Sharad pawar gram samridhi yojana 2024 गाय गोठा अनुदान

Sharad pawar gram samridhi yojana 2024 गाय गोठा अनुदान

शरद पवार ग्राम समृद्धी योजना (Sharad pawar gram samridhi yojana in marathi language ) अंतर्गत गुरांच्या गोठ्यांसाठी अनुदान मिळणार आहे. हे तर तुम्हाला माहितच असेल आणि त्या संदर्भात अनेकांनी आपापल्या ग्रामपंचायतकडे गोठ्यासाठी प्रस्ताव देखील दाखल केलेले आहेत.

गोठा बांधकाम अंदाजपत्रक Sharad pawar gram samridhi yojana Estimate.

मित्रांनो आज आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजना (Sharad pawar gram samridhi yojana in marathi language ) अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या गोठ्याच्या अंदाजपत्रका संदर्भात म्हणजेच इस्टीमेट संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत बांधण्यात येणारा गोठा कसा बांधला जाणार आहे. बांधकामासाठी करण्यात येणाऱ्या खोदकामासाठी अंदाजपत्रकातील शासकीय तर किती आहे. या आणि इतर बाबी संदर्भातील माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

शासकीय कामासाठी अंदाजपत्रक आवश्यक असते.

कोणतेही शासकीय काम असेल तर अगोदर त्यासाठी कामाचे अंदाजपत्रक म्हणजेच इस्टीमेट तयार करावे लागते. नंतर त्या इस्टीमेटला तांत्रिक आणि प्रशासकीय अशा दोन्ही मान्यता मिळवाव्या लागतात.

अर्थात एकदा तयार केलेले इस्टीमेट परत रीवाइज सुद्धा होऊ शकते. या इस्टीमेटमध्ये खोदकामापासून ते बांधकाम पूर्ण होईपर्यंत सर्व दर ठरविलेले असतात.

शासकीय बांधकामामध्ये अंदाजपत्रक आणि मेजरमेंट बुक ( Measurement Book ) खूप महत्वाचे असते.

उदाहरणार्थ सांगायचे झाल्यास गोठा बांधण्यासाठी खोदकाम करायचे असेल तर मउ मातीचा दर वेगळा असतो, मुरुमाचा दर वेगळा असतो आणि खोदकामात कठीण खडक लागला तर त्याचा देखील दर वेगळा असतो.

या आणि अशा प्रकारच्या अनेक बांधकाम आयटमससाठी वेगवेगळे दर असतात अर्थात जेवढे इस्टीमेट असेल तेवढेच काम होत नसते यामध्ये काम कमी झाल्यास MB म्हणजेच मेजरमेंट बुकमध्ये कमी कामाची नोंद घेतली जाते आणि त्यानुसार निधी मिळत असतो.

यामध्ये MB अर्थात मेजरमेंट बुक हा खूप महत्वाचा घटक असतो.

शरद पवार ग्राम समृद्धी योजना संदर्भातील अंदाजपत्रक डाउनलोड करा.

तुम्ही जर शरद पवार ग्राम समृद्धी योजना (Sharad pawar gram samridhi yojana in marathi language ) अंतर्गत जनावरांच्या गोठ्यासाठी ग्रामपंचायतकडे प्रस्ताव दाखल केला असेल आणि तुम्हाला या गोठ्याचे बांधकाम कसे होणार आहे हे जाणून घ्यायचे असेल तर हे गोठ्याचे अंदाजपत्रक म्हणजेच इस्टीमेट तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करून घ्या.

जनावरांच्या गोठ्याच्या बांधकामाचे अंदाजपत्रक कसे असते याची माहिती तुम्हाला मिळावी या हेतूने हे इस्टीमेट digitaldg.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जनावरांच्या गोठ्याचे अंदाजपत्रक डाउनलोड करण्यासाठी खालीललिंकवर क्लिक करा. gotha bandhkam anudan digital dg

जनावरांच्या-गोठ्याचे-अंदाजपत्रक.pdf (9638 downloads )

शरद पवार ग्राम समृद्धी योजना संपूर्ण प्रस्ताव उपलब्ध

सर्वांना शरद पवार ग्रामसमृद्धी योजना संदर्भात एव्हाना माहिती मिळालीच असेल परंतु जर तुम्हाला या योजनेविषयी माहिती नसेल किंवा या योजनेसाठी प्रस्ताव कोठे मिळेल हे जर तुम्हाला माहित नसेल तर digitaldg.in या वेबसाईटवर शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा प्रस्ताव उपलब्ध आहे.

या ठिकाणाहून तुम्ही तो प्रस्ताव डाउनलोड करू शकता आणि तुमचा प्रस्ताव तुमच्या ग्राम पंचायतकडे सादर करू शकता. शरद पवार योजनेचा प्रस्ताव डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

प्रस्ताव डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना gr बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://www.maharashtra.gov.in

शेतकरी संबधित इतर शासकीय योजना संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करून आमचे इतरही लेख वाचा जेणे करून तुम्हाला महाराष्ट्र शासनच्या विविध योजनांविषयी माहिती मिळू शकेल.

एक शेतकरी एक डीपी योजनासाठी अर्ज कसा करावा.

https://digitaldg.in/2020/11/02/marathi-mseb-arj-pdf/

2 thoughts on “Sharad pawar gram samridhi yojana 2024 गाय गोठा अनुदान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *