captive market yojana राशन दुकान म्हटले कि आपल्याला गहू तांदूळ तेल डाळ इत्यादी वस्तू आठवतात किंवा या वस्तू स्वस्त धान्य दुकानातून मिळतात हेच आपण गृहीत धरून चालतो.
रेशन दुकानातून आता यापुढे स्वस्त धान्य तर मिळेलच परंतु या बरोबरीने महिलांना मोफत साडी देखील मिळणार आहे. हि योजना वस्त्रोद्योग विभागाची असून राशन दुकानातून याचे वितरण केले जाणार आहे.
या संदर्भात मी या आगोदर व्हिडीओ देखील बनविला होता परंतु योजना कधी राबविली जाणार या संदर्भात दारीखी निश्चित नव्हती.
आता मात्र 1 फेब्रुवारी २०२४ पासून या मोफत साड्या वाटपाचे काम जलद गतीने होणार असून या संदर्भात जिल्हाबद्द नियोजन करण्याच्या सूचना वस्त्रोद्योग मंत्र्यांनी संबधितांना दिलेल्या आहेत.
पुढील लेख पण पहा मोफत साडी योजना 2024 रेशनकार्डवर मिळणार साडी mofat sadi yojana
captive market yojana अंतर्गत 5 वर्षे मिळणार मोफत साड्या
एका कुटुंबातील एका महिलेस मोफत साडी मिळणार असून लवकरच हि योजना युद्ध पातळीवर राबविण्यात येणार आहे. ज्या महिलांना हि मोफत साडी दिली जाणार आहे त्या योजनेचे नाव कॅप्टिव्ह मार्केट योजना captive market yojana असे आहे.
तुमच्या गावातील राशन दुकानामध्ये राशन धन्याबरोबर हि साडी देखील वितरीत केली जाणार आहे.
मागील वर्षीच्या दिवाळी सणाच्या दरम्यान म्हणजेच दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी या योजनेचा जी आर काढण्यात आला होता. त्यामुळे साडी वाटप करण्याचे जिल्हाबद्ध नियोजन करण्याची सूचना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
ही जी कॅप्टिव्ह मार्केट योजना आहे ती 2023 ते 2028 या पाच वर्षांसाठी राबविली जाणार आहे. कुटुंबातील एका महिलेस वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली हि साडी देण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्यातील अंदाजे 24 लाख 80 हजार 360 कुटुबांना या योजनेचा लाभ होणार आहे.
असे आहे मोफत साडी योजनेचे स्वरूप
1 फेब्रुवारी 2024 पासून साडी वाटप सुरू होणार असून या संदर्भात नियोजन करण्याची सूचना वस्त्रउद्योग मंत्री यांनी संबधितांना दिलेल्या आहेत.
मोफत साडी योजनेचे स्वरूप कसे आहे ते समजावून घेवूयात.
प्रत्येक कुटुंबातील महिला सदस्यांना हि साडी मिळणार नाही तर ज्या कुटुंबाकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे त्याच कुटुंबातील महिला सदस्यांना या मोफत साडी योजनेचा लाभ मिळणार आहे.
355 रुपये किमतीची हि साडी असणार आहे.
प्रत्येक वर्षी एक मोफत साडी मिळणार असली तरी एका वर्षात केवळ एकदाच या मोफत साडी योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
शासनाची अधिकृत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
तर अशा पद्धतीने आता तुमच्या गावातील राशन दुकानामध्ये लवकरच स्वस्त धन्याबारोबारीने महिलांना मोफत साडी देखील मिळणार असल्याने ग्रामीण भागातील महिलांना याचा फायदा होणार आहे.
captive market yojana मोफत साडी योजनेचा जी आर पहा
मोफत साडी योजना संदर्भात शासनाचा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्द करण्यात आलेला आहे. त्या जीआरची लिंक या व्हिडीओच्या दिस्क्रीप्षण बॉक्समध्ये देखील देण्यात आली असून संपूर्ण जीआर तुम्ही वाचू शकता.
पुढील महिन्यातील फेब्रुवारी २०२४ पासून हि साडी वाटप सुरु होणार असल्याने ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
तुमच्याकडे जर अंत्योदय शिधापत्रिका असेल तर तुमच्यासाठी हि महत्वाची बाब आहे परंतु तुम्ही या योजनेसाठी पात्र नसाल तर कमीत कमी ज्या व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना हि माहिती नक्की कळवा.