सोलर झटका मशीन संपूर्ण माहिती solar fencing jhatka machine installation zatka machine

सोलर झटका मशीन संपूर्ण माहिती solar fencing jhatka machine installation zatka machine

आज जाणून घेवूयात सोलर झटका मशीन संदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये.

नैसर्गिक नैसर्गिक संकटामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे नुकसान तर होतेच परंतु  कुत्रे,  कोल्हा, निळ गाय, रानडुक्कर, माकड, हरणाचे कळप इत्यादी जंगली प्राणी देखील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान करतात. शेतकरी बांधवांच्या हात तोंडाशी आलेला घास अगदी हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो.

या लेखाच्या सर्वात शेवटी झटका मशीनचा व्हिडीओ दिलेला आहे तो नक्की पहा.

जंगली प्राण्यांकडून होणारी हि नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवाना रात्रंदिवस शेतात पहारा देणे शक्य होत नाही. अशावेळी शेतकरी बांधवानी जर त्यांच्या शेतामध्ये सोलर झटका मशीन solar zatka machine लावले तर नक्कीच शेतातील पिकांचे होणारे नुकसान टाळता येते.

सोलर झटका मशीन solar zatka machine  कसे कार्य करते, शेतात या मशीनची उभारणी कशी करावी लागते या संदर्भात आपण अगदी सविस्तर माहिती या व्हिडीओमध्ये जाणून घेणारा आहोत त्यामुळे हा व्हिडीओ शेवटपर्यत पहा.

रूफटॉप सोलर योजना solar rooftop online application

काय आहेत सोलर झटका मशीन solar fencing system मुख्य वैशिष्ट्य

सोलर फेन्सिंग सिस्टीमचे महत्व खालीलप्रमाणे आहे.

शेतातील पिकांचे वन्यप्राण्याकडून होणारे नुकसान टाळता येते.

रात्रीअपरात्री शेतात जाण्याची गरज नाही.

सोलर झटका मशीन हे सौर उर्जेवर चालत असल्याने लाईटची आवश्यकता नाही.

सोलर झटका मशीनमध्ये solar zatka machine ऑटोमॅटिक सुविधा उपलब्ध असल्याने स्विच चालू बंद करण्याची गरज भासत नाही.

जशी गरज आहे तशा प्रकारे हे सोलर झटका मशीन वापरता येते. शेतकरी त्यांच्या आवश्यकतेनुसार दिवसा व रात्री झटका मशीन चालू ठेवू शकतात.

सौर पंपासाठी 15 कोटी निधी मंजूर आता लवकरच मिळणार सोलर पंप

सोलर झटका मशीन विविध मॉडेलमध्ये उपलब्ध

झटका मशीनमध्ये गरजेनुसार विद्युत प्रवाहाची तीव्रता कमी जास्त करता येते.

झटका मशीनमुळे जंगली प्राण्यांना फक्त झटका बसतो त्यामुळे जनावरे दगावत नाही.

शेतकऱ्यांच्या क्षेत्र व आवश्यकतेनुसार सोलर फॅन्सी गार्ड म्हणजेच झटका मशीन zatka mashin विविध मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत.

एखादे जनावर शेतामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असेल  तारेला स्पर्श होताच सायरन वाजण्यास सुरुवात होते यामुळे शेतकरी बांधवाना अलार्मच्या माध्यमातून सूचना मिळते.

झटका मशीन विविध मॉडेलमध्ये उपलब्ध आहेत. रिमोट झटका मशीन शेतकरी रिमोटच्या साह्याने 300 फुट अंतरावरून चालू किंवा बंद करू शकतात.

सोलर झटका मशीन व सौर कुंपणचे कार्य.

शेताच्या भोवती काटेरी किंवा साध्या तारांची सीमा करून सोलर झटका मशीनद्वारे त्या तार फेन्सिंग करण्याच्या प्रक्रियेला सोलर फेन्सिंग solar fencing असे म्हणतात.

solar zatka machine हे असे इलेक्ट्रिक मशीन आहे की यातून विद्युत प्रवाह कमी दाबाने सोडला जातो. यापासून कोणतीही जीवित हानी होत नाही मात्र या धक्क्यामुळे जंगली जनावर प्राणी शेताजवळ येत नाही आणि त्यांच्या मनामध्ये मानसिक भीतीचे वातावरण निर्माण होते.

सोलर झटका मशीन संदर्भातील महत्वाची माहिती

मुख्य रस्ता सोडून शेताच्या चारही बाजूला तारेचे कुंपण केले जाते. कुंपण करण्यासाठी पोल, किंवा प्लास्टिकच्या कड्याचा वापर केला जातो. या तारांमधून विद्युत प्रवाह सोडला जातो.

झटका मशीनद्वारे कुंपणामध्ये विद्युत प्रवाह सोडला जातो. कोणत्याही प्राण्याने स्पर्श केला तर त्याला जोरात झटका जाणवतो आणि तो विद्युत प्रवाह त्वरित खंडित होतो. या झटका मशीनला अनेक शेतकरी बांधव करंट मशीन किंवा इलेक्ट्रिक झटका मशीन देखील म्हणतात.

सोलार झटका मशीन 12 होल्ट बॅटरी किंवा सौरऊर्जेवर चालवले जाते.  शेतकरी बांधव रात्रीसुद्धा झटका मशीन सुरू ठेवू शकतात.

या झटका मशीनच्या सहाय्याने प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळता येते हे झटका मशीन लाईटवर बॅटरीवर तसेच सौरऊर्जेवर सुद्धा चालते.

कुंपणासाठी वापरली जाणारी वायर किंवा तार

शेतीच्या कंपाउंडसाठी वेगवेगळ्या तार वापरल्या जातात. काही शेतकरी बांधव तारेचा उपयोग करतात परंतु अशा प्रकारची हि तार पावसामुळे लगेच खराब होते.

काही शेतकरी जीआय GI wire तार वापरतात हा तार थोडा काळ टिकतो.

परंतु शेतकरी बांधवानी एक्सलेटर वायर जो कि मोटरसायकलमध्ये वापरला जातो अशा पद्धतीची तार वापरल्यास चांगला फायदा होतो.

पाऊस जरी आला किंवा एखाद्या प्राण्याने जोरात कुंपणाला धडक जरी दिली तरी एक्सलेटर सहजासहजी खराब होत नाही. या तारेने शेतकरी आपल्या शेताभोवती उभे केलेल्या बांबूला एका फुटाच्या अंतराने चार लाईन लावतात.

चार तारांची वायर फेन्सिंग केली असे गृहीत धरल्यास वरील तीन तारा करंट व एका तारेत आर्थिक जोडली जाते. शक्यतो आर्थिक जमिनीमध्ये केल्यास जास्त फायदा होतो.

झटका मशीनचा सायरन अलार्म

झटका मशिनच्या आत किंवा बाहेर धोक्याची सूचना देणारे सायरन अलार्म बसविण्यात आले आहे. जेव्हा केव्हा शेतात आलेले जंगली जनावरांचा किवा व्यक्तीचा स्पर्श होतो तेव्हा या मशीनमधील हे सायरन वाजण्यास सुरुवात करते.

सायरन मशिनच्या आवाजामुळे शेताजवळ जंगली प्राणी किंवा व्यक्ती आल्याची सूचना शेतकऱ्यांस मिळते.

झटका मशीनसाठी प्लास्टिक इन्सुलेटरचे महत्व

अर्थिंग आणि करंट एकत्र होऊ नये यासाठी इन्सुलटर महत्वाचे काम करते. शेताच्या कंपाउंड गेटमध्ये करंट लागू नये म्हणून गेटच्या भोवताली सुद्धा इन्सुलटरचा वापर केला जातो.

इन्सुलटरमध्ये विविधप्रकारच्या साईज उपलब्ध आहेत.

किती असते झटका मशीनची किंमत

झटका मशीनमध्ये 12 volt बॅटरीचा वापर केला जातो या बॅटरीची वारंटी सर्वसाधारण एक वर्ष असते या बॅटरीची अंदाजे किंमत 1000 ते 1500 अशी असते.

मात्र गरजेनुसार शेतकरी बांधवानी जास्त होल्टेजची बॅटरी घेतल्यास त्याची किंमत देखील जास्त असते.

झटका मशीनची किंमत zatka machine price सर्वसाधारण तीन हजार पासून तर दहा हजार रुपयापर्यंत आहे. झटका मशीन हे शेतकऱ्यांसाठी वरदान असून अत्यंत कमी खर्चामध्येशेतकरी त्यांच्या शेतीचे करू शकतो.

सोलर झटका मशीन साठी शासनाकडून मिळते अनुदान

सौर कुंपण योजनेसाठी शासनाकडून अनुदान देखील मिळते. डॉ शामप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना अंतर्गत सौर उर्जा कुंपणासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत ७५ टक्के अनुदान मिळते. या संदर्भातील शासन निर्णय बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *