Balasaheb thakre smart yojna शेतकरी अनुदान योजना 2020
मित्रांनो नमस्कार, आज आपण बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना Balasaheb thakre smart yojna संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत.
शेतकरी योजना माहिती 2020 जर तुम्ही शोधत असाल तर हि माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही महाराष्ट्र शासन योजना संदर्भात योग्य माहिती न मिळाल्यामुळे ते शासकीय योजना लाभापासून व शेतकरी अनुदान योजना पासून वंचित राहण्याची शक्यता असते.
बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजनेचा फॉर्म कसा भरावा हे बघण्यासाठी येथे क्लिक करा किंवा खालील व्हिडीओ बघा.
विकेल ते पिकेल योजना vikel te pikel yojana
दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते विकेल ते पिकेल या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट ) Balasaheb thakre smart shetkari yojana योजनेसाठी विविध शेतकरी गटांकडून किंवा शेतकरी कंपनीकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदरील जाहिरात स्मार्टच्या अधिक्र्कुत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
ती जाहिरात तुम्ही बघू शकता ऑनलाइन अर्ज सादर करू शकता.
स्मार्ट Balasaheb thakre smart yojna योजना काय आहे या विषयी जाणून घेवूयात.
लहान आणि सीमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योगजणांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करणे या उद्देशाने मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजेच (स्मार्ट ) योजना सुरु करण्यात आलेली आहे.
स्मार्ट शेतकरी अनुदान योजना 2020 Subsidy schemes for farmers in maharashtra 2020
स्मार्ट प्रकल्पांतर्गत विविध पिके, शेळ्या व परसबागेतील कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, बांबू तसेच व्यावसायिक कुक्कुटपालन उभारणीसाठी ६० टक्क्यापर्यंत अनुदान देण्यात येते.
Balasaheb thakre smart yojna स्मार्ट योजनेचा लाभार्थी पात्रता
आत्मा अंतर्गत नोंदणी झालेले शेतकरी गट,शेतकरी शेतकरी उत्पादक कंपनी, ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत थापीत प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाकडून स्थापित साधन केंद्र इत्यादी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मित्रांनो ह्या योजनेच्या लाभ घेण्यासाठी शेतकरी गट किंवा शेतकरी उप्तादक कंपनी असणे गरजेचे आहे. मित्रांनो एकापेक्षा अनेक जेंव्हा एकत्र येतात तेंव्हा त्यांच्या समूह निर्माण होतो आणि जेथे समूह किंवा गट निर्माण होतात तेंव्हा त्या ठिकाणी एकीचे बळ निर्माण होते.
एकीचे बळ असेल तर शासकीय योजनाच काय तर कोणताही फायदा एकत्रितपणे घेता येतो. मित्रानो मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजेच (स्मार्ट) Balasaheb thakre smart yojna 2020 योजनेचा लाभ घ्या.
शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असणे आवश्यक
Balasaheb thakre smart yojna या योजनेचा लाभ घेण्यासाठीऑनलाइन अर्ज करण्याअगोदर तुमचा शेतकरी गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असणे आवश्यक आहे.
आता कदाचित तुमच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो कि स्मार्ट योजनेसोबत इतरही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गट निर्माण कसा करायचा तर या संदर्भात अत्यंत महत्वाची माहितीची फाईल या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता.
शेतकरी गट निर्माण करण्यासाठी अर्ज कसा आणि कोठे करावा लागतो..शेतकरी गटामध्ये किती सदस्य घ्यावे लागतात.
शेतकरी गट निर्माण करण्यासाठी ओरिजिनल अर्ज या ठिकाणी उपलब्ध आहे एका क्लिकवर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये हा ओरिजिनल फॉर्म डाउनलोड करू शकता.
स्मार्ट योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा यासंदर्भातील व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी गट नोंदणी करण्यासाठी लागणारा अर्ज डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आत्मा-शेतकरी-गट-नोंदणी-ओरिजिनल-अर्ज-1.pdf (7793 downloads ) शेतकरी-गट-मार्गदर्शक-सूचना..pdf (3834 downloads )ह्या फॉर्म संदर्भात काही अडचण आल्यास आमच्या WhatsApp नंबरवर संपर्क साधा.
( सूचना -वरील pdf फाईल मध्ये शेतकरी गट नोंदणीसाठी लागणारा ओरिजिनल म्हणजेच MS word मध्ये टाईप केलेला फॉर्म आहे. ओरीजनल हा शब्द यासाठी वापरलेला आहे कि हा अर्ज कुठल्याही प्रकारे झेरॉक्स किंवा स्कॅन केलाला नाही . हाअर्ज फक्त नमुना म्हणून ठेवलेला आहे. शेतकरी गट निर्माण करण्यासाठी या अर्जासोबत कदाचित आवश्यकतेनुसार कमी किंवा अधिक कागदपत्रे जोडावी लागतील.अधिक माहितीसाठी तुमच्या तालुक्यातील आत्मा अधिकारी साहेबांशी चर्चा करा.)
वरील लिंकवर क्लिक करताच शेतकरी गट नोंदणीसाठी लागणारा अर्ज तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल. जर एका प्रयत्नांत हा अर्ज डाउनलोड झाला नाही तर परत प्रयत्न करा.
हा ओरिजिनल अर्ज या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ह्या अर्जात दिलेली माहिती भरून तुम्ही तुमच्या तालुक्यातील कृषी विभागातील आत्मा योजनेच्या अधिकारी साहेबाना सादर करा किंवा त्यांच्याशी संपर्क करा.
चला तर आता थोडाही वेळ न दवडता जाणून घेवूयात कि स्मार्ट योजनेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसे करावे लागते.
Balasaheb thakre smart yojna योजनेसाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया
तुमच्या मोबाईलमधील ब्राउजरच्या सर्च बार मध्ये टाईप करा https://www.smart-mh.org/ त्यानंतर सर्च करा.
जसे हि तुम्ही हा कीवर्ड सर्च कराल त्यानंतर तुमच्या कॉम्प्युटरच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीनवर मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजेच (स्मार्ट ) योजनेची वेबसाईट दिसेल.
या वेबसाईटच्या Right top corner ला इंग्रजी आणि मराठी असे दोन भाषेचे पर्याय दिलेले आहेत यापैकी ज्या भाषेत तुम्हाला सोपे वाटेल ती भाषा निवडा.
उदाहरणार्थ या ठिकाणी मराठी भाषा या बटनावर क्लिक करताच सर्व पर्याय या ठिकाणी मराठी भाषेतून तुम्हाला दिसतील. या ठिकाणी बरीच माहिती आहे ते तुम्ही सविस्तरपणे वाचून घ्या.
Balasaheb thakre smart yojna योजनेची जाहिरात डाउनलोड करा.
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजेच (स्मार्ट ) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारित संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांचेकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
ती जाहिरात सविस्तरपणे बघण्यासाठी call for proposal या केशरी रंगाच्या बटनावर क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीलाच अर्ज मागविण्यासाठी जाहिरात असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
अर्ज डाउनलोड करण्याची लिंक या ठिकाणी दिलेली आहे त्यावर क्लिक करताच मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजेच (स्मार्ट ) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील समुदाय आधारित संस्था आणि संस्थात्मक खरेदीदार यांचेकडून अर्ज मागविण्यासंदर्भातील जाहिरात तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड होईल.
त्यानंतर हि जाहिरात सविस्तरपणे वाचून घ्या.
Balasaheb thakre smart yojna ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
call for proposal या बटनावर क्लिक करताच काही पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसतील.
अर्ज मागविणेसाठी जाहिरात.
ऑनलाईन प्रणाली वापर’कर्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना.
जाहिराती संदर्भातील माहिती.
ऑनलाइन अर्ज भरणेसाठी येथे क्लिक करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न.
जाहिरात व अर्ज भरावयाची प्रपत्रे.
इत्यादी पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. या पर्यायांपैकी चौथा जो पर्याय आहे ऑनलाइन अर्ज भरणेसाठी येथे क्लिक करा.
या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर नोंदणी प्रकार निवडा यामध्ये तुम्हाला दोन प्रकार दिसतीलजसे कि समुदाय आधारित संस्था म्हणून लोगिन करा खरेदीदार म्हणून लोगिन करा.
तुमचा आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट असेल किंवा शेतकरी उत्पादक कंपनी असेल तर तुम्ही समुदाय आधारित संस्था म्हणून लोगिन करा या लिंकवर क्लिक करून तुम्हाला लोगिन करायचे आहे.
या लिंकवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हला युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लोगिन करणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड नसेल तर हिरव्या रंगाच्या नोंदणी करा या बटनावर क्लिक करून नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे
Balasaheb thakre smart yojna स्मार्ट योजनेसाठी नोंदणी कशी करावी
नोंदणी करा या बटनावर क्लिक करा.
समुदाय आधारित संस्था म्हणून लोगिन करा खरेदीदर म्हणून लॉगीन करा या दोन्ही पैकी एका लिंकवर क्लिक करा.
उदाहरणार्थ या ठिकाणी आपण खरेदीदार म्हणून लॉगीन करा हा पर्याय निवडा व त्यावर क्लिक करा.
एक फॉर्म या ठिकाणी ओपन होईल तो व्यवस्थित भरा. या फॉर्म मध्ये तुम्हाला तुमच्या समुदाय आधारित संस्थेचे नाव टाकायचे आहे त्यानंतर नोंदणी प्रकार या रकान्यामध्ये तुम्ही पिक मूल्य साखळी किंवा शेळी व परस बागेतील कुक्कुटपालन या पैकी एक पर्याय निवडू शकता.
संस्थेच्या प्रकार या रकान्यावर क्लिक करताच शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक कंपन्याचे फेडरेशन, लोक संचलित साधन केंद्र, या पर्यायांपैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे.
त्यानंतर खालच्या रकान्यामध्ये समुदाय आधारित संस्थेचा पत्ता टाईप करायचा आहे.
ऑनलाइन प्रणाली वापरकर्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना
त्यानंतर तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचे गाव आणि पिनकोड हि सर्व माहिती व्यवस्थित टाका.
त्यानंतर संपर्क व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर, इमेल आयडी, वापरकर्ता नाव व शेवटी पासवर्ड टाकून प्रस्तुत करा या पिवळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
एकदा का सर्व हि माहिती व्यवस्थित टाकून तुम्ही submit केले कि तुमला तुमचा युजर आयडी व पासवर्ड मिळेल तो युजर आयडी व पासवर्ड टाकून तुम्हाला लोगिन करायचे आहे.
call for proposal या बटनावर क्लिक करा. त्यानंतर ऑनलाइन प्रणाली वापरकर्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना या लिंकवर क्लिक करा या लीक्वर क्लिक करताच या ठिकाणी स्मार्ट योजनेसाठी लोगिन कसे करावे.
नवीन नोंदणी कशी करावी या संदर्भातील संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आयडी आणि पासवर्ड टाकून लोगिन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे त्यासाठी युनिकोडचाच वापर करावा अशी सूचना या ठिकाणी दिलेली आहे.
Balasaheb thakre smart yojna साठी लागणारे कागदपत्रे अपलोड करा.
बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प व उत्पादक भागीदारी उपप्रकल्प हे दोन पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल यापैकी तुम्ही ज्या पर्यायावर क्लिक कराल ते प्रपत्र तुम्हाला भरावयाचे आहे.
हे प्रपत्र कसे भरावे लागणार आहे कोणकोणती माहिती भरावी लागणार आहे ती वाचून घ्या व काळजीपूर्वक माहिती भरा. सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर submit करावा अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती अचूक व सत्य असल्याची खात्री करावी आणि त्यानंतरच submit करावा.
एकदा का अर्ज सबमिट झाला कि मग त्यामध्ये कोताही बदल करता येणार नाही हे लक्षात असू द्या.अर्जासोबत जेहि कागदपत्रे जोडणे आहे त्या कागदपात्रांची साईझ हि 5 एमबी पेक्षा जास्त नसावी व हि सर्व कागदपत्रे pdf formatमध्ये असावीत.
Balasaheb thakre smart yojna लेखाचा सारांश
तर मित्रानो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण बघितले आहे कि मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन Balasaheb thakre smart yojna (स्मार्ट ) योजनेचा ऑनलाइन फॉर्म कसा भरावा लागतो त्याची प्रोसेस कशी असते.
या लेखामध्ये आपण बघितले आहे कि स्मार्ट योजनेसाठी कोणकोणते शेतकरी अर्ज करू शकतात. शेतकरी गट तयार करण्यासाठी लागणारा ओरिजिनल अर्ज डाउनलोड कसा करावा. स्मार्ट योजनेसाठी नोंदणी कशी करावी.
आमचे इतरही लेख वाचा.
Marathi mseb online arj नवीन लाइट कनेक्शन ऑनलाईन अर्ज
https://digitaldg.in/2020/11/02/marathi-mseb-arj-pdf/
मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद
फॉर्म ला पासवर्ड मागत आहे
dadaraogavande@yahoo.in यावर इमेल करा.