कारागृहातील कैद्यांना मिळणार स्मार्टफोन
तुमचा नातलग जर कारागृहामध्ये असेल आणि तुम्हाला त्यांच्याशी बोलायचे असेल तर आता शक्य होणार आहे कारण महाराष्ट्रातील येरवडा मध्यवर्ती कारागृहामधील बंदीजनांकरीता स्मार्टकार्ड फोन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
कारागृहातील बंदीजणांना दिली जाणारी हि सुविधा प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वीत करण्यात आली आहे. हि योजना जर यशस्वी झाली तर भविष्यामध्ये अशा प्रकारे स्मार्टकार्ड फोन सुविधा महाराष्ट्र राज्यातील सर्व कारागृहांतील बंदीजनांकरीता उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
एखाद्या व्यक्तीच्या हातून काही गुन्हा घडला असेल तर त्याला शिक्षा म्हणून कारागृहात ठेवले जाते. जर ती व्यक्ती घरातील मुख्य व्यक्ती असेल तर घरातील इतर सदस्यांना खूप समस्यांचा सामना करावा लागतो.
त्यामुळे आता कैद्यांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ दिला जात आहे आणि त्यातीलच एक योजना म्हणजे बंदीजणांना पुरविली जाणारी स्मार्टकार्ड फोन सुविधा होय.
कारागृहातील कैद्यांना मिळणार स्मार्टफोन व्हिडीओ पहा
जिव्हाळा योजना अंतर्गत मिळतात ५० हजार रुपये.
अशाच प्रकारची आणखी एक अभिनव योजना १ मे २०२२ रोजी सुरु करण्यात आली होती आणि या योजनेचे नाव होते जिव्हाळा योजना.
या योजना अंतर्गत कारागृहातील बंदीजणांच्या परिवाराला ५० हजार रुपयांचे कर्ज ७ टक्के व्याजदराने उपलब्ध करून देण्यात आले होते. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप. बँकेच्या वतीने हे कर्ज बंदिवानांना दिले जाते. कर्जाची परतफेड अगदी सुलभ पद्धतीने असते.
तुम्हाला जर जिव्हाळा योजना संदर्भात सविस्तर माहिती हवी असेल तर खालील लिंकवर क्लिक करून अधिकची माहिती जाणून घ्या.
जिव्हाळा कर्ज योजना सुरु जाणून घ्या कोण आहेत यासाठी पात्र
येरवडा नंतर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये सुरु होणार हि योजना
आता अशाच प्रकारची आणखी एक नवीन योजना राबविली जाणार आहे. कारागृहातील बंदिवानांना स्मार्ट फोन उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या परिवारांना हे खूपच सोयीचे होणार आहे.
कारागृहातील बंदिवानांना भेटण्यासाठी लागणारा वेळ या स्मार्टफोन योजनेमुळे वाचणार असल्याने नक्कीच हि योजना कारागृहातील बंदिवान व त्यांच्या परिवारासाठी लाभदायक ठरणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर सुरु असलेली हि योजना लवकरच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू केली जाणार आहे. त्यामुळे तुमचे नातेवाईक कदाचित कारागृहात बंदिवान असतील तर तुमच्यासाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे.