Gotha bandhkam anudan 2024 गोठ्याचा प्रस्ताव अंदाजपत्रक GR सर्व pdf उपलब्ध

Gotha bandhkam anudan 2024 गोठ्याचा प्रस्ताव अंदाजपत्रक GR सर्व pdf उपलब्ध

Gotha bandhkam anudan 2024 : रोजगार हमी योजनेतून गोठा बांधकाम अनुदान मिळते. यासाठी एक प्रस्ताव सादर करावा लागतो.

हा गाय गोठा संपूर्ण प्रास्तव pdf मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोबत गोठा बांधकामाचे अंदाजपत्रक व शासन निर्णय GR देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जेणे करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येवू नये.

हि सर्व महत्वाची कागदपत्रे मोफत डाउनलोड करण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

या लेखामध्ये डाउनलोड बटन देण्यात आलेले आहे त्यावर क्लिक करताच सर्व कागदपत्रे तुमच्या मोबाईलमध्ये pdf मध्ये डाउनलोड होतील. तुमच्या सोईनुसार मग तुम्ही त्याची प्रिंट काढून संबधित विभागाकडे सादर करू शकता.

Gotha bandhkam anudan 2024 योजनेचा लाभ घ्या.

शेतकरी बांधवांकडे शेती करण्यासाठी गुरे असतात त्याचप्रमाणे शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय देखील करतात.

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होते त्यामुळे अनेक शेतकरी बांधव शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतात.

दुग्ध व्यवसाय करण्यासाठी मोठ्या किमतीच्या गाई किंवा म्हशी शेतकरी बांधव खरेदी करत असतात. परंतु यांना बांधण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे गोठा नसतो किंवा असलाच तर तो अगदी कुमकुवत असतो. गोठा नसल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

खालील माहिती पण वाचा

Sharad pawar gram samridhi yojana 2024 गाय गोठा अनुदान

चांगला गोठा नसल्याने गोठ्यामध्ये चिखल होतो, छत मजबूत नसेल तर पावसाळ्यामध्ये गोठ्यामध्ये पाणी साचून जनावरांना रोगबाधा होते. गोठ्यामध्ये चिखल झाला तर गाई किंवा म्हशींना स्तनदाह होतो.

यामुळे जनावरे दुध कमी देतात परिमाणी शेतकरी तोट्यात येतो. यासाठी शासनाकडून आता शेतकऱ्यांना गाय म्हैस इत्यादीसाठी गोठा बांधकामासाठी अनुदान दिले जाते.

कशी आहे Gotha bandhkam anudan योजना 2024

2021 या वर्षी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हि योजना सुरु करण्यात आली आहे ज्या योजनेचे नाव आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना Gotha bandhkam anudan.

शरद पवार ग्राम समृद्धी योजनेतून केवळ गाय व म्हशीसाठी गोठाच मिळत नाही तर कुक्कुटपालन शेड, शेळी पालन योजना अंतर्गत गोठा त्याचप्रमाणे नाडेप कंपोस्टिंगसाठी देखील अनुदान मिळते. कोणत्या योजनेसाठी किती अनुदान मिळते या संदर्भातील सविस्तर माहिती या अगोदरच डिजिटल डीजी युट्युब चॅनलवर देण्यात आलेली आहे.

आजच्या या लेखामध्ये केवळ गाई म्हशीसाठी गोठ्याचे बांधकाम अनुदान योजना संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत.

किती मिळते अनुदान

महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत Gotha bandhkam anudan हि योजना राबविली जाते. 3 फेब्रुवारी 2021 च्या शासन निर्णयानुसार गाई म्हैस गोठा बांधकाम करण्यासाठी 77,188 Gotha bandhkam anudan एवढे अनुदान दिले जाते.

६ गुरे या गोठ्यामध्ये राहतील अशा आकाराचा हा गोठा असेल. या गोठ्यासाठी २६.९५ चौरस मीटर जमीन लागेल.

६ गुरांसाठी 1 गोठा त्यानंतर अधिकच्या गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजेच १२ गुरांसाठी दुप्पट व १८ गुरांसाठी ३ पट अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत हा गोठा मिळणार आहे.

Sharad pawar gram samridhi yojana proposal 2024 and information

गोठा बांधकामासाठी लागणारी कागदपत्रे मोफत डाउनलोड करा.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे योजना संदर्भात तर माहिती मिळाली आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारा प्रस्ताव कोठे आणि कसा डाउनलोड करावा. Gotha bandhkam anudan 2024

खालील बटनावर क्लिक करून गाय गोठा बांधकाम प्रस्ताव डाउनलोड करा.

वरील बटनावर क्लिक करताच हा प्रस्ताव तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये pdf स्वरुपात डाउनलोड होईल. सदरील प्रस्तावाची प्रिंट काढून घ्या त्यामध्ये योग्य ती माहिती भरा आणि तुमच्या गावातील रोजगार सेवक किंवा ग्राम पंचायतकडे सादर करून द्या.

गोठ्याचे अंदाजपत्रक डाउनलोड करा.

गाय गोठा बांधकाम करण्यासाठी एक अंदाजपत्रक तयार केले जाते. अंदाजपत्रकानुसार MB rocording केली जाते. MB rocording म्हणजे जे काम पूर्ण झाले आहे त्या कामाची नोंद या मेजरमेंट बुकमध्ये केली जाते.

गोठ्याचे अंदाजपत्रकानुसार तुम्हाला किती आणि कसा खर्च लागणार आहे याचा अंदाज येईल. हे अंदाजपत्रक estimate डाउनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Gotha bandhkam anudan 2024  

शासन निर्णय डाउनलोड करा.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे गोठा बांधकाम अनुदान संदर्भातील शासन निर्णय GR तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. गाय गोठा बांधकाम करण्यासंदर्भात शासनाच्या कोणत्या सूचना आहे त्या तुम्हाला कळण्यास मदत होईल.

त्याचप्रमाणे कोणत्या योजनेसाठी किती निधी देण्यात आलेला आहे या संदर्भातील देखील सविस्तर माहिती तुम्हाला या शासन निर्णयामुळे कळू शकेल. गाय गोठा बांधकाम GR डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

गाय गोठा बांधकाम करण्यासठी किती अनुदान मिळते?

3 फेब्रुवारी 2021 रोजी काढण्यात आलेल्या जीआर नुसार गाय गोठा बांधकाम करण्यासाठी 77,188 इतके अनुदान दिले जाते.

गाय गोठा बांधकाम प्रस्ताव कोठे मिळेल?

या लेखामध्ये गाय गोठा बांधकाम संपूर्ण प्रास्तव, गोठ्याच्या बांधकामाचे अंदाजपत्रक व जीआर pdf मध्ये डाउनलोड करण्याची लिंक देण्यात आलेली आहे.

कोणत्या व्यक्ती आहेत पात्र?

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणताही शेतकरी पात्र आहे. गाय गोठा बांधकाम योजना संदर्भातील सविस्तर माहितीसाठी शासनाचा जी आर बघा. जी आरची लिंक या लेखामध्ये देण्यात आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *