Bhu Naksha महाराष्ट्र ऑनलाइन भू नक्शा बघा मोबाईलवर

Bhu Naksha महाराष्ट्र ऑनलाइन भू नक्शा बघा मोबाईलवर

Bhu Naksha महाराष्ट्र याविषयी आजच्या या लेखामध्ये माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रामधील ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तो जिल्हा तालुका आणि गाव निवडून तुम्ही ऑनलाइन भू नक्शा बघू शकता.

उदाहरणार्थ मी जालना जल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील रहिवासी आहे त्यामुळे मी गुगलमध्ये bhu nakasha किंवा bhu naksha maharashtra jalna असे जरी टाकले तरी शासकीय भू नकाशा वेबसाईटवर अगदी सोप्या पद्धतीने जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी शेती नकाशा बघू शकतो.

शासकीय भू नकाशा वेबसाइटवर जावून आपल्या शेताचा नकाशा कसा बघावा हे पुढे आपण बघणारच आहोत.

भू नकाशा काय आहे What is Bhu Naksha

मित्रांनो देशाला, राज्याला किंवा जिल्ह्याला एक सीमा असते ज्याला आपण बोर्डर म्हणतो किंवा मराठी मध्ये हद्द म्हणतो.

आपली हद्द कुठून ते कुठपर्यंत याचा एक नकाशा असतो अशीच सीमा आपल्या शेतालाही असते आणि त्याचा नकाशा तुमच्या तालुक्यातील भूमी अभिलेख या कार्यालयात तुम्हाला मिळू शकतो. शेत जमिनीसंदर्भातील बरेचसे कागदपत्रे हि ऑनलाइन झालेली आहेत.

तुम्ही आजपर्यंत तुमच्या जमिनीचा ऑनलाइन सातबारा बघितला असेल ऑनलाइन ८ अ बघितला असेल परंतु तुम्ही जर आजपर्यत तुमच्या जमिनीचा ऑनलाइन नकाशा बघितला नसेल तर तो ऑनलाईन नकाशा कसा बघावा या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत.

ऑनलाइन नकाशा कसा असतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर नमुन्यासाठी या लेखाच्या सर्वात शेवटी ऑनलाईन Bhu Naksha pdf format मध्ये उपलब्ध आहे.

हा ऑनलाइन Bhu Naksha कसा असतो हे तुम्हाला बघण्याची इच्छा असेल तर या ठिकाणी तुम्ही हा भू नकाशा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये बघू शकता.

ऑनलाइन Bhu Naksha नमुना डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

ऑनलाइन-भू-नक्शा.pdf (13484 downloads )

मित्रांनो digital dg या युट्युब चॅनलवर विविध शासकीय योजनेसंदर्भातील माहितीचे व्हिडीओज पब्लिश केले जातात व digitaldg.in या वेबसाईटवर विविध शासकीय योजनेंची माहिती दिली जाते.

तुम्हाला जर शासकीय योजनांची मोफत माहिती हवी असेल तर digital dg या युट्युब चॅनल व digitaldg.in या वेबसाईटला भेट द्या. digital dg या युट्युब चॅनलला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

bhunaksha maharashtra online कसा बघावा ते आपण आता जाणून घेवूयात

ऑनलाइन भू नकाशा कसा बघावा हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ बघा

  • तुमच्या मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या ब्राउजरमध्ये टाईप करा भू नकाशा आणि सर्च करा.
  • त्यानंतर mahabhunakasha या वेबसाईटची लिंक तुम्हाला दिसेल या लिंकवर क्लिक करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा  https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp
  • जसे हि तुम्ही या ठिकाणी सर्च या बटनावर क्लिक कराल त्यावेळी भू नकाशा संदर्भातील शासनाच्या अधिकृत वेबसाईट या ठीकानीज ओपन होईल.
  • कॉम्प्युटर आणि मोबाईलवर या वेबसाईटचा इंटरफेस जरी वेगवेगळा दिसत असला तरी जि माहिती या ठिकाणी तुम्हाला भरावयाची आहे ती सारखीच आहे म्हणजेच पर्याय या ठिकाणी सारखेच आहेत त्यमुळे हा व्हिडीओ बघितल्यानंतर मोबाईल आणि कॉम्प्युटरवर तुम्ही हा भू नकाशा बघू शकता. तुम्ही हि प्रक्रिया तुमच्या कॉम्प्युटरवर करत आहात असे गृहीत धरुयात. आता तुमच्या कॉम्प्युटरच्या डाव्या बाजूला स्क्रीनवर State, Category, District, Taluka, Village,Map, Type, असे एकूण 7 पर्याय दिसेल. स्टेटमध्ये महाराष्ट्र अगोदरच सिलेक्टेड असेल, त्यानंतर कॅटेगरी मध्ये rural निवडा, District मध्ये तुमचा जो हि जिल्हा असेल तो निवडा.
  • त्यानंतर खाली Search by plot No. असा एक पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल. चौकटीमध्ये तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे. आणि सर्च या बटनावर क्लिक करायचे आहे.
  • भू नकाशा बघण्यासाठी Map Report या बटनावर क्लिक करा.

  • जसे हि तुम्ही Map Report या बटनावर क्लिक कराल त्यानंतर दुसरे tab या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी तुमच्या जमिनीचा नकाशा तुम्हाला दिसेल.
  • या ठिकाणी single plot आणि All plots of same owner असे दोन पर्याय दिसतील. या पैकी जो पर्याय तुम्हाला योग्य वाटत असेल तो निवडा यानंतर या ठिकाणी एक झाडाचे म्हणजेच लेअरचे चिन्ह तुम्हाला दिसेल यावर क्लिक करताच तुमच्या गट नंबरच्या आजूबाजूला जे झाडे आहेत ते दिसतील त्यासाठी झाडाच्या चिन्हावर क्लिक करा.
  • all लेअरवर क्लिक करताच सर्व बाबी या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्यासाठी show pdf Report या बटनावर क्लिक करा.
  • तर अशाप्रकारे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा दिसेल ह्या नकाशाची प्रिंट काढायची असल्यास प्रिंट या बटनावर क्लिक करा तुम्हाला हा नकाशा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये pdf स्वरुपात हवा असेल तर folder या बटनावर क्लिक करा.

या लेखाचा सारांश

या लेखामध्ये आपण जाणून घेतले आहे कि भू नकाशा म्हणजेच jamin rasta nakasha ऑनलाइन कसा बघावा. शेतीचा नकाशा बघण्यासाठी कोणती वेबसाइट आहे, मित्रांनो शेतीसंबधी विविध योजनांच्या माहितीचे व्हिडीओज आमच्या युट्युब चॅनलवर पब्लिश केले जातात ते तुम्ही नक्की बघा digital dg या युट्युब चॅनलला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Marathi mseb online arj नवीन लाइट कनेक्शन ऑनलाईन अर्ज

https://digitaldg.in/2020/11/23/rasta-magni-arj-shet-rasta-kayda/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *