जिव्हाळा कर्ज योजना सुरु जाणून घ्या कोण आहेत यासाठी पात्र

जिव्हाळा कर्ज योजना सुरु जाणून घ्या कोण आहेत यासाठी पात्र

राज्यामध्ये जिव्हाळा कर्ज योजना नुकतीच सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते जिव्हाळा कर्ज योजनेचा karj yojana शुभारंभ करण्यात आला आहे.

जिव्हाळा कर्ज योजना फक्त ठराविक लोकांनाच लागू असणार आहे. कोणत्या व्यक्ती यासाठी पात्र आहेत या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेवूयात.

shetkari whatsapp group
shetkari whatsapp group

या योजनेची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. जिव्हाळा कर्ज योजनेचे स्वरूप कसे आहे. या योजना अंतर्गत किती कर्ज मिळते. कर्जाच्या अटी आणि शर्थी बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा.

जिव्हाळा कर्ज योजनेची सविस्तर माहिती पहा त्यासाठी येथे क्लिक करा.

जिव्हाळा कर्ज योजना अंतर्गत कर्ज वाटपास सुरुवात.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे हि जिव्हाळा कर्ज योजना राबविली जाणार आहे. नुकताच जिव्हाळा कर्ज योजनेचा शुभारंभ झाला असून बंदिवानांच्या परिवारांना आता अर्ज उपलब्ध होणार आहे.

जे कैदी किंवा बंदिवान सध्या शिक्षा भोगत आहेत त्यांना ५० हजार रुपयांचे कर्ज ७ टक्के व्याजदराने दिले जाणार आहे. यामुळे शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांच्या परिवारांना याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो.

बंदिवान घरातील कर्ते व्यक्ती असतात. अशावेळी मुख्य कर्ता व्यक्तीच घरात नसेल तर त्या कुटुंबाना आर्थिक अडचणीचा सामना कारवा लागतो. अशावेळी या योजना अंतर्गत कर्ज मिळाले तर घरातील इतर कुटंबाची आर्थिक गरज भागू शकते.

पुढील योजना पण बघा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

जिव्हाळा कर्ज योजना बदिवांच्या कुटुंबियांसाठी लाभदायक.

बंदिवान यांना दिले जाणारे कर्ज त्यांच्या कामातून फेडले जाणार आहेत. या कर्जामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च, त्यांच्या दवाखान्याचा खर्च आणि इतर कारणासाठी करावा लागणारा खर्च भागला जावू शकतो.

खारातील कर्त्या पुरुषावर घरातील संपूर्ण जबाबदारी असते अशावेळी तीच व्यक्ती कारागृहामध्ये असेल तर त्या व्यक्तींच्या परिवारातील सदस्यांवर काय संकट येते हे आपण समजू शकतो.

पुढील योजनेचा पण लाभ घ्या. व्यवसायासाठी मिळणार १० लाखापर्यंत कर्ज

येरवडा कारागृहामध्ये लागू झाली योजना

कर्ता व्यक्ती कारागृहामध्ये असेल तर संपूर्ण कुटुंबाबर आर्थिक संकट ओढवते. अशावेळी खर्च करण्यासाठी पैसा उपलब्ध होत नाही त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट येवू शकते. त्यामुळे हि योजना हि बंदिवान तसेच बंदिवांच्या परिवारासाठी खूप महत्वाची योजना ठरू शकते.

जिव्हाळा कर्ज योजना

हि योजना येरवडा कारागृहामध्ये लागू झालेली आहे. तुमच्या नातेवाईकांमध्ये किंवा मित्र परिवारामध्ये जर कोणी शिक्षा भोगत असेल तर त्यांना नक्की या योजनेची माहिती कळवा. जेणे करून त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

या योजनेसंदर्भातील माहिती शासनाच्या महासंवाद या वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. हि माहिती वाचण्यासाठी खालील लिंकला टच करा.

योजनेची अधिकृत माहिती वाचा येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *