शेतात जाण्यासाठी बैलगाडी रस्ता हवा आहे का मग हि माहिती संपूर्ण वाचा.
तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसेल आणि बैलगाडी जाईल एवढा रस्ता हवा असेल तर तुम्ही त्यासाठी तहसील कार्यालयामध्ये अर्ज दाखल करू शकता.
शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता खूपच महत्वाचा असतो. तुमच्या शेतामध्ये रस्ता नसेल तर योग्यवेळी शेतातील माल बाजारात नेता येत नसल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होते.
शेतातील रस्ता संदर्भात शेतकऱ्यांमध्ये आपापसात खूप वाद विवाद होत असतात. हे वाद कधी कधी तर खूप विकोपाला जातात. अशावेळी वाद न घालता तुम्हाल तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता हवा असेल तर योग्य त्या मार्गाने तुम्ही तो मिळवू शकता.
शेत तेथे मत्स्यतळे योजना shet tethe matsytale नवीन योजना राबविली जाणार
शेतात जाण्यासाठी बैलगाडी रस्ता काय सांगतो नियम
एखाद्या शेतकऱ्यास त्याच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसेल तर असा शेतकरी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये नवीन रस्ता मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज सादर करू शकतात.
शेतकऱ्याने रस्त्याची मागणी केल्यानंतर शेतात एखादा पर्यायी रस्ता उपलब्ध होऊ शकेल काय याचा अगोदर विचार केला जातो आणि नसेल तर नंबरबांधाने नवीन रस्ता उपलब्ध करून देण्याचा अधिकार तहसीलदार यांना देण्यात आला आहे.
तुम्हाला जर शेत रस्ता हवा असेल तर अगोदर रीतसर मागणी करावी लागते. शेत रस्ता मागणी अर्ज pdf मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. हा अर्ज खास शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
अर्ज डाउनलोड करण्यासाठी आणि शेत रस्ता मागणी संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बटनावर क्लिक करा किंवा टच करा.
शेत रस्ता मागणी अर्ज डाउनलोड करून तो प्रिंट करून घ्या त्यामध्ये योग्य ती माहिती भरून तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालयात सादर करून द्या.
शेतरस्ता मागणी अर्जासोबत जे कागदपत्रे
ज्या शेतातून रस्ता हवा आहे त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील शेतकऱ्यांचे रस्त्याच्या बाबतीत ना हरकत प्रमाणपत्र.
अर्जदाराची ज्या ठिकाणी शेतजमीन आहे त्या जमिनीच्या लगतच्या शेतजमीनच्या बांधावरून रस्ता जाणार आहे त्या शेत जमिनीचा कच्चा नकाशा सादर करवा.
अर्जदाराचा जमिनीचा सातबारा अर्जासोबत जोडावा जो कि तीन महिन्यापेक्षा जुना नसावा.
अर्जदाराच्या शेतजमीनीलगतच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील इत्यादी.
जो अर्जदार आहे त्याच्या जमिनीचा जर कोर्टात केस चालू असेल तर त्या संदर्भातील तपशील सुद्धा जोडावे.
अर्जदाराच्या जमिनीचा शासकीय नकाशा.
इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.
अशा पद्धतीने तुम्हाला शेतात जाण्यासाठी बैलगाडी रस्ता मिळू शकतो.