50 हजार रु. कर्ज विनातारण फक्त यांनाच मिळणार या योजनेचा लाभ.

50 हजार रु. कर्ज विनातारण फक्त यांनाच मिळणार या योजनेचा लाभ.

50 हजार रु. कर्ज ते देखील मिळणार विनातारण जाणून घेवूयात या योजनेविषयी. तुमच्या घरातील किंवा नातेवाईक यांच्यामधील एखादी व्यक्ती जेलमध्ये म्हणजेच कारागृहामध्ये असेल तर अशा व्यक्तींना आता 50 हजार रुपयाचे कर्ज मिळणार आहे. हे कर्ज दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह बँकेद्वारे दिले जाणार असून याचा व्याजदर ७ टक्के एवढा असणार आहे.

कैद्यांना दिले जाणारे 50 हजार रु. कर्ज हि एक अभिनव योजना असून संपूर्ण भारतामध्ये पहिल्यांदाच हि योजना राबविली जाणार आहे.

सध्या हि योजना प्रायोगिक तत्त्वावर पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे राबविली जाणार असल्याची माहिती महासंवाद या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेली आहे. या संदर्भातील शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप लिंक

50 हजार रु. कर्ज योजना का राबविली जात आहे.

जे कैदी सध्या कारागृहामध्ये शिक्षा भोगत आहेत त्यांच्या जीवनमानात सुधारणा होऊन त्यांचे पुनर्वसन व्हावे या दृष्टीकोनातून हि योजना राबविली जाणार आहे. 50 हजार रु. कर्ज अशा प्रकारची हि भरतातील अगदी नाविन्यपूर्ण पहिलीच योजना असणार आहे ज्यामुळे शिक्षा भोगत असलेल्या कैद्याला ५० हजार रुपयांचे कर्ज ते देखील वार्षिक ७ टक्के व्याजदराने मिळणार आहे.

कैदी जेंव्हा जेलमध्ये शिक्षा भोगत असतात त्यावेळी त्यांना येथे काम करावे लागते. कैद्यांनी केलेल्या कामातून कारागृहास उत्पन्न मिळत असते याच उत्पन्नापोटी कैद्यांना कर्ज देणारी हि पहिलीच अभिनव योजना राबविली जात आहे. यामुळे अंदाजे १०५५ कैद्यांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

पुढील लेख पण वाचा अशी करा मोबाईलवर पीएम किसान ekyc

कारागृहामध्ये असे अनेक कैदी असतात ज्यांची शिक्षा दीर्घ मुदतीची असते. यामुळे त्यांच्या परिवारातील सदस्यांवर नैराश्याची परिस्थिती उद्भवू शकते. जर कैद्यांना असले कर्ज दिले गेले तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची गरज भागेल व शिक्षा भोगत असलेल्या कैद्याविषयी त्यांच्या परिवारामध्ये सहानुभूती निर्माण होईल अशी देखील शक्यता असते.

50 हजार रु. कर्ज

50 हजार रु. कर्ज कोणत्या निकषावर आणि कसे मिळणार कैद्यांना कर्ज.

कैद्यांना किंवा बंदिवानांना कर्ज देताना खालील बाबींचा विचार केला जाईल.

  • शिक्षेचा कालावधी.
  • मिळालेल्या शिक्षेमधून मिळणारी संभाव्य सूट.
  • कैद्याचे वय.
  • कैद्याचे वार्षिक कामाचे अंदाजित दिवस.
  • प्रति दिवसाचे किमान उत्पन्न.

वरील प्रमाणे बाबी कर्ज देताना विचारात घेतल्या जातील. जे कर्ज कैद्याला किंवा बंदिवान यांना दिले जाईल ते कर्ज घेण्यासाठी कोणत्याही जमीनदाराची आवश्यकता राहणार नाही. हे कर्ज संबंधित बंद्याला विनातारण व केवळ व्यक्तीगत हमीवर देण्यात येईल.

हा लेख पण वाचा या शेतकऱ्यांना पण मिळणार ५० हजार रुपयाचे अनुदान

कर्जासाठी ठरवून दिल्या जातील खालील अटी

  • जे कर्ज कैद्याला दिले जाईल त्याचा उपयोग स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी किंवा कैद्याला वकील लावण्यासाठी जो खर्च आला असेल त्याची फी देण्यासाठी करेल किंवा इतर कायदेशीर बाबीसाठीच करेल याची जबाबदारी कर्ज देणाऱ्या बँकेची असणार आहे.
  • जेंव्हा कैदी घेतलेले कर्ज बँकेस फेडेल त्यावेळी कर्जाच्या परतफेडीतून वसूल केला जाणाऱ्या रकमेच्या 1 टक्के एवढा वार्षिक निधी कैद्यांच्या ‘कल्याण निधी’ ला देण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *