पहिल्या टप्प्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर मर्यादेत मिळणार मदत

पहिल्या टप्प्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर मर्यादेत मिळणार मदत

राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टर मर्यादेत मदत मिळणार, जे अल्पभूधारक नाहीत त्यांना देखील मिळणार लाभ पहा सविस्तर माहिती.

राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे अशामध्ये महाराष्ट्रातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

खरीप हंगाम 2023 शेतकरी बांधवांसाठी खूपच वाईट गेलेला असून अनेक भागात पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकरी बांधवांवर दुष्काळाची परिस्थिती ओढवली आहे.

सुरुवातीला 40 तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला असून उर्वरित तालुक्यातील ज्या मंडळामध्ये कमी पाऊस झाला आहे त्या तालुक्यांमध्ये दुष्काळाच्या निकषानुसार मदत दिली जाणार असल्याची माहिती या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आली आहे.

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना मिळू शकेल १ लाखापर्यंत अनुदान.

40 तालुक्यात दुष्काळ जाहीर 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर मर्यादेत मिळणार मदत

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार 2 हेक्टर ऐवजी आता तीन हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

जून ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाले होते.

त्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निर्देशानुसार २ हेक्टर ऐवजी आता तीन हेक्टर मर्यादेत मदत  देण्यात येणार असल्याने शेतकरी बांधवाना याचा फायदा होणार आहे.

जे शेतकरी अल्पभूधारक होते त्यांना या योजनेचा जास्त लाभ मिळत नव्हता आता मात्र जे अल्पभूधारक शेतकरी नाहीत त्यांनाही हि मदत मिळणार आहे.

रब्बी पेरण्या खोळबंल्या

यावर्षी खरीप हंगामध्ये कमी पाऊस झाल्याने रब्बी हंगामावर देखील त्याचा विपरीत परिणाम होत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी पाण्याअभावी रब्बीच्या पेरण्या केलेल्या नाहीत परिणामी गहू, हरभरा या रब्बी पिकांच्या उत्पादनात खूप मोठा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अजूनही बरेच शेतकरी रब्बीमध्ये एखाद्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत जेणे करून हरभरा किंवा इतर रब्बी पिकांना फायदा होऊ शकेल.

जे उर्वरित तालुके आहेत त्यामध्ये देखील शासनाने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा जेणे करून त्यांना आर्थिक मदत मिळेल. 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरित तालुक्यामध्ये देखील लवकरच घोषणा केली जाणार आहे.

या लेखाचा सारांश.

काल दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी मंत्री मंडळ बैठक

40 तालुक्यात दुष्काळ जाहीर.

2 हेक्टर ऐवजी आता तीन हेक्टर मर्यादेत मदत मिळणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *