महाराष्ट्रामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे खूप मोठ्या प्रमाणत नुकसान झालेले आहे. राज्यात झालेल्या या अवकाळी पावसामुळे जवळपास १ लाख हेक्टर बाधित झालेले आहे.
ज्या शेतकरी बांधवांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा शेतकरी बांधवाना अतिवृष्टी नुकसानभरपाई म्हणून 3 हेक्टरपर्यंत मदत दिली जाणार आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवाना आता नुकसानभरपाई म्हणून आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
संबधित यंत्रणेने लवकरात लवकर त्यांचे पंचनामे सादर करण्याच्या सूचना देखील या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच हि मदत मिळण्याची शक्यता आहे.
कापूस, मका, तूर इत्यादी पिकांचे या पावसामुळे नुकसान झालेले आहे.
पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत
चालू वर्षी म्हणजेच 2023 मध्ये खरीप हंगामामध्ये पावसाच्या मोठ्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके वाया गेली होती. काही शेतकरी बांधवानी मोठ्या कष्टाने हि पिके जागविली आहे. हाती आलेला घास अवकाळी पावसामुळे पूर्णपणे हिरावला गेला असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पाळले आहे.
या संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना 3 हेक्टर पर्यंत मदत देण्यासाठी लवकरात लवकर नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याच्या सूचना संबधित यंत्रणेला या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत.
शेतीला पाणी नसल्याने आधीच डबघाईत निघालेली शेती असल्या अवकाळी पावसामुळे अजूनच संकटात गेल्याने अनेक शेतकरी हवालदिल झालेले आहेत.
पिकांचे नुकसान झाले असल्यास द्या पिक विमा कंपनीस सूचना
तुमच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असेल तर ७२ तासाच्या पिक विमा कंपनीस या संदर्भात माहिती कळविणे आवश्यक असते.
शेतातील नुकसानग्रस्त पिकांची सूचना पिक विमा कंपनीस कशी द्यावी या संदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करून माहितीचा व्हिडीओ देखील देण्यात आलेला आहे.
पावसामुळे कापसाचे नुकसान crop insurance app द्वारे मिळवा भरपाई 2023
अवकाळी पावसामुळे झालेल्या पिक नुकसान संदर्भात CMO Maharashtra या एक्स अकाऊंटवर या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. हि माहिती बघण्यासाठी येथे क्लिक करा.
लवकरच नुकसानग्रस्त पिकांचे पंचमाने करून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करण्याची हि प्रक्रिया युद्धपातळीवर सुरु करण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी ठरणार आहे.
नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३ हेक्टर पर्यंत पिक नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे मंत्री मंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे.
अनेक शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून अग्रिम रक्कम खात्यामध्ये जमा झालेली असली तरी बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विम्याची अग्रिम रक्कम अजून मिळालेली नाही. मात्र पुढील दोन ते तीन दिवसामध्ये हि रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार