Rasta magni arj 2024 शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा

Rasta magni arj 2024 शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा

Rasta magni arj व शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम. शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम तुमच्या शेतात जाण्यासाठी पूर्वीपासूनच नकाशावर उपलब्ध असलेला रस्ता कुणी अडविला असेल तर मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६ कलम ५ नुसार तहसीलदार यांना Rasta magni arj करून उपलब्ध रस्त्यातील अडथळा दूर करता येतो.

तहसीलदार यांच्याकडे याविषयी दाद मागता येते. परंतु तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नसेल तर अशा वेळी नवीन रस्त्यासाठी महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये तहसीलदारांकडे नवीन रस्त्यांची मागणी करता येते.

WhatsApp Group
WhatsApp Group

दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन वेगवेगळ्या नियमानुसार मागणी करता येते. या व्यतिरिक्त कलम 143 काय आहे, अगोदरच उपलब्ध असलेला रस्ता अडविणे, रस्त्यावरून शेतात जाऊ न देणे याविषयी कायदेशीर मार्ग कसा काढावा म्हणजेच शेतीच्या रस्त्या विषयी माहिती आपण जाणून घेणार आहोत.

Rasta magni arj संबधी संपूर्ण व्हिडीओ माहितीसाठी खालील व्हिडीओ बघा किंवा येथे क्लिक करा

शेतीच्या रस्त्या विषयी माहिती

१ पूर्वीपासूनच रस्ता उपलब्ध आहे मात्र तो अडविला आहे.

२)  शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता पाहिजे आहे.

तर या दोन पर्यायांपैकी आज आपण शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता कसा मिळवावा या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी अर्ज कसा करावा लागतो किंबहुना तो ओरिजिनल रस्ता मागणी अर्ज pdf स्वरुपात तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे, त्यामुळे हि प्रक्रिया लवकर समजण्यास तुम्हाला मदत होईल.

शेत रस्ता कायदा  Shet rasta kayda

मित्रांनो पूर्वी शेतजमिनी जास्त होत्या आणि त्या प्रमाणात शेती करणाऱ्यांची संख्या कमी होती. वहीती जमीन कमी व पडीत क्षेत्र जास्त असल्यमुळे शेतामध्ये जाण्यायेण्यासाठी रस्त्यांची फारशी अडचण निर्माण होत नव्हती.

सध्या मात्र चित्र एकदम उलटे दिसत आहे, लोकसंख्या वाढीमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणत वाढली आहे आणि आपसूकच बेरोजगारी आणि वाढणारी लोकसंख्या यामुळे शेती करणाऱ्यांची संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

शिवाय आधुनिक तंत्रज्ञानामुळे थोडी जरी जमीन असली तरी त्यामध्ये भरपूर प्रमाणात उत्पदान शेतकरी काढत आहेत. परंतु शेतात जास्त उत्पादन घ्यावयाचे असेल तर त्यासाठी आधुनिक शेतीची मशागत वेळोवेळी करावी लागते.

शेत रस्ता मागणी अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर टच करा.

शेत रस्ता मागणी अर्ज

शेतमाल बाजारात नेण्यासाठी रस्ता आवश्यक त्यासाठी Rasta magni arj करणे गरजेचे

आणि ह्या सर्व बाबींसाठी शेतात जाणारा रस्ता असणे खूपच महत्वाचा आहे. तुमच्या शेतात मशागतीसाठी ट्रॅक्टर नेणे असो किंवा शेतातील उत्पादित माल बाजारात नेणे असे हि सर्व प्रक्रिया करण्यासाठी मुख्य रस्त्यापासून ते तुमच्या शेतापर्यंत रस्ता असणे खूपच आवश्यक आहे.

परंतु जर तुमच्या आजूबाजूंच्या शेतकऱ्यांनी तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ताच नाही दिला तर मग? मग आपल्या शेतात बियाणे, खते कशी न्यावीत? बैलगाडीणे किंवा ट्रॅक्टरने शेतातील उत्पादित माल बाजारात कसा न्यावा? अशी प्रश्ने तुम्हाला पडलीच असतील.

मित्रांनो तुमच्या शेतात जाण्यासाठी तुम्हाला रस्ता पाहिजे असेल आणि तुमची Rasta magni arj करण्याची तयारी असेल तर महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये तहसीलदारांकडे नवीन रस्त्यांची मागणी करता येते.

तुमचा आधीचा उपलब्ध रस्ता कोणी अडविला असेल तर मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६ कलम ५ नुसार तहसीलदार यांना रस्त्यासास्ठी अर्ज करून दाद मागता येते.

यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागतो तो अर्ज कसा असतो ते आपण बघुयात. उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्या महसुली कामकाज पुस्तिकेमध्ये नवीन रस्ता मागणीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असते अर्जाचा नमुना कसा असतो याविषयी सविस्तरपणे माहिती दिलेली आहे.

खालील लिंकवर क्लिक करून शेतामध्ये जाण्यासाठी करावयाचा शेतरस्ता अर्ज डाऊनलोड करून घ्या. ह्या अर्जाची तुम्ही प्रिंट काढू शकता. प्रिंट काढून त्यावर अर्जास प्रोसेस फी म्हणून योग्य त्या किमतीचा कोर्ट फी स्टँप लावावा.

Rasta magni arj pdf

शेतामध्ये जाण्यासाठी नवीन रस्ता मागणीसाठी लागणारा अर्जाचा नमुना मोफत डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

रस्ता-मागणी-अर्ज-pdf.pdf (20148 downloads )

Rasta magni arj

नवीन शेतरस्ता मिळणेसाठी अर्ज सादर केल्यानंतर पुढे काय ?

  • अर्ज दाखल केल्यानंतर संबधित तालुक्याच्या तहसीलदार साहेबांकडून ज्या व्यक्तीने अर्ज केला आहे त्या व्यक्तीस व ज्या शेतकऱ्यांच्या भूमापन क्रमांकाच्या सिमांवरून रस्त्याची मागणी केली आहे त्या सर्वांना नोटीस देण्यात येते आणि त्यांना यासंदर्भात त्यांचे म्हणणे किंवा मत मांडण्याची संधी देण्यात येते.
  • अर्जदाराने अर्ज करतांना सोबत कच्चा नकाशा जोडलेला असतो यावरून कमीत कमी किती फुटांचा रस्ता देणे गरजेचे आहे याची शहानिशा म्हणजेच खात्री केली जाते.
  • संबधित तालुक्याच्या तहसीलदार साहेबांकडून स्थळ पाहणी केली जाते स्थळ पाहणी केल्यानंतर खरोखरच अर्जदाराला शेतात जाण्यासाठी रस्त्याची आवश्यकता आहे काय याची खात्री केली जाते.
  • ज्या व्यक्तीने शेतरात्यासाठी अर्ज केला आहे त्या व्यक्तीच्या जमिनीची पूर्वीचे मालक कोणत्या रस्त्याचा वापर करत होते याविषयी चौकशी केली जाते.

अर्जदारास शेतरस्ता द्यावयाचा झाल्यास सर्वात जवळचा मार्ग कोणता यावर विचार केला जातो.

  • अर्जदाराला शेतात जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे काय याविषयी चौकशी केली जाते.
  • अर्जदारांनी मागणी केलेला अर्ज हा सरबांधावरून आहे काय याची खात्री करण्यात येते.
  • जर अर्जदाराला शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता दिला गेला तर लगतच्या शेतकऱ्यांचे शेतीचे किती नुकसान होऊ शकते याची पाहणी करण्यात येते.
  • अर्जदारास नवीन रस्ता देणे गरजेचे आहे याची खात्री झाल्यानंतर सदरील रस्ता हा लगतच्या शेतीच्या हद्दी/बांधावरून देण्यात येतो आणि आशा वेळी लगतच्या शेतकऱ्यांचे कमीत कमी नुकसान होईल असे पहिले जाते.
  • वरील सर्व बाबींची शहानिशा करून तहसीलदार नवीन शेतरस्ता देण्यासंबधी आदेश अर्ज मान्य करू शकतात किंवा नवीन शेत रस्त्याची मागणी फेटाळू शकतात.

इतर कमी किंवा अधिक चौकशी तहसीलदार करू शकतात.

Rasta magni arj या लेखाचा सारांश काय आहे

तुमच्या शेतात जाण्यासाठी अगोदरच उपलब्ध असलेला रस्ता कोणी अडविला असेल तर मामलेदार कोर्ट ॲक्ट १९०६ कलम ५ नुसार तहसीलदार यांना अर्ज करता येतो.

एखाद्या शेतकऱ्यास शेतात जाण्यासाठी रस्ताच नसेल तर महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये तहसीलदारांकडे नवीन रस्त्यांची मागणी करता येते. नवीन रस्त्यांची मागणी करण्यासाठी pdf अर्ज मोफत डाउनलोड कसा करावा हि माहिती या लेखात सांगितलेली आहे.

नवीन रस्ता मागणीसाठी केलेल्या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतात अर्ज सादर केल्यानंतर कोणती प्रक्रिया असते हि सर्व माहिती या लेखात देलेली आहे.

आमचे इतरही लेख आवर्जून वाचा

रोप वाटिकासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

https://digitaldg.in/2020/10/23/mahadbt-krushi-yojana/

मित्रांनो अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरु असलेल्या शासकीय योजनांची माहिती नसते, शेतीविषयक विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आमचे युट्युब चॅनलवरील माहितीचे व्हिडीओज बघा. डायरेक्ट आमच्या चॅनलवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

One thought on “Rasta magni arj 2024 शेत रस्ता कायदा व रस्त्याचे नियम अर्ज pdf मध्ये डाउनलोड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *