Inwell boring scheme online application 2024 इनवेल बोअरिंगसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

Inwell boring scheme online application 2024 इनवेल बोअरिंगसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

Inwell boring scheme online application 2024 : जाणून घेवूयात इनवेल बोअरिंग संदर्भातील सविस्तर माहिती. तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये इनवेल बोअर घ्यायचा असेल तर त्यासाठी आता शासनाकडून अनुदान दिले जाते.

या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला व्हिडीओ पहा जेणे करून तुम्हाला देखील तुमचा अर्ज करता येईल.

हे अनुदान किती असते त्यासाठी पात्र व्यक्ती कोणत्या आहेत आणि अर्ज कोठे करावा या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे आहे जेणे करून तुम्हाला Inwell boring scheme online application विषयी सविस्तर माहिती मिळू शकेल.

अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये विहीर खोदतात. परंतु जर विहिरीला पाणी लागले नाही तर शेतकरी बांधवांचा खर्च वाया जाण्याची शक्यता असते.

विहिर खोदकाम करतांना पाणी जरी लागले नसेल तरी देखील विहिरीमध्ये आडवे बोअर घेतले तर अशावेळी विहिरीस पाणी लागण्याची शक्यता असते.

जुनी विहीर दुरुस्ती योजना अंतर्गत शेतकरी आता इनवेल बोअरिंग inwell boring घेवू शकतात. यासाठी शासनाकडून अनुदान देखील मिळते. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. Inwell boring scheme online application.

विहीर अनुदान योजना 2023 असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईलवरून vihir anudan yojana

Inwell boring scheme online application इनवेल बोअरिंग योजनेसाठी पात्रता

इनवेल बोअरिंग योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे.

अर्जासोबत जातीचा दाखला जोडणे गरजेचे आहे.

शेती असल्याबाबतचा सातबारा व ८ अ चा उतारा सादर करणे बंधनकारक आहे.

अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 1.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

पहा किती मिळते अनुदान खालील pdf डाउनलोड करा.

सक्षम अधिकारी यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक.

अर्जदाराकडे कमीत कमी २० गुंठे ते जास्तीत जास्त ६ हेक्टर जमीन असणे गरजेचे आहे.

या योजनेचा लाभ फक्त अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांनाच मिळतो. सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्ती या योजनेचा लाभ घेवू शकत नाही. या योजनेचा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी या वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो.

हा ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात देखील आपण या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

बांधकाम कामगार पावती अशी करा pdf डाउनलोड Bandhkam kamgar cash receipt download process

Inwell boring scheme online application लागणारी कागदपत्रे

सक्षम अधिकारी साहेबांद्वारे दिलेले जातीचे प्रमाणपत्र.

७ बारा व ८ अ चा उतारा.

उत्पनाचे प्रमाणपत्र.

ग्रामसभेचा ठराव.

जमीन धारणा क्षेत्राबाबतचा तलाठी साहेबांकडील दाखला.

विहीर असल्याबाबत प्रमाणपत्र विहिरीची चतु:सीमा.

100 किंवा 500 रुपयांच्या बॉंड पेपरवर लाभार्थीचे बंधपत्र.

कृषी अधिकारी साहेबांनी केलेली क्षेत्र पाहणी व शिफारसपत्र.

गटविकास अधिकारी यांचे लाभार्थीसाठी शिफारसपत्र.

ज्या विहिरीवर इनवेल बोअर घेणे आहे त्या विहिरीचे कामाचे आधीचे फोटो.

अर्जदार अपंग असेल तर त्या संदर्भातील प्रमाणपत्र.

भूजल सर्वेक्षण विभागाचा feasibility report.

इत्यादी कागदपत्रे इनवेल बोअरिंग योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत. आता जाणून घेवूयात अर्ज कसा आणि कोठे करावा या संदर्भातील सविस्तर माहिती Inwell boring scheme online application 2024.

असा करा online अर्ज

योजनेचा लाभ घेण्यासाठी mahadbt या वेबसाईटवर Inwell boring scheme online application ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज कसा करावा लागतो या संदर्भात या लेखाच्या सर्वात शेवटी व्हिडीओ दिलेला आहे तो देखील नक्की पहा.

  • गुगलसर्च मध्ये Mahadbt farmer login हा शब्द टाका आणि सर्च करा.
  • तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
  • लॉगीन केल्यावर तुमच्या डॅशबोर्डवर अर्ज करा अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.
  • या ठिकाणी तुम्हाला विविध पर्याय दिसतील त्यापैकी अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना या पर्यायासमोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यायावर टच करा.
  • एक सूचना तुम्हाला दिसेल ती वाचून घ्या.
  • या ठिकाणी तालुका, गाव, शेतीचा गट नंबर, मुख्य घटक, इत्यादी माहिती अगोरच दिसेल. बाब या पर्यायाखाली इनवेल बोरिंग असा पर्याय निवडा.
  • तिसरे अपत्य नसल्याचा पर्याय निवडा आणि जतन करा या पर्यायावर क्लिक करताच तुमचा अर्ज सेव्ह होईल.

अर्ज सादर करण्यासाठी लागेल २३ रुपये शुल्क

महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांकडून २३ रुपये एवढे शुल्क शासन आकारत आहे. फोन पे किंवा गुगल पे किंवा पेमेंट करण्याच्या ज्या सुविधा या पोर्टलवर उपलब्ध आहेत त्यांचा उपयोग करून तुम्ही हा अर्ज सादर करू शकता.

अर्ज जतन केल्यावर अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

एक सूचना येईल ती वाचून घ्या.

पहा या बटनावर क्लिक करा.

योजनेचा प्राधान्य क्रमांक निवडा.

अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा.

जसेही तुम्ही अर्ज सादर करा या बटनावर क्लिक कराल त्यावेळी तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनवर make payment अशी एक सूचना येईल. यामध्ये अर्ज सादर करण्यासाठी किती शुल्क आकारले जाणारे आहे याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.

payment process

make payment या बटनावर क्लिक करा.

Wallet, Net banking, credit / debit card, IMPS असे पेमेंट करण्याचे विविध पर्याय तुम्हाला दिसतील त्यापैकी एक पर्याय वापरून पेमेंट करा. payment details वाचून घ्या आणि proceed for payment या पर्यायावर क्लिक करा.

या ठिकाणी QR कोड वापरून सुद्धा पेमेंट करता येते.

पेमेंट पूर्ण होईपर्यंत पेजला refresh करू नका.

पेमेंट यशस्वी झाल्यावर पेमेंट पावती प्रिंट करून घ्या किंवा pdf मध्ये सेव्ह करून घ्या.

अर्जाची पावती डाउनलोड करण्यासाठी मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.

छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा.

पोहोच पावती या पर्यायावर क्लिक करताच तुम्हाला तुम्ही अर्ज केलेल्या अर्जाची पावती दिसेल ती प्रिंट करून घ्या किंवा pdf मध्ये सेव्ह करून घ्या.

महाडीबीटी वेबसाईट लिंक

अशा पद्धतीने

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *