शेळी पालन योजना कागदपत्रे अशी करा अपलोड sheli palan yojana

शेळी पालन योजना कागदपत्रे अशी करा अपलोड sheli palan yojana

शेळी पालन योजना कागदपत्रे अपलोड संदर्भातील माहिती.

शेळी पालन, कुक्कुटपालन किंवा दुधाळ गाई म्हशीं अनुदान मिळविण्यासाठी अनेकांनी अर्ज केले होते. ज्या शेतकरी लाभार्थ्यांची निवड या योजनेसाठी झाली आहे त्यांना नोंदणीकृत मोबाईलवर संदेश आलेले आहेत. ज्यांना असे संदेश आलेले आहेत त्यांनी लगेच कागदपत्रे अपलोड करून द्यावीत.

ज्या शेतकऱ्यांची योजनेसाठी निवड झालेली असते त्यांनाच कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होतो हि बाब या ठिकाणी लक्षात घ्यावी.

तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा असा पर्याय दिसत असेल तर समजून जा कि तुम्हाला शेळी पालन योजना, गाई म्हशी किंवा कुक्कुटपालन योजनेचा लाभ मिळणार आहे.

१० शेळ्या एक बोकड किंवा तुम्ही ज्याही योजनेसाठी अर्ज केला असेल त्या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे कशा पद्धतीने अपलोड करावी लागतात त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.

शेळी पालन योजना कागदपत्रे

शेळी पालन योजनेसाठी तुम्हाला संदेश आला असेल तर तो CP-JAIENP या नावाने आला आहे का याची खात्री करा. कारण योजनेसाठी आपली निवड झाली असून कागदपत्रे अपलोड करा असे संदेश पाठवून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिकृत संदेश तुम्हाला आला तर लगेच तुमचा युजर आयडी पासवर्ड टाकून लॉगीन करा या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे अपलोड करा असा संदेश दिसल्यास योजनेमध्ये तुमची निवड झाल्याची खात्री होईल.

वेबसाईट लिंक

लॉगीन करण्याची पद्धत

ब्राउजरच्या सर्च बारमध्ये https://ah.mahabms.com/ हा वेब ॲड्रेस टाका.

जशी हि वेबसाईट ओपन होईल त्यावेळी या ठिकाणी एक सूचना येईल ती सविस्तर वाचून घ्या आणि सूचना बंद करा.

नेव्हिगेशनबारवर कागदपत्रे अपलोड करा हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.

परत काही सूचना तुम्हाला दिसेल त्या सविस्तरपणे वाचून घ्या आणि बंद करा या बटनावर क्लिक करा.

तुमचा आधार कार्ड क्रमांक हा तुमचा युजर आयडी असणार आहे आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाईलचे शेवटचे सहा अंक तुमचा पासवर्ड असणार आहे.

आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.

लॉगीन केल्यावर या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचे नाव अर्ज क्रमांक इत्यादी माहिती दिसेल.

या ठिकाणी दोन पर्याय तुम्हाला दिसतील एक म्हणजे कागदपत्रे अपलोड करा आणि दुसरा पर्याय म्हणजे अर्जाची प्रिंट काढा.

कागदपत्रे अपलोड करा या पर्यायावर क्लिक करा.

शेळी पालन योजना यादी डाउनलोड करा तुमच्या मोबाईलवर

खालील कागदपत्रे अपलोड करा

  1. फोटो ओळखपत्र.
  2. सातबारा.
  3. ८ अ.
  4. अपत्याचा दाखला.
  5. आधार कार्ड.
  6. रहिवासी प्रमाणपत्र.
  7. बँक खाते फेसबुक.
  8. राशन कार्ड.
  9. सातबारामध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र किंवा भाडे पट्टा संदर्भातील करारनामा.
  10. अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील लाभार्थी असेल तर त्या संदर्भातील ओरिजिनल जात प्रमाणपत्र.
  11. अर्जदार जर दिव्यांग असेल तर त्या संदर्भातील सर्टिफिकेट.
  12. बचत गट सदस्य असल्यास त्या संदर्भातील प्रमाणपत्र किंवा बचतगटच्या बँक पासबुकची छायांकित प्रत.
  13. वय किंवा जन्मदाखला या संदर्भातील पुरावा.
  14. शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
  15. रोजगार किंवा स्वयं रोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डची सत्यप्रत.
  16. प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत.

ज्या कागदपात्रांच्या समोर लाल रंगाने चीन्हाकिंत केले आहे ते कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे. इतर कागदपत्रे अपलोड केले नाही तरी चालेल.

अशा पद्धतीने शेळी पालन योजना कागदपत्रे संदर्भातील सविस्तर माहिती या ठिकाणी आपण जाणून घेतलेली आहे. तुमची जर योजनेत निवड झाली असेल तर लगेच हि कागदपत्रे अपलोड करून द्या.

शेळी पालन योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?

शेळी पालन योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि तुमची निवड झाली असेल तर ओळखपत्र, सातबारा, ८ अ, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र सह इतर महत्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

शेळी पालन योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे कोठे सादर करावीत?

तुम्हाला जर शेळी पालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत अर्ज करणे गरजेचे आहे. ज्या पोर्टलवर अर्ज केला त्याच पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे अपलोड करावी लागतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *