नोकरी सोडून तरुणाने सुरु केला रसवंती व्यवसाय सुरु

नोकरी सोडून तरुणाने सुरु केला रसवंती व्यवसाय सुरु

जाणून घेवूयात रसवंती व्यवसाय संदर्भातील माहिती rasvanti vyavsay.

बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेले आहे. शिक्षण घेवून सुद्धा चांगली नोकरी मिळत नसल्याने अनेक तरुण शहराची वाट धरत आहेत. शहरात जावून देखील नोकरी न मिळाल्याने अनेक तरुणांच्या मनामध्ये निराशेची भावना तयार होते.

तुम्ही जर ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुण असाल तर आपल्याच गावामध्ये किंवा गाव परिसरामध्ये छोटा मोठा उद्योग व्यवसाय करून रोजगार निर्मिती करता येते.

whatsapp Group लिंक

आज आपण अशा तरुणाला भेटणार आहोत ज्यांनी शहरातील नोकरी सोडून गावाकडे आपला रसवंतीचा व्यवसाय सुरु करून तो यशस्वी केला आहे.

कोणताही व्यवसाय असो ग्राहकाला चांगली गुणवत्ता दिली तर तुम्हाला ग्राहक शोधावा लागत नाही तो आपोआप तुमचे दुकान शोधत येतो. त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये इतरांपेक्षा काही विशेष असेल तर नक्कीच ग्राहक तुमच्याकडे आकर्षित होईल.

झेंडू शेती लाख मोलाची १५ गुंठ्यात दिड लाख उत्पन्न zendu sheti mahiti in marathi

रसवंती व्यवसाय उभारून उमेश कासोद या तरुणाने बेरोजगारीवर केली मात

उदाहरणच द्यायचे झाले तर उमेश कासोद या तरुणाने आपल्या रसवंती व्यवसायामध्ये विविधता आणण्यासाठी काय करता येईल यावर खूपच बारीक लक्ष दिले आहे.

जालना जिल्ह्यातील माहोरा ते जाफराबाद या रोडवर त्यांचा रसवंतीचा व्यवसाय आहे. माहोरा शहरापासून अंदाजे २ किलोमीटर अंतरावर त्यांचा रसवंतीचा व्यवसाय आहे. या उन्हाळ्यामध्ये कधी आपण या रस्त्ये गेलात तर नक्कीच त्यांच्या रसवंतीला भेट द्या.

ग्राहकांना उसाचा थंडगार रस अपेक्षित असतो यासाठी त्यामध्ये बर्फ टाकावा लागतो. उसाच्या रसात बर्फ घालून पिल्यास सर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अनेकजण विना बर्फाचा रस घेण्यास पसंदी दर्शवितात.

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

याच बाबीचे महत्व लक्षात घेवून उमेश कासोद यांनी उसामध्ये बर्फ टाकण्याऐवजी उसाचे तुकडेच फ्रीजमध्ये ठेवण्यास मदत केली आहे जेणे करून ग्राहकांना थंडगार उसाचा रस मिळेल.

रसवंती व्यवसायातून बेरोजगारीवर करता येते मात

प्रत्येक व्यक्तीलाच नोकरी मिळणे शक्य नसल्याने बेरोजगार तरुणांनी व्यावसायिक दृष्टीकोनातून विचार केल्यास नक्कीच रोजगार निर्मिती होऊ शकते.

लवकरच उन्हाळा सुरु होत असून रसवंती व्यवसाय यामुळे महत्व प्राप्त होणार आहे. उन्हाळ्यामध्ये अनेकजण शीतपेय पीत असत परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल मिसळले असल्याने अनेकजन अशा शीतपेयांपासून दूर राहत आहेत.

अशावेळी पर्याय म्हणून अनेकजण रसवंतीमध्ये तयार केलेला ताज्या उसाचा रस पिणे पसंद करतात. तुम्ही जर तुमच्या गावामध्ये, गाव परिसरामध्ये किंवा मुख्य रस्त्याच्या बाजूला रसवंतीचा व्यवसाय सुरु केला तर नक्कीच तो यशस्वी होऊन तुम्हाला रोजगार मिळवून देवू शकतो.

पेरू फळबाग शेती मधून लाखो रुपयांचे उत्पन्न काढणारा शेतकरी

ट्रेंड ओळखून व्यवसाय केल्यास यश मिळण्याची जास्त शक्यता

काही व्यवसाय हे बारमाही चालणारे व्यवसाय असतात अर्थात या व्यवसायामध्ये स्पर्धादेखील खूप मोठी असते. परंतु जो ऋतू चालू आहे त्या ऋतूप्रमाणे व्यवसायाची निवड केली तर नक्कीच तो व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते.

आता लवकरच उन्हाळा सुरु होणार असल्याने तुम्ही देखील रसवंतीचा व्यवसाय सुरु करू शकता. रसवंती व्यवसाय संदर्भात अधिक माहितीसती तुम्ही उमेश कासोद यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांचा संपर्क नंबर 9545125073

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *