मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत शासनाकडून मिळेल 3000 रुपये Mukhyamantri vayoshri yojana 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत शासनाकडून मिळेल 3000 रुपये Mukhyamantri vayoshri yojana 2024

दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले त्यापैकी एक महत्वाचा मंत्रीमंडळ निर्णय म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना Mukhyamantri vayoshri yojana 2024 होय.

अशाच प्रकारची केंद्र शासनाची राष्ट्रीय वायोश्री योजना आहे परंतु ती ठराविक जिल्ह्यांमध्ये राबविली जाते. मात्र मुख्यमंत्री वयोश्री योजना mukhyamantri wayoshri yojana महराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबविली जाणार आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अर्ज कसा करावा लागतो त्यासाठी खालील व्हिडीओ पहा

जाणून घेवूयात कशी आहे हि मुख्यमंत्री वयोश्री योजना mukhyamantri vayoshri yojana

जांचे वय ६५ वर्षापेक्षा जास्त आहे आणि वार्षिक उत्पन्न २ लाख रुपये आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासन वयोश्री योजना राबविणार आहे.

पुढील योजना पण पहा संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना 2024 pdf अर्ज डाउनलोड करा.

ग्रामीण शहरी दोन्ही भागात राबविली जाणार मुख्यमंत्री वयोश्री योजना

ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात हि वयोश्री योजना राबविली जाणार असून ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागासाठी आयुक्त यांच्या मार्फत योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

ज्या 65 वर्षावरील नागरिकांचे 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे त्यांना या वयोश्री योजनेचा मिळणार आहे.

जसजसे वय होते तसतसे त्या व्यक्तीस विविध व्याधी जडतात. अपंगत्व येणे, शरीरामध्ये अशक्तपणा निर्माण होणे अशा जर व्याधी जेष्ठ नागरिकांना लागल्यास तर यांचे निराकारण करण्यासाठी पैसा नसतो.

हि आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी तसे ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण सुद्धा या योजनेतून देण्यात येणार आहे.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जेष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण केले जाणार

जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहेत अशा नागरिकांचे शासनाच्या वतीने सर्वेक्षण व स्क्रिनींग करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थ्यांची तपासणी सुद्धा करण्यात येईल.

हि सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर जे नागरिक या योजनेसाठी पात्र असतील अशा पात्र जेष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

तुमचे नातवाईक किंवा घरातील कोणी पात्र व्यक्ती असेल तर त्यांना या योजनेचा लाभ जरूर मिळवून द्या.

अधिकृत माहितीची लिंक

मुख्यमंत्री वायोश्री योजना अंतर्गत किती लाभ मिळणार?

पात्र लाभार्थ्यांना या योजना अंतर्गत ३ हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

वयोश्री योजनेची पात्रता काय आहे?

ज्या व्यक्तींचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2 रुपये असेल अशा व्यक्तींना मुख्यमंत्री योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *