Job card online registration maharashtra

Job card online registration maharashtra

Job card online registration maharashtra

आज आपण या लेखामध्ये Job card online registration कसे करावे हे बघणार आहोत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत १८ वर्षावरील प्रौढ व्यक्तींना केंद्र शासनाची १०० दिवस प्रतिकुटुंब अकुशल रोजगाराची हमी दिली जाते.  १०० दिवसावरील प्रत्येक मजुराला रोजगाराची राज्य शासनाची हमी दिली जाते. तुम्हाला तुमच्या गावातच काम उपलब्ध करून दिले जाते किंवा गाव परिसराच्या ५ किमीच्या आत रोजगार उपलब्ध करून दिला जातो आणि नाही दिला तर तुम्हाला रोजगार भत्ता मिळू शकतो.

online job card registration

Online job card registration

रोजगार हमी योजना अंतर्गत तुम्ही जर अर्ज केला आणि तुम्हाला अर्ज केल्यानंतर १५ दिवसाच्या आत रोजगार नाही उपलब्ध झाला तर शासनातर्फे बेरोजगार भत्ता देखील मिळू शकतो. यासाठी तुमच्याकडे जॉबकार्ड असणे खूपच आवश्यक असते.  हे job card मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा लागतो त्या संदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. job card मिळाल्यानंतर ग्रामपंचायतकडे विहित नमुन्यात कामाची मागणी करावी लागते. कामाची मागणी करण्यासाठी अर्ज करावा लागतो. अर्जामध्ये संपूर्ण योग्य माहिती लिहून ती ग्रामसेवक यांच्याकडे सादर करावी लागते. चला तर हि job card online registration प्रक्रिया समजावून घ्या.

Aaple sarkar

रोजगार मागणीचा अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Job-card-online-registration.pdf (2435 downloads)

 

Online job card registration

जॉब कार्ड ऑनलाइन फॉर्म

job card online registration करण्यासाठी तुमच्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउजरच्या सर्चबार मध्ये https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हा कीवर्ड टाईप करा आणि इंटर करा. त्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर खालीलप्रमाणे इंटरफेस दिसेल तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा. तुमच्या डॅशबोर्डच्या डाव्या बाजूला विविध पर्याय या ठिकाणी दिसेल या ठिकाणी पेजला थोडे खाली स्क्रोल करा. त्यानंतर नियोजन विभाग असा पर्याय तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करा.

job card online registration for maharashtra state

निवडा या चौकटीवर क्लिक करताच या ठिकाणी तुम्हला रोहयो अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा आणि मनरेगा जॉब कार्ड (फक्त ग्रामीण भागासाठी) करा या लिंकवर क्लिक करून पुढे जा या बटनावर क्लिक करा. जसे हि तुम्ही या लिंकवर क्लिक कराल त्यावेळी तुम्ही https://egsmtk.mahaonline.gov.in/ या वेबसाईटवर रीडायरेक्ट व्हाल. या ठिकाणी तुम्हाला तीन पर्याय दिसेल त्यापैकी मनरेगा जॉब कार्ड (फक्त ग्रामीण भागासाठी) असा पर्याय दिसेल, जसे हि तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळी जॉब कार्ड साठी लागणारा ऑनलाइन अर्ज तुमच्या स्क्रीनवर दिसेल. आता या अर्जामध्ये जी माहिती विचारलेली आहे ती सर्व माहिती तुम्हाला अचूकपणे भरावी लागणार आहे.

nrega job card

संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या अर्जाचे तपशील या ठिकाणी तुम्हला दिसेल जसे कि Application Number, Application Date, Applicant Name, Service Name, Documents, Payments. Application Status आणि Appeal इत्यादी प्रकारची माहिती दिसेल.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी खलील लिंकवर क्लिक करा.

नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेळीपालन योजनेसाठी लागणारा अर्ज मोफत डाउनलोड करा.

https://digitaldg.in/2021/02/26/नाविन्यपूर्ण-योजना/ ‎

शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत जनावरांसाठी गोठा संपूर्ण प्रस्ताव.

https://digitaldg.in/2021/02/09/sharad-pawar-gram-samridhi-yojana/

शेतकरी अनुदान योजना माहिती

https://digitaldg.in/2020/12/27/shetkari-anudan-yojana/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *