सोयाबीन लवकरच 5500 प्रती क्विंटल होणार today soyabean rate

सोयाबीन लवकरच 5500 प्रती क्विंटल होणार today soyabean rate

सोयाबीन लवकरच सोयाबीन लवकरच 5500 प्रती क्विंटल होणार असून अजून काही दिवस थांबले तर शेतकऱ्यांना अधिकच नफा मिळू शकतो.

महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी बांधवांच्या तोंडाचे पाणी पाळले आहे. पाणी नसल्याने शेतातील पिके सुकून गेली आहेत जी आली आहे ती अगदी कमी आहेत.

या वर्षी पाऊस चांगला राहील या आशेने अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये सोयाबीन पिकांची लागवड केली होती.

पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणत घट आली आहे. शेतीला लागणाऱ्या खत व औषधांसाठी शेतकरी बांधवानी इतरांकडून घेतलेले पैसे चुकते करण्यासाठी आपल्या शेतातील सोयाबीन विकण्याच्या तयारीत शेतकरी बांधव लागलेले आहेत.

सोयाबीनची मळणी मोठ्या प्रमाणात सुरु असून अनेक शेतकरी बांधवानी विक्रीसाठी हि सोयाबीन मार्केटमध्ये नेण्यास सुरुवात केली आहे.

बांधकाम कामगार नोंदणी अर्जाचे ऑनलाईन माहिती तपासा मोबाईलवर

दरात वृद्धी होणार सोयाबीन लवकरच 5500

सध्या सोयाबीनला 4 हजार 700 ते 800 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. खर्चासाठी पैसे नसल्याने अनेक शेतकरी बांधव आपल्या शेतातील सोयाबीन अगदी कमी बाजारभावात देखील विक्रीसाठी बाजारात नेत आहेत.

तुम्हाला जर घाई नसेल तर सोयाबीनविक्रीसाठी अजून थोडा वेळ थांबल्यास 5,500 प्रती क्विंटलच्या दराने सोयाबीन खरेदी केली जावू शकते.

दिवाळीच्या आसपास साडेपाच हजार रुपये भाव सोयबीन पिकास मिळू शकतो त्यामुळे थोडा वेळ अजून वाट पहिली तर नक्कीच या भाववाढीमळे शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळू शकतात.

सोयाबीन भाववाढ संदर्भातील दैनिक वृत्तपत्रातील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

पावसाने खंड दिल्याने या वर्षी शेतकरी बांधवांच्या सर्वच मालाच्या उत्पादनात घट झाली असल्याने खूप मोठा आर्थिक फटका शेतकरी बांधवाना बसणार आहे.

ज्या शेतकरी बांधवांच्या शेतात विहिरी किंवा इतर सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी कसेतरी पिक जगविले आहे. पावसाभावी शेतातील विहीर बोअर यांना पाणी आले नाही परिणामी शेतातील पिकांना पाणी देता आले नाही आणि याचा फटका शेतकरी बांधवाना बसलेला आहे.

अशा करूयात कि सोयाबीनच्या भावात आणि तर पिकांच्या बाजारभावात देखील चांगली वाढ होवो जेणे करून शेतकरी बांधवाना फायदा होईल.

शेतीसाठी सिंचन व्यवस्था महत्वाची

मागील काही वर्षी भरपूर पाऊस पडला असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याही अडचण आली नाही. परंतु या वर्षी मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता भासत आहे.

शेतामध्ये खोदलेल्या विहिरीला पाणी असेल तर शेतकरी बांधवांच्या शेतातील पिके जोमदार असतात. यासाठी शेतातील विहीर किंवा बोअरसाठी पुनर्भरण करणे गरजेचे आहे जेणे करून शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर किंवा बोअरला मुबलक पाणी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *