्यावर टच करा.
 • आता तुम्हाला तुमचे नाव सर्च करण्याचे दोन पर्याय या ठिकाणी दिसेल. पहिला आहे मोबाईल नंबर आणि दुसरा आहे आधार नंबर.

पीएम किसान सन्मान योजनेचा रजिस्ट्रेशन मिळविण्याची पद्धत

 • मोबाईल नंबर या पर्यायावर टच करा.
 • तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाका.
 • कॅपचा कोड टाका.
 • गेट मोबाईल ओटीपी या बटनावर टच करा.
 • आता तुमच्या मोबाईलवर ओटीपी पाठविण्यात येईल तो दिलेल्या चौकटीमध्ये टाका आणि गेट डीटेल्स या बटनावर टच करा.
 • या ठिकणी तुम्हाला तुमचा पीएम किसान सन्मान निधीचा रजिस्ट्रेशन क्रमांक दिसेल तो कॉपी करून घ्या किंवा एखाद्या ठिकाणी सुरक्षित सेव्ह करून ठेवा.
 • परत एकदा पीएम किसान सन्मान निधी हि वेबसाईट ओपन करा.
 • Know your Status या बटनावर टच करा.
 • आता जो तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर कॉपी केलेला आहे किंवा ज्या ठिकाणी हा रजिस्ट्रेशन नंबर जतन करून ठेवलेला आहे त्या ठिकाणाहून कॉपी करा आणि या दिलेल्या चौकटीत टाका.
 • त्यानंतर कॅपचा कोड टाका आणि गेट डीटेल्स या बटनावर टच करा.
 • या ठीकानी पीएम किसान योजना संदर्भातील संपूर्ण माहिती दिसेल. पेजला थोडे खाली स्क्रोल करा.
 • या ठिकाणी एक पर्याय तुम्हाला दिसेल FTO Processed या समोर जर Yes असेल तर तुम्हाला काही समस्या नाही मात्र या ठिकाणी No असेल तर अडचण आहे असे समजावे.
 • पेजला थोडे अजून खाली स्क्रोल केल्यावर Reason of FTO Not processed आणि याच ठिकाणी तुम्हाला दिसेल कि तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता का मिळत नाही. या ठिकाणी जे कारण दिले असेल त्याची पूर्तता करून घ्या.

अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जाणून घेतले आहे कि तुम्हाला जर पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता मिळत नसेल तर तो का मिळत नाही हे कसे तपासावे. कारण यानुसारच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा देखील हफ्ता मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *